Month: July 2025

राजकीय

नियमबाह्य जमीन परवाने देणारा अधिकारी निलंबित, उर्वरित आठ जणांची चौकशी

मुंबई दि ४– नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात तुकडेबंदी कायद्याची पायमल्ली करून सरकारी रक्कम जमा न करता जमिनींच्या परवानग्या दिल्याप्रकरणी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याला निलंबित करण्याची आणि आठ नोंदणी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. याबाबतचा मूळ प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता. दोन सलग जमिनींची अदलाबदल करण्याचे अधिकार असताना दोन स्वतंत्र […]Read More

राजकीय

पवनचक्की उभारण्यासाठी शेतकऱ्यांना दमदाटी, उच्चस्तरीय चौकशी जाहीर

मुंबई दि ४ — धाराशीव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांकडून स्थानिक गुंड आणि पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याप्रकरणी येत असलेल्या सर्व तक्रारींची पोलिस महानिरीक्षकाकडून उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत केली. यासंदर्भातील लक्षवेधी कैलास पाटील यांनी उपस्थित केली होती. पवनचक्की कंपन्यांचे दलाल स्थानिक गुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यांना मारहाण करतात, शेतकऱ्यांना चेक […]Read More

राजकीय

स्थानिक स्वराज्य संस्थांनानोंदणी शुल्काची रक्कम त्वरित…

मुंबई दि ४ — राज्यातील मालमत्ता खरेदी विक्रीची नोंदणी झाल्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हिश्शाचा एक टक्का रक्कम त्वरित देण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्यात येईल , यासाठी मुख्यमंत्र्यांसमोर विषय मांडून त्यावर निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना रणधीर सावरकर यांनी उपस्थित केली होती. सध्या राज्यातील […]Read More

राजकीय

तालिका अध्यक्षांनी केलेल्या राजकीय शेरेबाजीवर विरोधकांनी घेतला आक्षेप

मुंबई, दि.४ – शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत विरोधकांनी २९३ अन्वये प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावावर बोलण्यासाठी विरोधकांनी नाव दिले होती. पण काही आमदार उपस्थित नसल्याने तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी राजकीय शेरेबाजी केली. यावर विरोधकांनी विधानसभेत आक्षेप घेतला. या प्रस्तावावर चर्चा होत असताना कृषिमंत्री, त्या विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते, तरी कामकाज सुरू ठेवले होते. पण काही […]Read More

गॅलरी

“माय गो विठ्ठल” हे भक्तिगीत प्रदर्शित*

पुणे, दि ४पंढरपूरच्या आषाढी वारीचं औचित्य साधत आणि लाखो भाविकांची विठ्ठलावरची निस्सीम श्रद्धा याला समर्पित असलेलं एक नवं भक्तिगीत “माय गो विठ्ठल” नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या अभिनयाने सजलेलं हे गीत आहे. अमृतासोबत गाण्यात वैभवी पवार आणि बालकलाकार शार्वी बागडे यांनी काम केले आहे. गाण्याच्या संगीताची धुरा निनाद म्हैसाळकर यांनी सांभाळली […]Read More

महाराष्ट्र

राज्यासमोर हायड्रो गांजांचे मोठे आव्हान

मुंबई, दि. ३ : विधान परिषदेत अंमली पदार्थांच्या फैलावावर सविस्तर चर्चा झाली. राज्यासमोर हायड्रो गांजाच्या फैलावाचे मोठे आव्हान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नवीन जिचकर नावाच्या व्यक्तीने ऑस्ट्रेलियात बेट खरेदी करून हायड्रो गांजाची निर्मिती केली आणि तो थायलंड व अमेरिकेतून कुरियरद्वारे भारतात पाठवत होता. या तस्करीत पोस्टाचे कर्मचारी आणि पोलिसांचाही सहभाग आढळून आला आहे. अंमली पदार्थांच्या […]Read More

ट्रेण्डिंग

दिशा सालियन ने आत्महत्याच केली, बलात्कार नाहीच, पोलिसांची भूमिका

मुंबई, दि. ३ : मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात, मुंबई पोलिसांनी दिशा सालियनचा मृत्यू आत्महत्याने झाल्याचा आपला पवित्रा पुन्हा एकदा स्पष्ट केला आणि बलात्कार किंवा हत्येचे सर्व आरोप फेटाळून लावले. एसआयटीविरुद्ध सीबीआय चौकशी आणि एफआयआर मागण्याची याचिका फेटाळण्याची मागणी पोलिसांनी केली.त्यांनी असे नमूद केले: दरम्यान दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दिशाचा अपघाती मृत्यू झाल्यावर […]Read More

देश विदेश

पंतप्रधान मोदींना घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाच्या ‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले आहे. 30 वर्षांनंतर प्रथमच घाना भेटीवर गेलेल्या भारतीय पंतप्रधानाला मिळालेला हा सन्मान भारत आणि घाना यांच्यातील मैत्रीला अधिक दृढ करणारा आहे, असे मोदी म्हणाले. आपल्या स्वीकार भाषणात त्यांनी हा पुरस्कार दोन्ही देशांच्या तरुणांच्या आकांक्षांना, सांस्कृतिक […]Read More

पर्यटन

कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा सुरू

जम्मू-काश्मीर, दि. ३ : आजपासून अतिशय कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा सुरू झाली असून, देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी “बम बम भोले” च्या जयघोषात पवित्र अमरनाथ गुहेकडे प्रस्थान केले आहे. ही यात्रा ३८ दिवस चालणार असून, ९ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेला समाप्त होईल. जम्मू येथील भगवती नगर बेस कॅम्पवरून लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी पहिल्या जत्थ्याला […]Read More

बिझनेस

पतंजली च्यवनप्राशच्या जाहिरातीवर न्यायालयाकडून बंदी

नवी दिल्ली, दि. ३ : दिल्ली उच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदला डाबर च्यवनप्राशविरुद्ध कोणतीही नकारात्मक किंवा दिशाभूल करणारी जाहिरात दाखवू नये असे निर्देश दिले आहेत. डाबरने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांनी हा आदेश दिला. तसेच सध्या पतंजली च्यवनप्राशच्या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली आहे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ जुलै रोजी होणार […]Read More