Month: November 2025

पर्यावरण

जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे अस्तित्वच धोक्यात

बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे अस्तित्व आता धोक्यात आलं आहे. हजारो वर्षांत यावर्षी पहिल्यांदाच लोणार सरोवराच्या पाण्यामध्ये जीवसृष्टी निर्माण झाली आहे. लोणार सरोवराच्या अति क्षारयुक्त पाण्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात जिवंत मासे आढळले आहे. उल्कापाताच्या आघातातून तयार झालेले लोणार सरोवर हे जगातील तिसरं आणि खाऱ्या पाण्याचं एकमेव सरोवर आहे. या खाऱ्या पाण्यात असलेल्या अतिक्षारांमुळे कुठलाच जीव […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

भीमा कोरेगाव स्मारकाच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवा : राहुल डंबाळे

पुणे, दि ४: भीमा कोरेगाव विजयस्तंभ या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करावे या आंबेडकरी चळवळीच्या भावनेचा गैरफायदा घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक समिती सातत्याने आंबेडकरी चळवळीची विकास आराखड्याच्या नावाखाली फसवणूक गेल्या काही वर्षांपासुन करत आहे. असाच प्रकार कालच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत देखील झाला असल्याने यापुढे अशी कोणतीही कृती करू नये अशी विनंती राहुल डंबाळे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी […]Read More

ऍग्रो

साताऱ्यातील ‘राधा’ म्हशीची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडी ‘राधा’ या म्हशीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. केवळ ८३.८ सेमी म्हणजेच २ फूट ८ इंच उंचीची ही म्हैस जगातील सर्वात बुटकी म्हैस ठरली आहे. त्रिंबक बोराटे हे तिचे मालक आहेत. त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच म्हैशीच्या पोटी १९ जून २०२२ रोजी ‘राधा’चा जन्म झाला. ‘राधा’ दोन-अडीच वर्षांची […]Read More

ट्रेण्डिंग

चीनमध्ये इन्फ्लुएंसर्ससाठी कडक नियमावली लागू

चीनच्या 25 ऑक्टोबर पासून सायबरस्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (CAC) द्वारे हा नवा कायदा लागू झाला आहे. ऑनलाइन चुकीची माहिती, चुकीचे उपचार आणि खोटी आर्थिक माहिती यांच्या प्रसाराला आळा घालणे, हा या नियमाचा मुख्य उद्देश आहे. आता सोशल मीडियावर आरोग्य, वित्त, शिक्षण किंवा कायद्याबद्दल बोलू इच्छिणाऱ्या कोणत्याही इन्फ्लुएंसरला त्या क्षेत्रातील अधिकृत प्रमाणपत्र, परवाना किंवा पदवी सादर करणे बंधनकारक […]Read More

महाराष्ट्र

राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर

मुंबई, दि. ४ : राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला, या सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणूकासंदर्भात आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. […]Read More

महानगर

हृदयरोग टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी वर्षातून एकदा कोलेस्ट्रॉल तपासून घ्यावे :

मुंबई- हृदयरोग टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी वर्षातून एकदा कोलेस्ट्रॉल तपासून घ्यावे असे प्रतिपादन सुप्रसिध्द हृदयरोग तज्ज्ञ (कारीओलॉजिस्ट) डॉ. अभिलाश मिश्रा यांनी विक्रोळी कन्नमवार नगरात केले. धर्मवीर संभाजी मैदानातील प्रभात मित्र मंडळाच्या विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना डॉ. अभिलाश मिश्रा बोलत होते.जागतिक ह्रदयदिनाचे औचित्य साधून सोमवार दि.३ नोव्हेंबर २०२५ रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन एनईबीएस ब्रांचचेअध्यक्ष डाॅ. […]Read More

राजकीय

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

येवला दि.४ :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या ८ कोटी ७१ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामार्फत करण्यात आले. यामध्ये येवला शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, कचरा प्रक्रिया प्रकल्प, एकलव्य स्मारक,रस्ते काँक्रीटीकरण, व्यायाम शाळा यासह विविध विकासकामांचे […]Read More

ऍग्रो

मच्छिमारांना कर्जावर चार टक्के व्याज सवलत

मुंबई दि ४ : राज्यातील मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यउत्पादकांसह किसान क्रेडिट कार्ड (KCC) धारक मत्स्यव्यावसायिकांना २ लाख रूपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या खेळत्या भांडवली कर्जावर चार टक्के व्याज परतावा सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे हजारो मच्छिमार कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. ताजे मासे उत्पादन, संवर्धन आणि साठवण व्यवस्थापनाला यामुळे […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

असंघटीत कामगारांच्या 30 हजार घरांचा मार्ग मोकळा

सोलापूर दि ४ : येथील असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे उभारण्यात येणाऱ्या ३० हजार घरांच्या प्रकल्पाला राज्य शासनाची मोठी दिलासादायक मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी अनर्जित, नजराणा रक्कमेसह अकृषिक वापर शुल्कातून सूट देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय(संक्षिप्त)

मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर, २०२५(सार्वजनिक बांधकाम विभाग)१. विरार ते अलिबाग बहुउद्देशिय वाहतूक मार्गिका (VAMMC) प्रकल्पाच्या कर्जास शासन हमी देण्यास मान्यता. हुडको कडून घेण्यात येणारे हे कर्ज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ भूसंपादनासाठी येणाऱ्या खर्चासाठी वापरणार आहे. (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)२. नागपूर येथील लक्ष्मी नारायण अभिनव तंत्रज्ञान (एलआयटी) विद्यापीठ, नागपूर विद्यापीठास निधी देण्यास मान्यता. सन २०२५-२०२६ […]Read More