Month: July 2025

अर्थ

AI मुळे वाचले सरकारचे तब्बल 1045 कोटी रु.

मुंबई, दि. १७ : AI चा योग्य प्रकारे वापर केल्यास आर्थिक घोटाळे उघडकीस येत आहेत. अशा एका प्रकरणात AI मुळे सरकारचे 1 हजार 45 कोटी रु वाचले आहेत. कॅन्सर आणि किडनी फेल्युअर यांसारख्या गंभीर आजारांचा खोटा दावा करून इन्कम टॅक्स विभागाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. देशभरात तब्बल 4 हजार टॅक्सपेयर्सनी रिटर्नमध्ये खोटा […]Read More

महानगर

ठाण्यात झाडांची छाटणी केल्यामुळे ४५ पक्ष्यांचा मृत्यू

ठाणे. आज दिनांक १७/०७/२०२५ रोजी १७:५३ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार (घटनेची माहिती देणारे:- पक्षी मित्र श्री. रोहित मोहिते, मोबाईल क्रमांक:- +91 86577 69457) आनंद नगर, घोडबंदर रोड, ठाणे (प.) या ठिकाणी ऋतू इन्क्लेव्ह सोसायटीच्या आवारात बिल्डिंग नंबर ए७ समोर सोसायटीच्या आवारात खाजगी ठेकेदाराकडून झाडांची छाटणी केल्यामुळे अनेक पक्षी घरट्यांसोबत खाली […]Read More

राजकीय

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत विधिमंडळातच

मुंबई, दि १७ : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनात सत्ताधारी आमदार आणि विरोधक सभागृहात जनतेच्या प्रश्नांसाठी एकमेकांवर आगपाखड करत , आपला मुद्दा आक्रमकपणे मांडत असतात, असे साधारण चित्र आजवर दिसत असे. मात्र आता विधिमंडळात आमदार, मंत्री यांच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढू लागली आहे. हे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा धक्कादायक प्रकार आज विधिमंडळात घडला. […]Read More

राजकीय

स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये मिरा भाईंदर मनपा देशात प्रथम

नवी दिल्ली दि १७:– स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले असून राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यंदाच्या सर्वेक्षणात मिरा भाईंदर महानगरपालिकेने देशात सर्वप्रथम क्रमांक पटकावत राज्याचा नावलौकिक वाढविला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते या […]Read More

ट्रेण्डिंग

विद्यार्थांना मोफत मिळणार Gemini AI प्रो’ चा वार्षिक प्लॅन

मुंबई, दि. १७ : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलनं (Google Gemini AI) भारतीय कॉलेज विद्यार्थ्यांसाठी एक आश्चर्यकारक ऑफर आणली आहे. आता पात्र विद्यार्थींना गुगल AI प्रो प्लॅनचं एक वर्षाचं सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत मिळणार आहे, ज्याची नियमित किंमत सुमारे 19,500 रुपये आहे. ही ऑफर विद्यार्थ्यांच्या अभ्यास आणि करिअरला नवी दिशा देणारी ठरणार आहे. या ऑफरचं वैशिष्ट्य […]Read More

राजकीय

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी. बसमध्ये मोफत प्रवास

मुंबई, दि. १७ :– महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा […]Read More

राजकीय

मुंबईत दीड कोटींचे शौचालय, विधानसभा अध्यक्षांचे चौकशीचे आदेश

मुंबई दि १७– मुंबईतील फोर्ट भागात असणाऱ्या गॉथीक शैलीतील हेरिटेज बांधकामांचे सौंदर्य बिघडविणाऱ्या आणि पदपथावर बांधण्यात येत असलेल्या दिड कोटी रुपयांच्या आधुनिक शौचालयांच्या कामाला स्थगिती देण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली, तर याप्रकरणी तीस दिवसांत चौकशी करून त्याचा अहवाल पुढील अधिवेशनात सादर करण्यात यावा असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. […]Read More

कोकण

सावित्री नदीच्या प्रदूषणात भंगार विक्रेत्यांची भर

महाड दि १७ ( मिलिंद माने)– सावित्री नदीच्या पात्रात पोलादपूर पासून महाड औद्योगिक वसाहती मधील रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे सावित्री नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली असतानाच त्यामध्ये भंगार विक्रेत्यांनी देखील आता भर घातली आहे. भंगार विक्रेते ग्रामीण भागातून मिळणाऱ्या तांब्याच्या वायर सावित्री नदीपात्रात शेडाव नाक्याजवळ जाळण्याचा उद्योग करून नदीपात्रात प्रदूषणाला हातभार घालत असल्याचे सिद्ध होत आहेत. […]Read More

राजकीय

शिंदे म्हणाले विरोधकांनी आपल्या डोळ्यावरील धूळ साफ करावी

मुंबई दि १७ — मुंबईला जगाशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, मुंबईचे सकल उत्पन्न आगामी काळात दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र विकासाकडे डोळे मिटून पाहिले तर अंधारच दिसेल त्यामुळे विरोधकांनी आपल्या डोळ्यावरील धूळ साफ करावी, सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा, आत्मपरीक्षण करायला हवं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलं. नियम २९३ अन्वये विरोधी पक्षाच्या […]Read More

राजकीय

सत्तारूढ मंत्री , सदस्यांनी काढले विधानसभा कामकाजाचे वाभाडे…

मुंबई दि १७ — विधानसभेत केवळ औपचारिकता पार पाडण्यात येतात का , हे केवळ माहिती देण्याचे नाही तर चर्चेचे सभागृह आहे, कामकाज किती आणि कसे करायचे याची काही पद्धत आहे का असे सवाल आज मंत्री आणि सत्तारूढ सदस्यांनी उपस्थित करत विधानसभा कामकाजाचे वाभाडे काढून सरकारला घरचा आहेर दिला. विधानसभेचे विशेष सत्र आज सकाळी साडे नऊ […]Read More