Month: July 2025

महानगर

किन्नर उपचारासाठी स्वतंत्र कक्षाचा प्रश्न मार्गी लागणार.

मुंबई, सोमवार, दिनांक ७/७/२०२५ रोजीराज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मा. श्री. प्रकाशजी आबिटकर यांची आज विधान परिषद सदस्य मा. आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत किन्नर (ट्रान्सजेंडर) समुदायासाठी राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष (वाॅर्ड) स्थापन करण्याबाबत महत्वपूर्ण विषय उपस्थित करण्यात आला.या चर्चेदरम्यान, ठाणे जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार […]Read More

ट्रेण्डिंग

वर्ध्यात खादीच्या कापडापासून T-Shirt निर्मिती

वर्धा, दि. ७ : महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित वर्ध्यातील मगन संग्रहालय समितीने खादीच्या कापडापासून टी-शर्ट तयार करण्याचा देशातील पहिलाच यशस्वी प्रयोग केला आहे. पारंपरिक खादीला आधुनिकतेची जोड देत, या उपक्रमाने खादीला नव्या पिढीमध्ये लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला आहे. देशी कापूस, सेंद्रिय शेती, नैसर्गिक रंग आणि गांधीवादी विचारांचा संगम असलेली ही निर्मिती सध्या चर्चेचा विषय ठरली […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

म्हशी घेण्यासाठी वडीलांनी साठवले ५ लाख, मुलाने उडवले गेममध्ये

कोल्हापूर, दि. ७ : जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबात अलीकडेच एक धक्कादायक घटना घडली. या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी, विशेषतः दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी, तब्बल सात लाख रुपये साठवले होते. त्याच्या मनात एकच स्वप्न होतं — एक चांगली म्हैस विकत घेऊन नियमित दूध विक्री करून उत्पन्नाचा स्थिर स्रोत निर्माण करायचा. मात्र, त्याच्या सहावीत […]Read More

ट्रेण्डिंग

डासांपासून मुक्तीसाठी आंध्रप्रदेशने घेतली AI ची मदत

अमरावती, दि. ७ : आंध्र प्रदेश सरकारने डासांमुळे होणाऱ्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक अभिनव तंत्रज्ञानाधारित उपक्रम सुरू केला आहे. ‘स्मार्ट मच्छर देखरेख प्रणाली (Smart Mosquito Surveillance System – SMoSS)’ असे या प्रकल्पाचे नाव असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोन आणि IoT सेन्सरच्या मदतीने डासांची संख्या, प्रजाती, हवामान स्थिती आणि संसर्गजन्य रोगांचा प्रसार यावर लक्ष ठेवले जाणार […]Read More

महानगर

निरंजन डावखरे यांनी भिवंडीतील गोदामांवर उपस्थित केला गंभीर प्रश्न

मुंबई दि ७ — भिवंडी परिसरातील अंजूर फाटा, दापोडे या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या गोदामांची बांधकामे सुरू आहेत, त्यासोबतच यामध्ये अग्निशमन सुरक्षेचा अभाव, नियमनाच्या नियमांचे उल्लंघन, आणि जीविताला धोका निर्माण करणाऱ्या रसायनांचा साठा केल्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी आज विधान परिषदेत हे गंभीर मुद्दे उपस्थित करत […]Read More

महिला

पानिपतच्या तरुणीने अमेरिकेत जिंकली 2 सुवर्णपदके

हरयाणा, दि. ७ : पानिपतमधील नौलथा गावातील तरुणी आणि ITBP मध्ये कॉन्स्टेबल असलेली नीतू जगलान हिने अमेरिकेतील बर्मिंगहॅम येथे एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तिने २१ व्या जागतिक पोलिस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धा २०२५ च्या कराटे स्पर्धेत एकेरी आणि दुहेरी दोन्ही प्रकारात सुवर्णपदके जिंकली. नीतूचे हे पहिले आंतरराष्ट्रीय यश नाही. तिने २०१९ मध्ये चीनमध्ये […]Read More

देश विदेश

या राज्यात पदोन्नतीतील आरक्षणाला स्थगिती

भोपाळ, दि. ७ : मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने सध्या पदोन्नतीतील आरक्षणाला स्थगिती दिली आहे. आज पदोन्नतीच्या नवीन नियमांवर सुनावणी झाली. न्यायालयाने सरकारला विचारले की, जुने नियम (२००२) आणि नवीन नियम (२०२५) यात काय फरक आहे? सरकार याचे स्पष्ट उत्तर देऊ शकले नाही. यावर, कार्यवाहक मुख्य न्यायाधीश संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती विनय सराफ यांच्या खंडपीठाने सांगितले […]Read More

सांस्कृतिक

‘श्री रामायण यात्रा ‘ विशेष ट्रेनचा पाचवा दौरा सुरू

नवी दिल्ली, ७ : भारतीय रेल्वेच्या IRCTC द्वारे आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री रामायण यात्रा’ विशेष ट्रेनच्या पाचव्या टप्प्याला २५ जुलैपासून दिल्ली सफदरजंग स्थानकावरून सुरुवात होणार आहे. ही १७ दिवसांची यात्रा भारत आणि नेपाळमधील ३० हून अधिक पवित्र स्थळांना भेट देणार आहे, जी प्रभू श्रीरामाच्या जीवनाशी संबंधित आहेत. प्रवासी दिल्ली व्यतिरिक्त गाझियाबाद, अलीगढ, लखनऊ, कानपूर, झाँसी, […]Read More

राजकीय

हिंदी सक्तीचा निर्णय महाविकास आघाडीचा, अहवाल सार्वजनिक करणार

मुंबई दि ७ — नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी साठी नेमलेल्या डॉ रघुनाथ माशेलकर समितीचा अहवाल तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने स्वीकारला होता, त्यात हिंदी भाषा सक्ती करण्याची शिफारस करण्यात आली होती, हा अहवाल सभागृहाच्या पटलावर सादर करण्यात येईल आणि सर्व सदस्यांना देखील उपलब्ध करुन देण्यात येईल अशी माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत […]Read More

आरोग्य

पश्चिम उपनगरातील नागरिकांसाठी रक्तचाचणी अद्ययावत सुविधा

मुंबई दिनांक ७ जुलै २०२५पश्चिम उपनगरातील नागरिकांसाठी रक्तचाचणी अद्ययावत सुविधा पश्चिम उपनगरातील नागरिकांसाठी रक्तचाचणी अद्ययावत सुविधापश्चिम उपनगरातील नागरिकांसाठी रक्तचाचणी अद्ययावत सुविधा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. रू. न. कूपर रूग्णालयात उपलब्ध झाली आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू रूग्णांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. अद्ययावत आणि अधिक क्षमता असलेल्या रक्तातील बायोकेमिस्ट्री विश्लेषण करणाऱया […]Read More