मुंबई, दि. १५ : जगप्रसिद्ध उद्योगजक इलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी टेस्लाने कंपनीने शोरुम आता मुंबईत देशातील पहिले शोरूम सुरु केले आहे. आज मुंबईतील बीकेसीमध्ये या शोरूमचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. टेस्लाने आपल्या शोरूमच्या पाट्या मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लावून मराठी भाषेला विशेष मान […]Read More
पुणे, दि १५: शहराच्या पश्चिम भागातील औंध, बालेवाडी व खडकी या रहिवासी आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या परिसरांमध्ये गेल्या काही दिवसांत भरदिवसा होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये चिंताजनक प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यांवरून जाणाऱ्या नागरिकांच्या दागिन्यांची उघडपणे चोरी, घरे व व्यावसायिक स्थळांवर धाडसी चोऱ्या यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावत आहे. या घटनांना आळा घालावा आणि दोषींवर तत्काल कारवाई करण्याची […]Read More
मुंबई, दि. १५ : राज्यातील ओला कंपनीच्या 385 शोरूमना टाळं लागलं आहे. राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या भरारी पथकांनी केलेल्या ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी सर्व्हिसेस (ओला) कंपनीच्या शोरूम तपासणीमध्ये 432 शोरूमपैकी केवळ 47 शोरूमकडे विक्री परवाना असल्याचे आढळले. त्यामुळे ओलाचे उर्वरित 385 शोरूम बंद करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. […]Read More
ठाणे,दि. १५ : अतिशय वेगाने विस्तारणाऱ्या ठाणे शहरात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न जटील बनला आहे. गेल्या सात वर्षांपासून ठाणे महापालिका दिवा येथे बेकायदा डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा टाकत आहे. त्यामुळे खारफुटीसह जैवविविधतेची झालेली हानी,ओल्या कचऱ्याने केलेले भूजल प्रदूषण, दुर्गंधीचा असह्य त्रास आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका याची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठाणे […]Read More
कॅलिफोर्निया,दि. १५ : अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर २० दिवस अंतराळात घालवल्यानंतर पृथ्वीवर परतले आहेत. सुमारे २३ तासांच्या प्रवासानंतर, ड्रॅगन अंतराळयान आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरले. याला स्प्लॅशडाउन म्हणतात. हे चारही अंतराळवीर एक दिवस आधी सायंकाळी ४:४५ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर रवाना झाले होते. सर्व अंतराळवीर २६ जून रोजी भारतीय वेळेनुसार […]Read More
मुंबई दि १५:– रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी, संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री आणि राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर जिल्ह्यातील इतर नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खेड, दापोली, संगमेश्वर, लांजा, राजापूर आदी तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नदी काठच्या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी काही भागातील शेती तसेच रस्ते पाण्याखाली […]Read More
महाड दि १५ (मिलिंद माने)– कोकणात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे पाणीटंचाई जरी निर्माण झाली नसली तरी सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पाणी साठवण करणारी धरणे ओसंडून वाहू लागली. मात्र जुलै महिन्यात मागील दोन दिवसात सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील महाड पोलादपूर तालुक्यासह रत्नागिरी व सातारा जिल्ह्याच्या सीमावरती भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाडमध्ये […]Read More
महाड दि १५(मिलिंद माने )– छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर आगामी १५ ऑगस्ट पर्यंत संभाव्य आपत्तीमुळे जीवित अथवा वित्तहानी होऊ नये या उद्देशाने रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गडावर जाणारा पायरी मार्ग सर्व नागरिक, पर्यटकांसाठी प्रतिबंधित केल्याची माहिती लेखी आदेशाद्वारे दिली आहे. मात्र पायरी मार्ग बंद म्हणजे रायगड रोपे चा गल्ला […]Read More
मुंबई दि १५ — मीरा -भाईंदर महापालिका हद्दीतील क्लस्टर योजनेच्या बाहेरील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास तातडीने करण्यासाठी आवश्यक त्या परवानगी देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्याला दिल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मीरा -भाईंदर महापालिका हद्दीतील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बोलावलेल्या बैठकीच्या अनुषंगाने बोलत होते. […]Read More
मुंबई दि १५ – मुंबईतील प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो मार्गिका २ए आणि ७ वरील फेऱ्या वाढवण्यास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला. ८ जुलै, […]Read More