Month: November 2025

ट्रेण्डिंग

पहिल्यांदाच खेळवण्यात येणार इंडियन पिकलबॉल लीग

नवी दिल्ली, दि. १९ : देशात पहिल्यांदाच इंडियन पिकलबॉल लीग (IPBL) आयोजित केली जाणार आहे. या शहर-आधारित लीगमध्ये पाच संघ सहभागी होतील. ही लीग १ ते ७ डिसेंबर दरम्यान दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये खेळवली जाईल. काल लीगच्या पहिल्या हंगामासाठी पाच फ्रँचायझी संघांची घोषणा करण्यात आली. चेन्नई येथे झालेल्या एका कार्यक्रमात संघांची नावे आणि लोगोचे […]Read More

बिझनेस

निसान इंडियाकडून राष्ट्रीय स्तरावरील टेस्ट ड्राइव्ह कार्निव्हलचे आयोजन

गुरूग्राम, दि १९: निसान मोटर इंडिया आपल्या टेस्ट ड्राइव्ह कार्निव्हलच्या अनावरणाद्वारे उत्सव साजरा करत आहे. हा संपूर्ण भारतभरातील उपक्रम आहे जो ग्राहकांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी आणि देशभरातील डीलर्सकडे सातत्याने गर्दी वाढवण्यासाठी डिझाइन केलेला आहे. नवरात्र, दसरा आणि दिवाळीदरम्यान निसान मॅग्नाइटला मिळालेल्या जोरदार प्रतिसादामुळे तसेच भारत सरकारने जाहीर केलेल्या जीएसटी दर कपातीच्या सकारात्मक परिणामामुळे ऑक्टोबर २०२५ […]Read More

ऍग्रो

पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता वितरीत

मुंबई दि १९ : “केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हफ्त्याचं वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यापूर्वी राज्य शासनाने ही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून भरीव रक्कम वितरित करण्याचं काम केलं आहे. या नवीन 21 व्या हप्त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना लागवड, […]Read More

राजकीय

महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले; शिंदेंना पक्ष फुटण्याची भिती

मुंबई दि. १९ : महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता एकटे पडले आहेत आणि पक्ष फुटेल काय याची चिंता त्यांना सतावू लागली आहे, याच भितीपोटी नाराजी व निषेध नाट्य झाले आहे. ही महायुती विचारासाठी, विकासासाठी किंवा विश्वासासाठी नाही तर केवळ सत्तेसाठी झालेली आहे. पण सत्तेसाठी लाचारी बाळगण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे महाराष्ट्र प्रदेश […]Read More

राजकीय

बीएसयुपी सदनिका धारकांसाठी १०० रुपयांत रजिस्ट्रेशन..

ठाणे दि १९ : जेएनएनयूआरएम आणि बीएसयूपी अंतर्गत सर्वसामान्य सदनिकाधारकांना अवघ्या १०० रुपयांत रजिस्ट्रेशन करण्याची सवलत देण्यात आली असून एक टक्का मुद्रांक शुल्कात देखील सवलत देण्यात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. जेएनएनयूआरएम आणि बीएसयूपी अंतर्गत ठाणे विभागात उभारण्यात आलेल्या इमारतींमध्ये प्रकल्पग्रस्त […]Read More

महानगर

नेत्र चिकित्सा शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि. १९शिवसेनेचे माजी नगरसेवक अमेय घोले आणि ईशा नेत्रालय यांच्या सहकार्याने वडाळा येथे मोफत नेत्र तपासणी शिबीरचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये नागरिकांच्या संपूर्ण डोळ्याची मोफत तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आलेआम्ही विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य विषयक तसेच सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. त्याचाच एक […]Read More

विदर्भ

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीत तेल टँकरला आग, मोठा अनर्थ टळला

चंद्रपूर दि १९ :– चंद्रपूर-नागपूर मार्गावरील भद्रावती तहसील कार्यालयाजवळ सोयाबीन तेलाने भरलेल्या टँकरला अचानक आग लागली. टँकरमध्ये सुमारे ४५०० लिटर तेल होते. चालक व सहकारी वेळीच वाहनाबाहेर पडल्याने जीवितहानी टळली. माहिती मिळताच भद्रावती पोलिस व नगर परिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. टँकर (क्र. एमएच ३४ एम १७९५) आगीत नुकसानग्रस्त झाला […]Read More

महानगर

मुंबई उपनगरातील अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई, दि. १९ – मुंबई उपनगर जिल्ह्यात बोरीवली आणि अंधेरी येथे सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सेतू सुविधा केंद्र ही केवळ सेवा देणारी यंत्रणा नसून सरकार आणि नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू आहे. तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि अखंड सेवा देण्याच्या दिशेने हे केंद्र भविष्यकालीन स्मार्ट प्रशासनाचा एक […]Read More

क्रीडा

८ व्या राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेचे पिंपरी चिंचवड मध्ये आयोजन –

पुणे, दि. १९सुपर मास्टर्स गेम्स ॲन्ड स्पोर्ट्स फेडरेशन या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच ८ व्या राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन २७ जानेवारी २०२६ रोजी आणि समारोप ३१ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या स्पर्धेत कबड्डी, हॉकी, हॅन्ड बॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि टेनिस बॉल या सांघिक स्पर्धा होणार आहेत. […]Read More

महानगर

*विक्रोळी पार्कसाईट येथील महानगरपालिका इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पाने बाधित होणाऱ्या ३

मुंबई, दि. १९विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून हाती घेण्यात आला आहे. एकूण दोन टप्प्यात पूर्ण केल्या जाणाऱ्या या पुनर्विकास प्रकल्पाचे पूर्णतः बांधकाम प्रथमच बृहन्मुंबई महानगरपालिका करणार आहे. या अंतर्गत बाधित होणाऱ्या प्रथम टप्प्यातील ३ इमारती ‘एन’ विभागाकडून आज (दिनांक १८ नोव्हेंबर २०२५) रिकाम्या करण्यात आल्या. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक […]Read More