Month: November 2025

राजकीय

राज्यातील न्यायालये, न्यायमूर्तींच्या सुरक्षेत वाढ

मुंबई दि ११ : राज्यातील न्यायालयांचा परिसर तसेच न्यायमूर्ती व न्यायाधीश यांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त ८ हजार २८२ सुरक्षारक्षक नियुक्तीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हे सुरक्षारक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून (एमएसएससी) उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत. राज्यातील न्यायालयांतील सुरक्षा व्यवस्थेबाबत उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ – छत्रपती […]Read More

राजकीय

नाशिक, नागपूर, धाराशिव जिल्हा बँकांना ८२७ कोटींचे भागभांडवल

मुंबई दि ११ : नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून ८२७ कोटी रुपये देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यात नाशिक जिल्हा बँकेला ६७२ कोटी, नागपूर जिल्हा बँकेला८१ आणि धाराशिव जिल्हा बँकेला ७४ कोटी रुपये देण्यात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नाशिक, नागपूर आणि […]Read More

महानगर

भायखळ्यात शिवसेना पदाधिकारी यांची बैठक संपन्न

मुंबई, दि ११शिवसेना भायखळा विधानसभेच्या वतीने माझगाव येथे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना उपनेते यशवंत जाधव आमदार सौ. यामिनी यशवंत जाधव यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले. काही लोक आपण केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावर नजर ठेवावी आणि वेळेत त्यांना प्रत्युत्तर देऊन […]Read More

राजकीय

चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी

मुंबई दि. ११ : महसूलमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महाराष्ट्र निवडणूक प्रभारी म्हणून निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नावाची घोषणा केली. बावनकुळे म्हणाले, “महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून ५१ टक्के मते घेऊन दोन-तृतीयांश बहुमताने महाराष्ट्राच्या सर्व […]Read More

राजकीय

धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांचा पदाधिकारी व

मुंबई, दि ११राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे धाराशीव जिल्ह्यातील नेते अशोक भाऊ जगदाळे यांच्यासह असंख्य नेते व पदाधिकारी यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.. अशोक जगदाळे यांच्याबरोबर नळदुर्गचे माजी नगराध्यक्ष नितीन […]Read More

महानगर

नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे – बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

मुंबई, दि ११बृहन्मुंबई महानगरपालिकेची १२०० मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा, १२०० मिलिमीटर व्यासाची नवीन तानसा आणि ८०० मिलिमीटर व्यासाच्या विहार ट्रंक मुख्य जलवाहिनीवरील ३०० मिलिमीटर, ६०० मिलिमीटर व ९०० मिलिमीटर व्यासाच्या एकूण पाच झडपा बदण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. हे काम शुक्रवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून शनिवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ […]Read More

महानगर

‘एआय’ च्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा

मुंबई, दि. ११ :- पत्रकारिता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या संगमातून केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे, तर जबाबदार वृत्तनिर्मितीची नवीन मानसिकता घडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी केले. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृत्तपत्र तसेच डिजिटल माध्यम […]Read More

राजकीय

कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण

मुंबई, दि. ११ : राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे तसेच ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ या नवीन घोषवाक्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोधचिन्ह स्पर्धेतील विजेता आणि घोषवाक्य […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)*

मंगळवार, दि. ११ नोव्हेंबर २०२५ (सहकार विभाग)नाशिक, नागपूर व धाराशिव या जिल्हा मध्यवती सहकारी बँकांना ८२७ कोटी रुपयांचे शासकीय भागभांडवल (विधि व न्याय विभाग)न्यायालयीन संकुले तसेच न्यायाधिशांची निवासस्थाने यांच्या सुरक्षेत वाढ. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याकडून अतिरिक्त सुरक्षारक्षक उपलब्ध करून घेण्यास व त्याकरिता खर्च तरतुदीस मान्यता (वित्त विभाग)पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढविण्यास […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

थाटामाटात पार पडला श्री शिवाजी विद्यालयातील शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचा

पुणे दि. ११ : देहूरोड येथील श्री शिवाजी माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय व व्यवसायातील १९९६-१९९७ या १० वी बॅचमधील शिक्षक व माजी विद्यार्थी यांचा स्नेहमेळावा नुकताच थाटामाटात पार पडला. यावेळी तब्बल २८ वर्षानंतर शिक्षक व माजी विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह, प्रेम, उर्जा यांचा सुंदर मिलाफ पहावयास मिळाला. या स्नेहसंमेलनात विविध विषयातील सुमारे ४० शिक्षक […]Read More