Month: October 2025

महानगर

परळ येथील बेस्ट वसाहतीची चरस, गांजा ओढणाऱ्या पासून सुटका करामाजी

मुंबई, दि ३१परळ येथील बेस्ट वसाहत येथे गेल्या अनेक महिन्यांपासून बी इमारतीच्या मागे चरस, गांजा पिण्यासाठी वसाहतीच्या बाहेरील तरुण येऊन गैरप्रकार करत आहेत. तसेच ‘पी’ आणि ‘सी’ इमारतीच्या मागे दारूचा अड्डा तयार केलेला असून सदर ठिकाणी वसाहतीच्या बाहेरील तरुण येऊन वसाहती मधील तरुण मुलांना वाईट मार्गावर नेण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. याबाबत बेस्ट समितीचे माजी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, डॉक्टर सेल, महिला आघाडीच्या वतीने

पुणे, दि ३१स्व. डॉ. संपदा मुंडे यांना त्वरीत न्याय मिळवून देण्यासाठी व भाजपाच्या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन. भाजपाच्या राजवटीत महिलांवर होणारे अन्याय व अत्याचारांची तीव्रता वाढताना दिसत आहे. प्रामुख्याने सत्तेत असणाऱ्या भाजपा व त्यांच्या मित्र पक्षांतील नेत्यांकडून वारंवार महिलांवर अत्याचार झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गुंडाच्या टोळीला पाठीशी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सुनियोजित पुनर्विकासासाठी एकात्मिक विकास गरजेचा, लोकमान्य नगर रहिवासी संघाची ठाम

पुणे, दि ३१: लोकमान्य नगर पुनर्विकासाच्या प्रश्नावर सध्या राजकीय वातावरण तापले असले तरी, स्थानिक नागरिकांचा नोंदणीकृत लोकमान्य नगर रहिवासी संघ हा सन २०२१ पासून एकात्मिक (क्लस्टर) विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकोरे यांची भेट घेऊन शासनाच्या विद्यमान धोरणानुसार एकात्मिक पुनर्विकास प्रक्रियेला गती देण्याची मागणी केली. लोकमान्य नगरमधील बहुसंख्य रहिवासी […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई दि. ३१ : – राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री केली.कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे. एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहेत. त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More

महानगर

मुंबईत थरारनाट्य, अल्पवयीन मुले ओलीस, आरोपी चकमकीत ठार

पवई परिसरातील महावीर क्लासिक इमारतीत असलेल्या ‘आरए स्टुडिओ’मध्ये गुरुवारी (दि. ३०) दुपारी घडलेल्या थरारक प्रकाराने संपूर्ण मुंबई हादरली. रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने अभिनयाच्या ऑडिशनच्या बहाण्याने बोलावलेल्या १७ अल्पवयीन मुलांना आणि इतर दोघांना ओलीस ठेवलं होतं. तब्बल एक तास चाललेल्या थरार नाट्यानंतर १९ जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली. रोहित आर्यचा पोलिसांनी एन्काउंटर केला. छातीत डाव्या बाजुला […]Read More

राजकीय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खर्चाची मर्यादा वाढली

मुंबई, दि. ३० : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने (SEC) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत मोठा बदल केला आहे. हा निर्णय तब्बल आठ वर्षांनंतर घेण्यात आला असून, विविध वर्गांतील महापालिकांसाठी वेगवेगळ्या खर्च मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. SEC च्या निवेदनानुसार, ‘A’ वर्गातील तीन प्रमुख महापालिकांसाठी — मुंबई, पुणे आणि नागपूर — प्रत्येकी […]Read More

खान्देश

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची रस्त्यांची पाहणी

नाशिक दि. ३० : येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रराजे भोंसले यांनी आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील रस्त्यांची पाहणी केली. कुंभमेळ्याच्या काळात अपेक्षित वाढीव वाहतूक आणि भाविकांच्या मोठ्या प्रमाणातील आगमन लक्षात घेऊन पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्या […]Read More

महानगर

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

मुंबई, दि. ३० – नेस्को गोरेगाव येथे सुरू असलेल्या इंडिया मेरीटाईम वीक मध्ये आज राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत २६० कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. महाराष्ट्र सागरी मंडळाचे हे करार इचंडिया आणि नॉलेज मरीन या कंपन्यांसोबत करण्यात आले आहे. यामुळे हरित टगबोटी साठी बॅटरी निर्मिती आणि जहाज बांधणी व दुरुस्ती […]Read More

शिक्षण

आदित्य एल १ मोहिमेतील संशोधन विद्यार्थ्यांसाठी होणार खुले

मुंबई, दि. ३० : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने ‘आदित्य एल-१’ मोहिमेतील संशोधन विद्यार्थ्यांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे देशातील युवा संशोधकांना सूर्याच्या अभ्यासात थेट सहभाग घेता येणार आहे. भारतातील पहिली सौर वेधशाळा असलेल्या आदित्य एल-१ मोहिमेने सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी लँगरेंज पॉइंट-१ (L1) वर यशस्वीपणे स्थान प्राप्त केले आहे. हे यान पृथ्वीपासून […]Read More

मनोरंजन

‘गोंधळ’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाॅंच

मुंबई, दि. ३० : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारण्यात आलेल्या ‘गोंधळ’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच थाटात लाँच करण्यात आला. आपल्या मराठी संस्कृतीतील पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम या विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलीच चालना देतो आहे. ‘गोंधळ’ हा विधी नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी […]Read More