Month: July 2025

राजकीय

मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद ….

मुंबई दि १८– सर्वंकष प्रगतिशील महाराष्ट्र बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे, मुंबई महानगराचा चेहरामोहरा बदलणाऱ्या असंख्य योजना राबविण्यात येत आहेत,मुंबई महाराष्ट्रापासून पुढील हजारो वर्षे कोणीही तोडू शकत नाही असं स्पष्ट करत मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला […]Read More

महानगर

इतर चार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी

मुंबई, दि १८.विधान भवन प्रवेशद्वार आंदोलनआज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केलं.मागणी इतर चार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. अन्याय करणाऱ्यांना सोडणार नाही!आम्ही शांततेत, पण ठामपणे लढत आहोत! न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील! असे राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी सांगितले. KK/ML/MSRead More

राजकीय

खासदार संजय दिना पाटील रेल्वे विभागाच्या कामकाजावर नाराज

मुंबई, दि. १८ (प्रतिनिधी) – घाटकोपर होर्डींग दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी पडलेले भंगार साहित्य व डेब्रिज वर्षानंतरही उचलण्यात न आल्याने रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून येत आहे. पडलेल्या भंगार साहित्य व डेब्रिज मध्ये पावसाचे पाणी जमा होत असल्याने त्या ठिकाणी मच्छरांचा प्रादुर्भाव होत आहे. परिणामी स्थानिक नागरीकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. डेब्रिज उचलण्याबाबत रेल्वे […]Read More

महानगर

आणि कासवाने पुन्हा शर्यंत जिंकली…

पनवेल, दि.१८ :– ससा आणि कासव यांच्या शर्यतीची गोष्ट आपणा सर्वांनाच माहिती आहे. अशीच एक महत्वाची म्हणजे जीवन मरणाची शर्यत आज कासवाने पुन्हा जिंकली असून कासव पुन्हा वडाळे तलावात आपल्या मुक्कामी सुखरूप पोहचले. या संदर्भातली अधिक माहिती अशी, वडाळे तलाव परिसरात एका कासवाच्या तोंडात गळ अडकल्याची माहिती मुकुंद कोळी यांनी अग्निशमन केंद्राला दिली. अग्निशमन विभागाचे […]Read More

देश विदेश

अमेरिकेतील मांसाहारी दुधाला भारताने केला मज्जाव

नवी दिल्ली, दि. १७ : भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या सुरू असलेल्या व्यापार चर्चेत एक अत्यंत संवेदनशील आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे — तो म्हणजे “मांसाहारी दूध”. अमेरिकेतील काही दुग्ध उत्पादक कंपन्या अशा गायींकडून दूध घेतात ज्यांना प्राणिज घटकांनी युक्त चारा दिला जातो. या चाऱ्यात डुक्कर, कोंबडी, मासे, घोडा, मांजर आणि कुत्र्याचे […]Read More

देश विदेश

१२ वर्षांच्या मुलाची कहाणी ऐकून न्यायालयाने फिरवला निर्णय

नवी दिल्ली,दि. १७ : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आई-वडीलांच्या भांडणांमुळे मानसिक आणि भावनिकदृष्टीने खचलेल्या १२ वर्षाच्या मुलाची हृदयद्रावक कहाणी ऐकली आणि खंडपीठाने या मुलाची कस्टडी त्याच्या आईकडे दिली आहे. हा निर्णय देताना न्यायाधीशांनी आपलाच निकाल बदलल्याचा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. कोर्टाने स्वत:च दहा महिन्यांपूर्वी दिलेला आदेश बदलून या मुलाची कस्टडी पुन्हा त्याच्या आईकडे देण्याचा निर्णय घेतला. […]Read More

Uncategorized

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टी उभारण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

मुंबई, दि. १७ : गेटवे ऑफ इंडियाजवळ २२९ कोटी रुपये खर्चाच्या प्रवासी जेट्टी व टर्मिनलच्या बांधकामाला उच्च न्यायालयाने मंगळवारी परवानगी दिली. टर्मिनल आणि आजूबाजूच्या परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे निर्देश राज्य सरकारला देत न्यायालयाने जेट्टी बांधकामाचा मार्ग मोकळा केला. जेट्टी प्रकल्पाला विरोध करीत ‘क्लीन अँड हेरिटेज कुलाबा रेसिडेंट्स असोसिएशन’ने दाखल केलेली याचिका न्यायालयाने मंगळवारी निकाली […]Read More

पर्यटन

जगातील पहिले AI रेस्टॉरंट

दुबईसारखं शहर जगभरात फ्यूचरिस्टिक संकल्पनांसाठी प्रसिद्ध आहे, आणि आता ते आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे—जगातील पहिले AI आधारित रेस्टॉरंट सुरू करण्याच्या तयारीत आहे. सप्टेंबर महिन्यात बुर्ज खलिफा परिसरात सुरू होणाऱ्या या रेस्टॉरंटचं नाव ‘WOOHOO’ असून, हे केवळ जेवणाचा अनुभव देणारं ठिकाण नाही, तर तंत्रज्ञान आणि कल्पकतेची अनोखी गुंफण आहे. या रेस्टॉरंटमध्ये ‘Chef Aiman’ नावाचा […]Read More

ट्रेण्डिंग

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा धावणार ‘वनराणी’

मुंबई, दि. १७ : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लहान-मोठ्यांना आकर्षित करणारी ‘वनराणी’ ट्रॉय ट्रेन पुन्हा धावणार आहे. मे 2021 मध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर बंद पडलेली मिनी ट्रॉय ट्रेन आता पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. ऑगस्टपासून ही ट्रॉय ट्रेन पर्यटकांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती उद्यान प्रशासनाने दिली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफा, नौकाविहार, […]Read More

अर्थ

चीनच्या ‘गोल्ड गेम’मुळे जगाला चिंता

बिजींग, दि. १७ : आर्थिक महासत्तेकडे वेगाने वाटचाल करु लागलेला चीन अनपेक्षित निर्णयांनी नेहमीच जगाला हादरे देत असतो. जून 2025 मध्ये चीनमध्ये सोन्याच्या खरेदीचा दर थोडा मंदावला असला तरी, पहिल्या सहा महिन्यांत सोन्याच्या गुंतवणुकीने विक्रमी कामगिरी केली. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या अहवालात इतरही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ज्यामुळे चीनच्या नवीन ‘गोल्ड गेम’ची खेळाची बाब […]Read More