Month: November 2025

महानगर

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांना सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत सामावून घेण्यासाठी

मुंबई, दि. १८राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या डीएस इंटरप्राईजेस कंट्रोल ऐवजी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक कार्य सर्व कर्मचारी सांभाळून घेण्यासाठी आझाद मैदान येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जाते. त्याकरीता महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत या […]Read More

महानगर

पगडी एकता संघाच्या वतीने आझाद मैदानात झाले आंदोलन

मुंबई, दि. १८म्हाडा इमारत दुरुस्तीव पुनर्रचना मंडळाने उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी सक्षम प्राधिकरण नसल्याचे जाहीर केले, मात्र त्यानंतर याबाबत कोणतेही पुढाकार घेण्याचे निर्देश संबंधित प्राधिकरणांना देण्यात आले नाहीत. त्यामुळे १३ हजार ८०० इमारतींच्या पुनर्विकासाला खीळ बसली असून, याविरोधात आज पगडी एकता संघाच्या वतीने आझाद मैदानात उस्फुर्तपणे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनामध्ये मोठ्या संख्येने दक्षिण मुंबईतील पगडी […]Read More

महानगर

संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर

मुंबई दि १८ : सिडकोसह राज्यातील विविध प्राधिकऱणांकडील लॅँड बँकेचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी संकल्पना आधारित- आयकॉनिक शहर विकासाच्या आदर्श धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सिडको महामंडळाकडून विविध वापरांसाठी भूखंडांचे लिलाव पध्दतीने भाडेतत्त्वावर वाटप केले जाते. या भूखंडांवर संबंधितांना प्रकल्पांचे बांधकाम करता येते. मात्र यासाठी भाडेपट्टा […]Read More

राजकीय

या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते श्रीराम मंदिरावर ध्वजारोहण

अयोध्या, दि. १८ : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर ४२ फूट उंच स्तंभ बसवण्यात आला आहे. या स्तंभावर २२ फूट लांब आणि ११ फूट रुंद ध्वज फडकवण्यात येणार असून तो, ३ किलोमीटर अंतरावरूनही दिसू शकेल. या ध्वजारोहणाची तयारी पूर्ण आता झाली असून . २५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोहन भागवत यांच्यासह बटण […]Read More

राजकीय

किमान 5 इमारतीच्या गटाचे ‘ मिनी क्लस्टर ‘ लवकरच..

मुंबई दि १८ : मिरा -भाईंदर महानगरपालिकेने मंजूर केलेल्या क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेला मोठी गती मिळत असून किमान 5 इमारतीच्या गटाला अथवा ठराविक चौरस मीटर क्षेत्र असलेल्या जागेला ‘ मिनी क्लस्टर ‘ म्हणून मान्यता देऊन क्लस्टरचे सर्व लाभ देण्याचे धोरण निश्चित केले जात आहे. या संदर्भात तातडीने सुधारित प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]Read More

राजकीय

ऑपरेश लोटस “मुळे मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेना मंत्र्याचा बहिष्कार..

मुंबई दि १८ : (खंडुराज गायकवाड ) भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे “ऑपरेश लोटस” करीत असल्याने याचा वाद आज मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी एका नाराजी नाट्यातून दिसून आला. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याने एकच राजकीय खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता सेनेचे सर्वच मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात ठाण मांडून होते. अखेर मुख्यमंत्र्यांशी […]Read More

महानगर

मुंबई मेट्रो-3 चे ‘दिव्यांग सवलत आश्वासन’ फसले

मुंबई, दि. १८ : मुंबई मेट्रो-3 सुरू होऊन दीड महिना होत आला असला, तरी दिव्यांग प्रवाशांसाठी या मार्गिकेचं चित्र आजही बदललेलं नाही. अनेक स्टेशनवर लिफ्ट बंद असल्याने व्हीलचेअरवर असलेल्या दिव्यांगांना प्रवास करणे अक्षरशः अशक्य होत आहे. ‘सुलभ’ प्रवासाच्या नावाखाली दिव्यांगांना रोजच त्रासाचा सामना करावा लागत आहे. दिव्यांग हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे ज्येष्ठ पत्रकार आणि दिव्यांग […]Read More

राजकीय

छोटे भूखंड आता ‘विनाशुल्क’ नियमित!

मुंबई, दि. १८ : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती महसूल विभागाने निश्चित केली असून याबाबत सर्व प्रशासकीय यंत्रणेला छोटे भूखंड नियमित करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केले. या निर्णयाचा राज्यातील ६० लाख कुटुंबांसह सुमारे ३ कोटी नागरिकांना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे, […]Read More

राजकीय

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियमात सुधारणा

मुंबई दि १८ : सहायक धर्मादाय आयुक्त, गट-अ संवर्गातील पदासाठी तीन वर्षे वकिलीचा अनुभव अनिवार्य करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सर्वोच्च न्यायालयाने एका न्यायालयीन प्रकरणात दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), प्रथम स्तर न्यायदंडाधिकारी या पदावर अनुभव नसलेल्या विधि पदवीधारकांना […]Read More

राजकीय

ठाणे पालिका क्षेत्रात प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत

मुंबई, दि. १८: ठाणे महापालिका हद्दीतील जे.एन.एन.यु. आर.एम. आणि बी.एस.यू.पी. योजनेअंतर्गत प्रकल्पबाधीतांना वैयक्तिक सदनिका करारनामा करताना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देतानाच त्यासाठी प्रतिदस्त १०० रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. केंद्र शासन, राज्य शासन व ठाणे महानगरपालिकेचा संयुक्त उपक्रम असलेल्या जे.एन.एन.यु.आर.एम., बी.एस.यू.पी. योजना शहरी गरीबांकरिता आहेत. ठाणे […]Read More