Month: July 2025

विदर्भ

संततधार पावसाने, पुराने बारा गावांचा संपर्क तुटला; गोसेखुर्द धरणाचे ३३

चंद्रपूर दि ९ :–चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे शिवार जलमय झाले असून, नाल्यांना पूर आला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात रपटे वाहून गेल्याने आणि पुलांवरून पाणी वाहत असल्याने १२ गावांचा संपर्क तुटला आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ गेट उघडल्याने वैनगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या पावसामुळे खुल्या खाणीतील कोळसा […]Read More

ट्रेण्डिंग

पंचवीस वर्षांनंतर स्मृती इराणींचे टीव्हीवर पुनरागमन

मुंबई, ८ : तब्बल पंचवीस वर्षांनंतर, अभिनेत्री ते केंद्रीय मंत्री झालेल्या स्मृती इराणी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात गाजलेली भूमिका — ‘तुलसी विराणी’ — पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या आयकॉनिक मालिकेचा रिबूट व्हर्जन ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ लवकरच प्रदर्शित […]Read More

मराठवाडा

जालना जिल्ह्यात २१ तलाठी, लिपिक निलंबित

मुंबई, ८ जुलै : अवकाळी पावसासाठी मदत वाटपात अनियमितता झाल्याच्या आरोपावरून महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील २१ तलाठी आणि लिपिकांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती राज्यमंत्री मकरंद जाधव यांनी मंगळवारी दिली. विधान परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणाले की, २०२२-२३ साठी अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानासाठी सरकारने […]Read More

मनोरंजन

या आगामी मराठी चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

मुंबई, दि. ८ : मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानास्पद घटना ठरली आहे. कोकणातील लोककला, निसर्गसौंदर्य आणि पौराणिक कथांचा संगम असलेल्या ‘दशावतार’ या आगामी मराठी चित्रपटाच्या पहिल्या झलकला आंतरराष्ट्रीय स्तरावर भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध यूट्यूब कंटेंट क्रिएटर्स कोर्बिन माईल्स आणि रिक सीगल (Our Stupid Reactions) यांनी या चित्रपटाच्या टीझरचे विशेष कौतुक केले आहे. त्यांनी टीझरमधील […]Read More

देश विदेश

छत्रपती शिवरायांचा युनेस्कोमध्ये गौरव

छत्रपती शिवाजी महाराजांचा युनेस्कोमध्ये आंतरराष्ट्रीय गौरव करण्यात आला. ग्रीसचे राजदूत राजदूत जॉर्जिओस कौमुत्साकोस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. यासह छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, हिंदवी स्वराज्य आणि राजमुद्रेवरील शब्दांचं त्यांच्याकडून कौतुक करण्यात आलंय. राजदूतांनी असेही म्हटले आहे की, ‘शहाजींचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या राजमुद्रेचा महिमा चंद्राच्या कले सारखा वाढत जाणारा आहे. यापुढेही […]Read More

महानगर

PETA चा अजब दावा, म्हणे कबुतरं पण मुंबईकरच

मुंबई, दि. ८ : कबुतरांच्या अती संख्येमुळे मुंबईकरांना होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर उपाय म्हणून मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात प्राणिहक्कांसाठी लढणाऱ्या पेटा या स्वयंसेवी संस्थेने मोहीम उघडली आहे. कबुतरखान्यांजवळ संस्थेने मोठे फलक उभारून मुंबईतील कबुतरे हीसुध्दा मुंबईकरच आहे, असा संदेश या फलकांवर लिहिला आहे. नुकतीच मुंबई महानगरपालिकेने दादरचा कबुतरखाना हटवण्यासाठी मोहीम सुरू […]Read More

राजकीय

शिक्षक उतरले आंदोलनात पण शाळांना सुट्टी नाही

मुंबई, दि. ८ : राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज आणि उद्या म्हणजेच आठ आणि नऊ जुलै 2025 रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील हजारो शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी अनुदान आणि आपल्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी आज आणि उद्या मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन करण्याची मोठी घोषणा केली आहे. […]Read More

राजकीय

20 टक्क्यांनी वाढल्या मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या

मुंबई, दि. ८ : सरकार कोणतेही असो शेतकऱ्यांच्या समस्यांवर योग्य तोडगा निघत नाही, हेच भीषण वास्तव आज पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असल्याचं वास्तव सरकारने नुकतंच विधान परिषदेत मांडलेल्या आकडेवारीतून स्पष्ट केलं आहे. या वर्षी जानेवारी ते मार्च 2025 या अवघ्या 3 महिन्यांच्या कालावधीत राज्यात तब्बल 767 शेतकऱ्यांनी […]Read More

देश विदेश

उद्या भारत बंदची हाक, 25 कोटी कामगार उतरणार रस्त्यावर

मुंबईो, दि. ८ : केंद्र सरकारची मजूर, कामगारविरोधी धोरणं, शेतकऱ्यांच्या विरोधातील आणि कॉर्पोरेट धार्जिणी धोरणं याविरोधात उद्या भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे. सरकारकडून आर्थिक आणि कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे मजुरांचं अधिकार आणखी मर्यादित होतील. व्यापार करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या नावाखाली सरकार सर्वसामान्यांना नाडत असल्याचा आरोप संघटनांचा आहे. देशातील १० केंद्रीय कामगार […]Read More

महानगर

कार्यालयाच्या वेळा बदला, मध्य रेल्वेकडून कंपन्यांना विनंतीपत्र

मुंबई, दि. ८ : मुंबईमध्ये लोकलद्वारे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. लोकलच्या फेऱ्या कितीही वाढवल्या तरीही मोठ्या संख्येने असणाऱ्या प्रवाशांना सुविधा देताना रेल्वेवर मोठा ताण येत आहे. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीची समस्या सोडवण्यासाठी काही उपाययोजना आखल्या आहेत. त्यासाठी मध्य रेल्वेने मुंबईतील शासकीय आणि खासगी अशा […]Read More