Month: July 2025

राजकीय

सिडकोचे अधिकारी ऐकत नाहीत, आमदारांनी दिली राजीनाम्याची धमकी

मुंबई दि १७– पुढील दोन महिन्यात नवी मुंबईत सिडकोच्या ताब्यातील पाणी पुरवठा योजना स्वयंचलित तंत्रज्ञान पद्धतीवर नेण्यासाठी निविदा काढण्यात याव्यात अशी सूचना सिडको प्रशासनाला करण्यात येतील अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली.याप्रकरणी असंख्य वेळा मागणी करूनही कारवाई केली जात नाही आता राजीनामे देतो अशी संतप्त भावना प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करताना […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यातील रुग्णालयांमध्ये ‘कोड पिंक’ लागू

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र सरकारने आता ‘कोड पिंक’ (Code Pink in Maharashtra) या जागतिक मान्यताप्राप्त रुग्णालय आपत्कालीन प्रोटोकॉलला अधिकृतपणे अंमलात आणले आहे. हा उपक्रम राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये नवजात आणि लहान मुलांच्या अपहरणाला प्रतिबंध घालण्यासाठी लागू करण्यात आला आहे. गर्दीच्या रुग्णालयांमध्ये बाळ चोरीच्या वाढत्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, सर्वात असुरक्षित रुग्णांसाठी मजबूत सुरक्षा […]Read More

देश विदेश

बिहार विधानसभा निवडणुकीत चौपन्न लाख मतदार वगळले जाणार ?

पटना, दि. १६ : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या विशेष गहन पुनरीक्षण मोहिमेचा (Special Intensive Revision – SIR) अंतिम टप्पा आता सुरू झाला आहे. २४ जून २०२५ रोजी एकूण मतदारांची संख्या ७,८९,६९,८४४ होती. त्यापैकी ६,९९,९२,९२६ मतदारांनी आपले Enumeration Form सादर केले असून हे ८८.६५% इतके आहे. यापैकी ६,४७,२४,३०० फॉर्म्स ECINet वर अपलोड […]Read More

ऍग्रो

PM धन धान्य कृषी योजनेला सरकारची मंजुरी

नवी दिल्ली, दि. १६ : केंद्रीय कॅबिनेटमध्ये पीएम धन धान्य कृषी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. 24 हजार रुपये दरवर्षी खर्च होणाऱ्या, विविध 36 योजनांना एकत्र आणलेल्या पीएम धन-धान्य कृषी योजनेला केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाल्याची माहिती, केंद्रीय प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या योजनेमुळे देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तत्पूर्वी, यंदाच्या […]Read More

ट्रेण्डिंग

दिल्लीत सुरू होणार देशातले पहिले नेट-झिरो ई-कचरा पार्क

नवी दिल्ली, दि. १६ : दिल्ली होलंबी कलान येथे देशातील पहिला ग्रीन ई-कचरा इको पार्क सुरू होणार आहे. यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रदूषणमुक्त, निव्वळ शून्य सुविधा जागतिक हरित तंत्रज्ञान मानकांचे पालन करून इलेक्ट्रॉनिक कचरा पुनर्वापरात क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवते, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. वाढत्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याला तोंड देण्यासाठी आणि शाश्वत […]Read More

राजकीय

असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस मुंबई सीएसटी येथील मेळावा जल्लोषात.

मुंबई, दि १६असंघटित कामगारांना त्यांच्या प्रश्नांवर एकजुटीने व ताकदि ने संघर्ष करण्याचे आवाहन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व खासदार प्राध्यापक वर्षाताई गायकवाड यांनी केले .मार्गदर्शनपर भाषणामध्ये त्यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली फेरीवाले, घरेलू कामगार, छोट्या उद्योगांमध्ये काम करणारे कामगार, तसेच ओला, उबेर, झोमॅटो, ॲमेझॉन या प्लॅटफॉर्मवर काम करणारी कामगार यांच्या मागण्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे. […]Read More

राजकीय

जनसुरक्षा कायद्याला राज्यपालांनी मंजुरी देऊ नये

मुंबई, दि १६: राज्य सरकारच्या जनसुरक्षा विधेयक (बिल क्रमांक ३३ ,२०२४) ला मंजुरी देऊ नये, अशी मागणी “जनसुरक्षा विधेयकविरोधी संघर्ष समिती”ने आज राज्यपालांकडे केली. विविध राजकीय पक्ष व लोकचळवळींच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत राजभवन येथे राज्यपाल माननीय सी. पी. राधाकृष्णण यांना निवेदन सादर करण्यात आले.व या कायद्यातील विविध मुद्द्यांवर व जाचक तरतुदी बद्दल सविस्तर चर्चा केली. या […]Read More

महानगर

खासदार नरेश म्हस्के यांचा मध्य रेल्वे महाप्रबंधकांना इशारा

ठाणे – ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मुलभूत सोयीसुविधा देण्यात मध्ये रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी मध्ये रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची आज भेट घेऊन बैठक घेत चांगलाच सज्जड दम देत लवकरात लवकर विकासकामे पूर्ण न केल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.आरएलडीएच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरात लवकर होणे अपेक्षित […]Read More

महानगर

​परळ स्थानकात जलद गाडीच्या थांब्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणार

मुंबई दि १६:– बहुराष्ट्रीय कंपन्या आणि विविध कॉर्पोरेट्स कार्यालयांमुळे परळ स्थानकात वर्दळ वाढली आहे. तसेच या भागात अनेक मोठी हॉस्पिटल्स असल्याने या स्थानकात जलद गाडीला थांबा मिळावा अशी जनतेची मागणी असून यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करू असे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेतल्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात आयोजित केलेल्या जनता दरबारात […]Read More

राजकीय

झुडपी जंगलातील अतिक्रमण करणारे रहिवासी बेघर होणार नाहीत…

मुंबई दि १६– राज्यातील झुडपी जंगलात १९९६ पूर्वीच्या रहिवाशांना सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिलं आहे, त्यांच्यासह त्यानंतरच्या रहिवाशांची माहिती आवश्यक त्या स्वरूपात केंद्र सरकारकडे पाठवण्यात पुढील महिनाभरात पाठवण्यात येईल आणि त्यांनी परवानगी दिल्यास उर्वरित रहिवाशांसाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना नाना पटोले यांनी उपस्थित […]Read More