Month: July 2025

महानगर

पनवेल एसटी डेपोचा रखडलेला महत्वपूर्ण विकास मार्गी लावावा.

मुंबई, दि २८पनवेल एसटी डेपो हा महाराष्ट्रातील काही प्रमुख मोठ्या बस आगारांपैकी एक मानला जातो. कोकण, तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या पनवेलचे भौगोलिक महत्त्व हे फार मोठे आहे व अनेक वर्षांपासून पनवेल बस डेपो येथून हजारो एसटी बसेसची वाहतूक होत असते. आजही पनवेल बस डेपो मधून दिवसाला अडीच हजार गाड्या ये-जा करतात. अशा स्थितीमध्ये […]Read More

कोकण

तुळजाई बोट दुर्घटनेतील तिघांचे मृतदेह ५० तासांनंतर सापडले.

अलिबाग दि २८– रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा येथून मच्छीमारी साठी निघालेली ‘तुळजाई ही वोट शनिवारी खांदेरी किल्ल्यानजीक समुदात लाटांच्या जोरदार पहाटामुळे पलटी झाली होती.या दुर्घटनेत बोटीवरील आठ मच्छीमारांपैकी पाच जण सुटून किनाऱ्यावर पोहोचले होते. मात्र तिघे बेपत्ता झाले होते. अखेर तव्वल ५० तासांच्या शोधानंतर आज सकाळी तिघांचे मृतदेह सापडले. नरेश राम शेलार, धीरज कोळी […]Read More

महानगर

अ‍ॅप आधारित रिक्षा-टॅक्सी आणि ई-बाईक सेवा आता सरकारकडून

मुंबई दि २८ — राज्य सरकारने मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात असून प्रवासी वाहतुकीसाठी अ‍ॅप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता, परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणाऱ्या या ॲप ला जय महाराष्ट्र, महा – राईड, महा-यात्री, महा-गो यापैकी एखादे नाव देणे […]Read More

क्रीडा

महाराष्ट्र कन्या दिव्या देशमुख नवी महिला बुद्धिबळ जागतिक विजेती

जॉर्जियामधील बटुमी येथे पार पडलेल्या FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुखने अभूतपूर्व कामगिरी करत अंतिम फेरीत अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला पराभूत केलं आणि भारताची पहिली महिला विश्वविजेती ठरली आहे. दिव्या देशमुखने वयाच्या केवळ १९व्या वर्षी हे यश संपादन करून भारताच्या बुद्धिबळ क्षेत्रात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या विजयामुळे दिव्या भारताची […]Read More

राजकीय

रविंद्र चव्हाण यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

नवी दिल्ली दि २८– भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र भाजपची संघटनात्मक घडामोडी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन व पक्षवाढीची दिशा याबाबत सविस्तर माहिती चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली. जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष […]Read More

गॅलरी

भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या डॉ. सायरस पूनावाला स्कूल फॉर हिअरिंग

पुणे, दि २८सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे चेअरमन व सायरस पूनावाला ग्रुपचे प्रमुख, तसेच जगातील सर्वात मोठे लस उत्पादक असलेले डॉ. सायरस एस. पूनावाला यांच्या हस्ते पुण्यातील लुल्ला नगर येथील ‘शताब्दी केंद्र’ येथे भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या डॉ. सायरस पूनावाला स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअरड या शाळेच्या नव्याने बांधलेल्या भव्य इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या […]Read More

राजकीय

एशियाटिक बिग कॅट सोसायटीचा ‘राष्ट्रीय पुरस्कार-2025’ सुब्बिया नल्लामुथु यांना प्रदान

मुंबई, दि २८एशियाटिक बिग कॅट सोसायटी आणि वन्यजीव शाखा, वन विभाग, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा पहिला राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर सुब्बिया नल्लामुथु यांना हा पुरस्‍कार प्रदान केला जाणार आहे. एक लाख रुपये, स्‍मृतिचिन्‍ह, सन्‍मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्‍काराचे स्‍वरूप आहे.आंतरराष्ट्रीय व्याघ्र […]Read More

साहित्य

सुप्रसिद्ध लेखिका शुभांगी भडभडे यांचे निधन

नागपूर दि २८– सुप्रसिद्ध लेखिका,ज्येष्ठ कादंबरीकार शुभांगीताई भडभडे यांचे आज सकाळी नागपूर येथे निधन झाले. वयाची ८० वर्षं पूर्ण झाल्यानंतरही नित्य लेखन करणाऱ्या शुभांगीताई खऱ्या अर्थाने साहित्यसाधक होत्या.८० कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, वैचारिक,स्फुट असे विपुल लेखन त्यांनी केले आहे. चरित्रात्मक कादंबरी ही त्यांची विशेष ओळख. शुभांगीताई साहित्य क्षेत्रातील उत्तम संघटकही होत्या. वैदर्भीय लेखकांना व्यासपीठ देण्यासाठी त्यांनी […]Read More

मराठवाडा

घृष्णेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्त भाविकांची गर्दी….

छ संभाजीनगर दि २८– श्रावण महिन्याची सुरुवात झाली असून पहिल्या श्रावण सोमवार निमित्त देशभरातील शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलीय.आज श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी बारावे ज्योतिर्लिंग असलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर शिवभक्तांनी गजबजून गेलं आहे . बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या दर्शनाला मोठं महत्त्व आहे. १२ […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

काळम्मावाडी धरणाचे दरवाजे उघडले, नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा.

कोल्हापूर दि २८:– कोल्हापूर जिल्ह्यातील दुधगंगा नदीवरील काळम्मावाडी धरणाचे पाचही दरवाजे काल सायंकाळी उघडले. त्यामुळे धरणातून २ हजार घनफूट प्रतिसेकंद प्रमाणे पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. या पाण्याच्या विसर्गामुळे कोल्हापूर आणि बेळगांव या सीमेवरील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता दोन्ही राज्यांच्या प्रशासनाने स्थानिक लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. दूधगंगा धरणाच्या पाणलोट […]Read More