Month: August 2025

सांस्कृतिक

नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…

पुणे दि १– आज पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 चे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रोहित टिळक, सुशील कुमार शिंदे , मंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 1983 साली लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची […]Read More

महानगर

“म्हाडाच्या चुकीमुळे गरिब भाडेकरूंना शिक्षा!”मुकेश शाह , अध्यक्ष – पागडी

मुंबई, दि १मुंबईतील पगडीधारक कुटुंबं म्हणजे या शहराचा खरा प्राण. यांनी या शहराची सेवा केली, कर भरला, आणि मुंबईचा सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक पाया उभा केला. मात्र आज हेच कुटुंबं ८०-१०० वर्ष जुन्या, धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये अंधारात जीवन जगत आहेत. अनेक इमारतींमध्ये शौचालय नाही, पाणी अपुरं, वीज कमकुवत, आणि सुरक्षिततेचा पूर्ण अभाव आहे. […]Read More

राजकीय

ठाणे रोडवरील काँक्रिटीकरणाच्या कामात ठेकेदाराकडून चाललेली दिरंगाई —

ठाणे, दि १भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील ठाणे रोडवर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामात ठेकेदाराकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल स्थानिक रहिवाशांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. नागरिकांच्या या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार श्री. महेश चौघुले यांनी स्वतः ठाणा रोड येथे भेट देत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अनमोल सागर यांच्यासोबत साईट व्हिजिट केली.परीक्षणादरम्यान आमदार चौघुले यांनी […]Read More

राजकीय

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज मोरे….

मुंबई दि. १ — महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची तर महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयच्या अध्यक्षपदी सागर साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू आणि राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी आज नवी दिल्ली येथे शिवराज मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली. शिवराज मोरे […]Read More

राजकीय

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात शिवसेनेचे आंदोलन

मुंबई प्रतिनिधी– कोटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव देण्यात आलेल्या मेट्रो स्थानकाविरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ चे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांचे नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी या स्थानकावर “कोटक” या नावावर स्टिकर लावून, “छत्रपती शिवाजी महाराज सन्मान” असे नाव देण्याची मागणी केली.शिवसैनिकांचा ठाम आग्रह आहे की, […]Read More

राजकीय

एसटी आता करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री

मुंबई दि १ — उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारच्या व्यावसायिक भागिदारीतून एसटी महामंडळ राज्यभरात स्वतःच्या जागेवर विविध ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्रीचे रिटेल विक्री (किरकोळ विक्री) पंप सुरू करीत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळाची […]Read More

गॅलरी

आज परदेश प्रवासाची पंचवीशी पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, दि १काँग्रेसचे वरिष्ठ नेते, कामगार नेते महेंद्र घरत यांना गेल्या 25 वर्षाचा आलेला अनुभव त्यांनी परदेशवारीची 25 वर्षे या पुस्तकातून व्यक्त केला असून या पुस्तकाचे प्रकाशन दोन ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता सिद्धिविनायक बँक्वेट हॉल,शेलघर येथे होणार आहे. घरत यांना परदेशवारीची 25 वर्षे गेली पंचवीस वर्ष राजकीय, कामगार क्षेत्रा बरोबरच मित्र, सहकारी, परिवार, नातेवाईक […]Read More

सांस्कृतिक

गोकुळाष्टमी निमित्त राज्यातील १.५० लाख गोविंदांना विमा संरक्षण

मुंबई, दि. १:– गोकुळाष्टमी अर्थात दहिहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा सण असून या उत्सवात राज्यातील हजारोात युवक-युवती “गोविंदा” म्हणून थरावर थर रचत हंडी फोडण्यासाठी सहभागी होतात. मात्र गेल्या काही वर्षांत सरावादरम्यान आणि प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी अनेक अपघात घडले असून, अनेक गोविंदांना दुखापतींचा सामना करावा लागतो. गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विमा संरक्षण मिळावे […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री तुळशीबाग मंडळाचे भव्य रक्तदान शिबिराचे

पुणे, दि १– मानाचा चौथा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेले श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट आणि रुद्रांग वाद्य पथक ट्रस्ट, पुणे, स्वरूप वर्धिनी, शिवमुद्रा, गजलक्ष्मी यांच्या संयुक्त विद्यमाने शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात […]Read More

मराठवाडा

अफ्रिकन गोगलगायीचे संकट; सोयाबीन पिकांचे नुकसान…

लातूर दि १:– शंखी गोगलगायीच्यानंतर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभे राहिले आहे. लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील शेतकऱ्याच्या शेतात सध्या आफ्रिकन गोगलगायीचा प्रादुर्भाव झालाय. आफ्रिकन गोगलगायीमुळे त्यांच्या दोन एकर शेतातील सोयाबीनचे नुकसान झाले आहे. महादेव गोमारे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून आफ्रिकन गोगलगायीचा प्रादुर्भाव त्यांच्या शेतात दिसून येत आहे यामुळे […]Read More