Month: November 2025

विदर्भ

भंडाऱ्यात हुडहुडी… पारा घसरला ९.५ अंश सेल्सिअस!

भंडारा दि १९ : भंडारा जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. गेल्या चार दिवसांपासून १२ अंश सेल्सिअसच्या आसपास असलेले किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा १५.५ अंशांनी कमी आहे. तापमानात झालेल्या घसरणीमुळे जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली आहे आणि थंडीची लाट येण्याची भीती आहे. भंडारा जिल्ह्यातील किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आल्याने, जिल्हा […]Read More

ट्रेण्डिंग

बिबट्यांचा वावर असलेल्या क्षेत्रातील शाळांच्या वेळेत बदल

अहिल्यानगर, दि. १८ : राज्यातील ग्रामीण भागांमध्ये बिबट्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. बिबट्याने लहान मुलांचा बळी घेतल्याच्याही अनेक घटना घडल्याने गावोगावचे पालक घाबरून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत. वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वेळेत बदल करण्यात […]Read More

ट्रेण्डिंग

असीम सरोदे यांची ​​​​​​​सनद रद्द करण्याच्या निर्णयाला BCI ची स्थगिती

नवी दिल्ली, दि. १८ : विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांची वकिली सनद रद्द करण्याच्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या निर्णयाला बार कौन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे. यामुळे असीम सरोदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रस्तुत प्रकरण खरोखरच व्यावसायिक गैरवर्तनुकीचे आहे का? याचा सखोल अभ्यास करूनच योग्य तो निर्णय घ्यायला हवा होता, […]Read More

ट्रेण्डिंग

CNG पुरवठा ठप्प झाल्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा

मुंबई, दि. १८ : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून ठप्प झालेला CNG पुरवठा अखेर आज (१८ नोव्हेंबर) रोजी दुपारी पुन्हा सुरू झाला असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वडाळा आणि चेंबूर परिसरातील गॅस पाइपलाइन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुरवठा सुरळीत करण्यात आला.** मुंबईत १६ नोव्हेंबर रोजी गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (GAIL) ची मुख्य पाइपलाइन रासायनिक […]Read More

ट्रेण्डिंग

पालघरमध्ये 3.28 कोटींचा दरोडा, पोलीसांनी २४ तासात लावला छडा

मुंबई, दि. १८ : पालघर जिल्ह्यातील दागिन्यांच्या दुकानात झालेल्या मोठ्या चोरीचा तपास पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत उलगडा केला आहे. या प्रकरणात पाच नेपाळी नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यांना भारत-नेपाळ सीमेवर आणि सुरत येथे पकडण्यात आले. पोलिसांनी चोरीस गेलेले दागिने आणि रोख रक्कम मिळवून दिली असून त्याची एकूण किंमत सुमारे ₹३.२८ कोटी इतकी आहे. पालघरमधील […]Read More

देश विदेश

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतून ३ संशयितांना अटक

मुंबई, दि. १८ : दिल्लीतील कार स्फोट प्रकरणाशी संबंधित तीन संशयितांना आज मुंबई पोलिसांनी अटक केली असून, त्यांना पुढील चौकशीसाठी दिल्लीला पाठवले जात आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने गुप्त मोहिमेदरम्यान हे तिघे वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हे सर्वजण मुख्य आरोपींशी सोशल मीडिया अॅप्लिकेशनद्वारे संपर्कात होते. विशेष म्हणजे हे तिघेही सुस्थित कुटुंबांतील आहेत. या […]Read More

देश विदेश

सर्वोच्च न्यायालयाने स्वत:च बदलला सहा महिन्यांपूर्वी दिलेला हा निर्णय

नवी दिल्ली, दि. १८ : सर्वोच्च न्यायालयाने आज २:१ बहुमताने सहा महिन्यांपूर्वी दिलेला वनशक्ती प्रकरणातील निकाल रद्द केला. यामुळे केंद्र सरकारला अशा प्रकल्पांना मंजुरी देण्याचा अधिकार मिळाला आहे, जे पूर्वी पर्यावरणीय नियमांचे पालन न करता सुरू झाले होते. १६ मे २०२५ रोजी न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने ठरवले होते की, पर्यावरणीय […]Read More

ऍग्रो

अमेरिकेने हटवला या भारतीय कृषी उत्पादनांवरील ५०% कर

मुंबई,दि. 18 : अमेरिकेने भारताच्या कृषी उत्पादनांवरील ५०% परस्पर कर मागे घेतल्याने भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कॉफी, चहा, मसाले, उष्णकटिबंधीय फळे आणि फळांचे रस यांसारख्या उत्पादनांवरील शुल्क हटवल्यामुळे सुमारे १ अब्ज डॉलर्स (₹९,००० कोटी) किमतीची निर्यात करमुक्त झाली आहे. ही सूट १२ नोव्हेंबर रोजी व्हाईट हाऊसच्या कार्यकारी आदेशाद्वारे जाहीर करण्यात आली आणि १३ […]Read More

राजकीय

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिव्यांग बांधवांना शिवसेनेने दिल्या व्हील

मुंबई, दि. १८हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना प्रवक्त्या सुशीबेन शाह यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना मोफत व्हीलचेअर, वॉकर आणि वॉकिंग स्टिकचे वितरण बाळासाहेब ठाकरे यांच्या रिगल सिनेमा येथील स्मृतीस्थळासमोर करण्यात आले.८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या वंदनीय बाळासाहेबांच्या विचारसरणीवर आधारित या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

बिबट्यांचे हल्ले राज्य आपत्ती म्हणून जाहीर होणे प्रस्तावित

मुंबई, दि. 18 : राज्यात मुख्यतः पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हल्ल्यात लहानग्या मुलांसह अनेकांनी प्राण गमावले आहेत. त्यानंतर वनविभाग अधिक सतर्कपणे काम करत असून बिबट्यांची नसबंदी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतकरी वर्ग शेतात जाताना जीव मुठीत धरत आहे. गावातील तरुणांचे विवाहही बिबट्यांच्या भीतीमुळे लांबणीवर पडत आहेत. या […]Read More