Month: November 2025

पश्चिम महाराष्ट्र

बिबट्याच्या हल्यावर पिंपरखेडच्या महिलांचा अनोखा जुगाड….

पुणे दि ९ : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात बिबट्याचे हल्ले सातत्याने होत असताना त्याच परिसरातील महिलांनी यावर एक जुगाड शोधलाय. उत्तर पुणे जिल्हा सध्या बिबट्याचा हॉटस्पॉट बनलाय.या बिबट्याच्या हल्ल्यापासून आपलं संरक्षण व्हावे यासाठी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील महिलांनी अनोखी अनोखी शक्कल लढवत गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टा घातलाय. बिबट्याने हल्ला केल्यावर प्रामुख्याने तो मान पकडतो. […]Read More

खान्देश

आश्रम शाळेच्या बसला अपघात , दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू…

नंदुरबार दि ९ – नंदूरबार जिल्ह्यातील देवगुई घाट परिसरात आज दुपारी अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस सुमारे शंभर ते दिडशे फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २ विद्यार्थ्यांचा मृत्यू तर ५३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. हे विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे आश्रमशाळेचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. सोमवारी शाळा […]Read More

महानगर

दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलतीची कैतके यांची मागणी

मुंबई दि ९ : राज्यातील एसटी महामंडळात महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली असून उर्वरित ५० टक्के रक्कम शासनाकडून एसटी महामंडळाला परतावा स्वरूपात दिली जाते. या धर्तीवरच दिव्यांग प्रवाशांसाठीही मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलत देण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार आणि ‘पत्रकार रुग्णमित्र’ म्हणून ओळखले जाणारे दीपक कैतके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री […]Read More

विदर्भ

वन्य प्राण्यांमुळे मका भाजीपाल्यासह सर्व रब्बी पिकांचे नुकसान

बुलडाणा दि ९ :- जिल्ह्यात दिवाळीपासून अवकाळी पाऊस असल्याने रब्बी पिकांचा हंगाम उशिरा सुरु झाल्याचे दिसून येत आहे. सध्या येणाऱ्या दिवसात गहू हरभऱ्याचा रब्बी हंगाम सुरुवात होत असल्याने बुलडाणा जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्ज वितरणा करिता जिल्हा केंद्रीय बँकेच्या नियोजनानुसार यंदा ५०० कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळावे यासाठी […]Read More

विदर्भ

पक्षी सप्ताहातच तब्बल २२५ दुर्मिळ पक्ष्यांची कत्तल!

चंद्रपूर दि ९ :- वन्यजीव संरक्षणाच्या जनजागृतीसाठी सुरू असलेल्या पक्षी सप्ताहातच दुर्मीळ पक्ष्यांची अमानुष शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार सावली वनपरिक्षेत्रात उघडकीस आला आहे. व्याहाड उपवनक्षेत्रातील मौजा उमरी लगतच्या तलावात रेशाळ कंठाची भिंगरी (Streak-throated Swallow) या संरक्षित प्रजातीच्या पक्ष्यांची शिकार करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील चार शिकाऱ्यांना सावली वनविभागाने मुद्देमालासह रंगेहात अटक केली आहे. लोमेश गेडाम (३४), प्रताप […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

शिरोळ इथं ऊस वाहतूक रोखल्यानं आंदोलक आणि कारखाना समर्थकांत झटापट

कोल्हापूर दि ९ : कारखान्यांनी जाहीर केलेला दर आम्हाला मान्य नाही, असा पवित्राघेत आंदोलन अंकुश संघटनेनं कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळतालुक्यात ऊस दराचं आंदोलन सुरू ठेवलं आहे. शिरोळ येथे कारखान्याकडे वाहतूक करण्यात येत असलेली उसाची वाहने आंदोलकांनी अडवली. यावेळी आंदोलक व कारखाना समर्थक यांच्यात बाचाबाची होऊन जोरदार झटापट झाली. पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांना […]Read More

सांस्कृतिक

पूर्ण पीठ श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात किरणोत्सव

कोल्हापूर दि ९ : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात ढगांचा अडथळा नसल्याने श्री दक्षिणायन किरणोत्सव सोहळा पार पडला. काल सायंकाळी सूर्य किरणांनी 5 वाजून 5 मिनिटांनी मंदिर द्वारातून प्रवेश करून या सुवर्ण किरणांनी 5 वाजून 42 मिनिटांनी देवीच्या चरणस्पर्श करीत हळूहळू ही सुवर्णकिरणं (05:45 मिनिटांनी) गुडघ्यापर्यंत पोहोचत पुन्हा हळूहळू सुवर्णचरणी […]Read More

महानगर

रोटरीच्या व्यावसायिक पुरस्कार सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई प्रतिनिधी‘ऑनरिंग अवर अनसंग हिरोज’ या व्होकेशनल पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नुकतेच यशवंतराव चव्हाण सेंटर येथे करण्यात आले होते. 400 हून अधिक उपस्थितांनी एकत्र येऊन इतरांच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित केलेल्या व्यक्तींच्या निस्वार्थ प्रयत्नांना साजरे करण्यासाठी एक भव्य यश मिळाले. या कार्यक्रमात 40 हून अधिक रोटरी अध्यक्षांचा प्रभावशाली सहभाग दिसला, ज्यांनी या गायक नायकांचा सन्मान केला. […]Read More

महानगर

अभ्युदयनगर येथे रस्त्याचे कामामुळे नागरिक हैराण

अभ्युदयनगर येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याचे काम सुरू असल्यामुळे येथील पादचारी, दुकानदार, स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. अभ्युदय नगर येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडी आणि खडी टाकली आहे आहे. तसेच रस्त्यावर एका बाजूला काम सुरू असल्याने रस्ता बंद करण्यात आल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणे फार त्रासदायक झाले आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात […]Read More

राजकीय

प्रमुख प्रचारकांची संख्या आता 20 ऐवजी 40

मुंबई, दि. ८ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या (Star Campaigner) संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगाने 20 वरून 40 केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी असलेली प्रमुख प्रचारकांची मर्यादा वाढवून 40 करण्यात यावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आयोगाच्या कार्यालयात 14 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत केली […]Read More