Month: November 2025

महानगर

वडाळा येथील मालवणी जत्रेला उस्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि २४आमदार कालिदास कोळंबकर साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्या उपाध्र गजेंद्र धुमाळे यांनी वडाळा येथील सदाकांत ढवण मैदानात मालवणी जत्रा उत्सवाचे आयोजन केले होते. त्या विभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या जत्रोत्सवात विविध खाद्यसंस्कृती, पारंपारिक लोककला, सुस्वर भजन,मनोरंजन इत्यादी कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी झुंबड पहायला मिळाली. लहान मुलांसाठी या ठिकाणी विविध […]Read More

महानगर

बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना थकित देणे त्वरित द्यावीभाई

मुंबई, दि २४आशिया खंडात नावाजलेला बेस्ट उपक्रम, मुंबईकरांना वीजपुरवठा व परिवहन या दोन सेवा गेली ७५ वर्षे अविरतपणे देत आहे. अशा या बेस्ट उपक्रमातून आम्ही ३०/३५ वर्षे, विविध पदावर सेवा करुन सेवानिवृत्त झालो आहोत. परंतु सेवानिवृत्त झाल्यानंतर आमच्या हक्काची देणी, ग्रॅज्युईटी (उपदान), प्रवासभत्ता, बोनस, शिल्लक रजेचे पैसे, कोविड भत्ता, वेतन कराराची थकबाकी इत्यादि कायदेशीर व […]Read More

महानगर

एनटीसी मिल कामगारांची देणी आणि पगार न दिल्यास काम बंद

मुंबई, दि २४: एनटीसी मिल कामगारांचे डिसेंबर अखेर पर्यंत ग्रॅच्युईटी आदी न्याय्य देण्यासह थकीत पगार न दिल्यास काम बंदचे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष सुनील बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे यांनी व्यवस्थाप नाशी चर्चा करताना दिला आहे.मुंबईतील एनटीसीच्या चार गिरण्यातील कामगारांना गेल्या १० महिन्याचा पगार दिलेला नाही.संघाने न्यायालयात धाव घेतली, न्यायालयानेही […]Read More

महानगर

संविधानच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काँग्रेसची राज्यव्यापी ‘शिवशंभू स्वराज्य मोहीम’.

मुंबई, दि. २४ नोव्हेंबर.. संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र, राज्यातील विविध संविधानवादी संघटना आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली “शिवशंभू स्वराज्य मोहीम” राज्यभर राबवणार आहे. दि. २५ – २६ नोव्हेंबर २०२५ रोजी क्रांतीभूमी महाड – राष्ट्रमाता जिजाऊ समाधी स्थळ, किल्ले रायगड ही दोन दिवसीय मोहीम म्हणजे इतिहास, […]Read More

महानगर

प्रिन्स अली खान रुग्णालयातील कामगारांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू

मुंबई, दि २४मुंबईतील माझगांव, परिसरातील प्रिन्स अली खान रुग्णालय सन २०२२ साली धोकादायक इमारत ठरवून (स्ट्रक्चरल ऑडिट सी-१) आल्यामुळे रुग्णालय बंद करण्यात आले. मात्र अद्यापही नवीन रुग्णालयाची उभारणी करण्यात आली नाही. या ठिकाणी तात्काळ नवीन रुग्णालय बनवावे. नवीन रुग्णालय झाल्यावर कामगारांना परत रुजु करून घ्यावे. तसेच जोपर्यंत नवीन रुग्णालय बनत नाही तोपर्यंत कामगारांना मासिक वेतन […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

१० ते १४ डिसेंबर होणार सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

पुणे, दि. २४ : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदाच्या वर्षी बुधवार दि. १० डिसेंबर ते रविवार दि. १४ डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे संपन्न होणार असून महोत्सवात यावर्षी सादरीकरण करणाऱ्या कलाकारांच्या नावांची घोषणा आज झालेल्या पत्रकार परिषदेत आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास […]Read More

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन

मुंबई, दि. 24 : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (89) यधर्मेंद्र यांनी आज दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर विले पार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. थोरला पुत्र सनी देओलने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी अमिताभ बच्चन आणि आमिर खानसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.. धर्मेंद्र हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी […]Read More

करिअर

इन्फोसिस फाउंडेशनकडून आरोहण सोशल इनोव्हेशन अवॉर्ड्स २०२५ च्या विजेत्यांची घोषणा

बंगळुरू– २१ नोव्हेंबर २०२५: इन्फोसिसची सामाजिक कार्य सीएसआर शाखा असलेल्या इन्फोसिस फाउंडेशनने आज आरोहण सोशल इनोव्हेशन अवॉर्ड्सच्या चौथ्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा केली. या पुरस्कारांची सुरूवात २०१८ मध्ये झाली आणि त्यातून भारतातील जीवन सुधारण्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी व सामाजिक कल्याणासाठी अभूतपूर्व उपाय विकसित करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करून पारितोषिक दिले जाते. यंदा शिक्षण, आरोग्यसेवा आणि […]Read More

महानगर

‘आयफोनवाल्यांनाच’ मेट्रो सवलत? दिव्यांगांवरील ही कोणती प्रशासनिक थट्टा!

मुंबई दि २४ : मुंबई मेट्रो प्रशासनानं दिव्यांगांसाठी 25 टक्के सवलतीची घोषणा केली पण अट वाचल्यावर दिव्यांग प्रवाशांनी डोक्यावर हात मारला. कारण ही सवलत मिळते ती फक्त आयफोन वापरणाऱ्या दिव्यांगांना! अँड्रॉइड वापरकर्ते—जे संख्येने सर्वाधिक, आर्थिक क्षमता कमी, संघर्ष अधिक—ते मात्र सवलतीपासून वंचित. त्यामुळे ही घोषणा दिलासादायक नसून दिव्यांगांवरची क्रूर थट्टा असल्याची भावना व्यक्त होत आहे. […]Read More

महिला

भारताने जिंकला पहिला अंध महिला T-20 विश्वचषक

भारताने काल पहिला अंध महिला टी-२० विश्वचषक जिंकला. कोलंबो येथे झालेल्या अंतिम सामन्यात संघाने नेपाळला सात विकेट्सने हरवले. तर उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाला नऊ विकेट्सने हरवले होते. पी. सारा ओव्हल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारत महिला संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. नेपाळला २० षटकांत ५ गडी गमावून फक्त ११४ धावा करता आल्या. भारताच्या गोलंदाजांनी […]Read More