Month: November 2025

देश विदेश

देशातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली, दि. ६ : भारतातील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत ल्यूक क्रिस्टोफर कौटिन्हो यांनी दाखल केली असून, त्यांनी देशातील वायू प्रदूषणाची स्थिती “सार्वजनिक आरोग्य आणीबाणी” म्हणून संबोधली आहे. कौटिन्हो यांच्या म्हणण्यानुसार, वायू प्रदूषणामुळे ग्रामीण आणि […]Read More

बिझनेस

हे आहेत देशातील सर्वात दानशूर उद्योजक

मुंबई, दि. ६ : मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे उद्योजक भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. असे असले तरीही त्यांच्या पेक्षा अधिक दानधर्म करणारे एक उद्योजक आहेत. भारतातील सर्वात दानशूर लोकांच्या यादीत एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर आणि त्यांचे कुटुंब आघाडीवर आहे. नाडर कुटुंबाने 2025 मध्ये एकूण 2708 कोटी रुपयांचे दान दिले आहे. ते गेल्या […]Read More

राजकीय

आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठीमुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

मुंबई, दि. ६ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेतून सूट देण्यासाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्याकरिता लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या वेळी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या धर्तीवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली 16 ऑक्टोबर 2025 रोजी आयोगाच्या कार्यालयात मुख्य […]Read More

क्रीडा

बेटींग प्रकरणी रैना आणि धवनवर ED ची मोठी कारवाई

मुंबई, दि. ६ : : माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांना ऑनलाइन बेटिंग प्रकरणात मोठा झटका बसला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) कारवाई करत दोन्ही खेळाडूंच्या एकूण ११.१४ कोटी रुपयांच्या मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. या प्रकरणाचा संबंध 1xBet या बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मशी आहे. तपासात असे […]Read More

देश विदेश

अस्वले पकडण्यासाठी जपानने बोलावले लष्कर

टोकीयो, दि. ६ : जपानमध्ये सध्या अस्वलांच्या हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक अस्वले मानवी वस्त्यांमध्ये शिरून नागरिकांवर हल्ले करत आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी मृत्यू आणि गंभीर जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. जपानने आज अस्वलांना पकडण्यासाठी अनेक भागात स्व-संरक्षण दल (SDF) तैनात केले आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ […]Read More

महानगर

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई, दि ६बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येईल. तर, दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध झाल्यानंतर दिनांक १४ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना सादर करता येतील. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२५ मध्ये […]Read More

राजकीय

वंदे मातरम’ला 150 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपातर्फे राज्यात 15

मुंबई, दि ६‘वंदे मातरम’या राष्ट्रगानाला 150 वर्षे पूर्ण होत असल्यानिमिताने भारतीय जनता पार्टीतर्फे शुक्रवार 7 नोव्हेंबर रोजी देशभर 150 ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत. राज्यात 15 ठिकाणी या निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांत केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री सहभागी होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुलंचे बहुआयामी विचार युवा पिढीला प्रेरक : सतीश आळेकरग्लोबल पुलोत्सवाला

पुणे, दि ६: जगातील संवेदनांचा अभ्यास करत समाजाविषयी विचार करणारे चिंतनशील भाष्यकार, साहित्यिक तसेच राजकारणावर परखडपणे भाष्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे होय. पुलं हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावरील महत्त्वाचे घटक आहेत. या महनीय व्यक्तिमत्त्वाची छाया त्यांच्या आठवणींमधून, विचारांमधून की त्यांनी केलेल्या प्रेरणादायक कार्यामधून शोधायची हा निकडीचा प्रश्न आहे. पुलंचे बहुआयामी विचार युवा पिढीला प्रेरक […]Read More

राजकीय

मुलाच्या नावाने पुण्यात ४० एकर सरकारी जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची

मुंबई, दि ६ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारच्या कंपनीने पुण्यातील वतनाची ४० एकर जमीन भ्रष्ट मार्गाने बळकावल्याचे उघड झाले आहे. पार्थ पवार यांनी हजारो कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटी रुपयात म्हणजे कवडीमोल भावाने हडप केली असून स्टँप ड्युटी फक्त ५०० रुपये दिली आहे. सरकारच्या ताब्यात असणा-या वतनाच्या या जमिनीचा व्यवहार झालाच […]Read More

राजकीय

बीएमसी निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी, आतापर्यंत ११५० पेक्षा अधिक अर्ज.

मुंबई, दि ६ मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तर काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छुकांनी गर्दी केलेली आहे. इच्छुक उमेदवारांकडून काँग्रेसने अर्ज मागविले असून आतापर्यंत ११५० पेक्षा अधिक अर्ज गेले आहेत. मुंबईतील सहाही जिल्ह्यातून इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लवकरच महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याने अर्जास मुदतवाढ दिली जाणार आहे असे मुंबई […]Read More