Month: July 2025

राजकीय

महाराष्ट्राने अमूल, मदर डेअरी प्रमाणे दुधाचा ब्रँड निर्माण करावा

मुंबई दि ७ — दुधाच्या उत्पादनात सहकाराच्या माध्यमातून ज्याप्रमाणे गुजरात राज्याने ‘अमूल’, दिल्लीने ‘मदर डेअरी’ व कर्नाटकने ‘नंदिनी’ ब्रँड तयार केला त्याप्रमाणे महाराष्ट्राने सहकार संस्थांच्या माध्यमातून दुधाचा सामायिक ब्रँड निर्माण करावा, अशी सूचना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ तसेच केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या […]Read More

राजकीय

मालाडच्या शंकरवाडी रस्ता रुंदीकरणातील ६४ प्रकल्प बाधितांना चावीवाटप

मुंबई प्रतिनिधी : महापालिकेच्या प्रलंबित प्रकल्पांना वेग आला पाहिजे आणि त्यात प्रकल्पबाधितांना घरे दिली जात असताना मोकळ्या जागेवर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.मालाड पश्चिम येथील शंकर लेन (मिसिंग लिंक) रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित झालेल्या रहिवाशांना पर्यायी पुनर्वसनअंतर्गत […]Read More

गॅलरी

ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण!

पुणे, दि ७ ‘येरे येरे पैसा ३’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे ‘उडत गेला सोन्या’ प्रदर्शित झाले असून, त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. हे गाणे एका वेगळ्या आणि मनोरंजक पद्धतीने सादर करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात सनी आणि […]Read More

राजकीय

हॉटेल ‘व्हिट्स’ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा…

मुंबई, दि. ७ :–छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल ‘व्हिट्स’च्या लिलावातील गैर प्रक्रियेचे पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटलेले पाहायला मिळाले. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीने लिलावात राजकीय दबावाचा वापर केल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीची घोषणा यावेळी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी लक्षवेधी सूचना मांडत, हॉटेल ‘व्हिट्स’च्या खरेदी व्यवहारात […]Read More

राजकीय

कासारवडवली उड्डाणपूल प्रकल्पामुळे वाहतूक सुलभतेस नवा आयाम

ठाणे दि.७ — ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या वाहतूक प्रकल्पांपैकी एक असलेला कासारवडवली उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टप्पा अंतिम टप्यात असून उद्यापासून हा पुल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले, कासारवडवली उड्डाणपूलाच्या पहिल्या टप्प्यात डाव्या बाजूची मार्गिका उद्यापासून वाहतुकीसाठी खुली होणार असून या उड्डाणपूला वर ३०० मीमी जाडीचा एम-40 […]Read More

ट्रेण्डिंग

भंडारदरा धरण परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग

अहिल्यानगर दि. ७ — जिल्ह्यातील भंडारदरा परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याने आदिवासी जन जीवन विस्कळीत झाले आहे. तसेच भागातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या भागात भात पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. थंडी वाऱ्यामुळे जनावरेही गारठली आहेत. असाच पाऊस पडत राहिला तर जनावरही दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर […]Read More

राजकीय

भरतीप्रक्रियेत सुधारणा करून सरकारकडून मेगाभरती….

मुंबई दि ७ — राज्य सरकारने सत्तर हजार जागांची भरती जाहीर केली होती मात्र प्रत्यक्षात ती एक लाखांच्या वर पोहोचली आहे. आता १५० दिवसांच्या कार्यक्रमात सर्व विभागांना आकृतीबंध सुधारून, भरतीसेवा नियम नव्याने तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, ते होताच मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासंदर्भातील […]Read More

राजकीय

बोगस अंगणवाडी सेविका, दोन अधिकारी निलंबित…

मुंबई दि ७ — नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात असणाऱ्या अंगणवाडीत प्रत्यक्ष नियुक्त सेविकेऐवजी तिच्या नातेवाईक स्त्री ने खोटी कागदपत्रे सादर करून मूळ सेविकेचा पगार हडप केल्याप्रकरणी विधानसभेत मंत्री आणि सत्तारूढ सदस्यांमध्ये जोरदार चकमक उडाली अखेर दोन अधिकारी निलंबित करण्याची घोषणा मंत्र्यांनी केली. या प्रकरणी चौकशी करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १९९६ […]Read More

महानगर

धामणी धरणाचे पाच ही दरवाजे उघडले, सूर्या नदीत विसर्ग सुरू

पालघर दि ६:– पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनेक भागांत जोरदार पाऊस बरसत आहे. सध्या जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झाली असून सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाच ही दरवाजे उघडण्यात आले आहेत. धामणी आणि कवडास या धरणांमधून सूर्या नदीत चाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग […]Read More

राजकीय

मतदारयाद्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसची समिती

मुंबई, दि. ६ —विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यात विविध मार्गाने गैरप्रकार करून भाजपाने विजय मिळवला आहे हे उघड झालेले आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपाने चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवली पण यापुढे असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती गठीत केली आहे. माजी मुख्यमंत्री […]Read More