Month: July 2025

महानगर

मीरा -भाईंदर महापालिका हद्दीतील मेट्रो -१० ची निविदा ऑगस्ट अखेरपर्यंत

मुंबई दि २१ — मीरा-भाईंदर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना वाहतुकीची दर्जेदार सेवा पुरवण्याच्या उद्देशाने मेट्रो- १० ची निविदा प्रक्रिया या ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होईल. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) कार्यालयात बोलावलेल्या मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील विविध विकास कामाच्या बैठकीत बोलत होते. यावेळी मुंबई महानगर क्षेत्र विकास […]Read More

सांस्कृतिक

क्रिएटर्स इकॉनॉमी केंद्रासाठी कुशल मनुष्यबळ विकासाचे उद्दिष्ट

मुंबई, दि. २१ :– सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) यांच्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने ‘क्रिएटर्स इकॉनॉमी’च्या विकासासाठी कुशल मनुष् बळ विकासाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. ही केवळ सहकार्याची सुरुवात आहे. येत्या काळात महाराष्ट्र हे देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. […]Read More

ट्रेण्डिंग

​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : विकासाच्या दूरदृष्टीसह सुशासनाचा आदर्श घालून देणारे

मंगलप्रभात लोढा भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या राष्ट्रनिर्माणाच्या ऐतिहासिक प्रक्रियेत महाराष्ट्राचे अमूल्य योगदान असेल यात मला कोणतीही शंका नाही. लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्राचे नेतृत्व असल्यानेच हे शक्य होणार आहे. फडणवीस यांच्या सर्वसमावेशक भूमिकेमुळेच राज्याचे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न मूर्त स्वरूपात […]Read More

कोकण

खांदाडमध्ये दुर्मीळ पँगोलिन मांजर सापडले.

अलिबाग दि२१– रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील खांदाड गावात एका अत्यंत दुर्मीळ प्राण्याचा पँगोलिन मांजर काही तरुणांना दिसला. हा प्रकार खरोखरच आश्चर्यजनक आणि दुर्मीळ असल्याने गावात एकच खळबळ उडाली. खांदाड गावातील काही तरुणांनी गावातल्या एका घराच्या शेजारी असणाऱ्या कोपऱ्यात विचित्र हालचाल पाहिली. तेथे पाहणी केली असता, ते एक वेगळ्याच प्रकारचा प्राणी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबई ट्रेन बॉम्ब ब्लास्ट मधील सर्व आरोपी पुराव्याअभावी निर्दोष

मुबई, दि. २१ : मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिला आहे. 19 वर्षांनंतर या बहुचर्चित हल्ल्यातील 12 दोषींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्याअभावी या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तसेच साक्षीदारांच्या जबाबात तथ्य आढळले नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. या प्रकरणी पाच जणांना फाशी तर सात […]Read More

ऍग्रो

सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्याने चालवला रोटावेटर…

जालना दि २१:– जालन्यात सोयाबीन पिकावर रोगांचा संकट ओढवलंय. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले असून सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 2 एकरावरील सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील एका शेतकऱ्याने आपल्या 2 एकरावरील सोयाबीन पिकावर रोटावेटर चालवलाय. जालन्यात पिकांवर होत असलेल्या रोगप्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत असल्याचं चित्र दिसून येत आहे. ML/ML/MSRead More

सांस्कृतिक

संत ज्ञानेश्वर महाराज्यांची पालखी पुन्हा आळंदीत दाखल….

पुणे दि २०– संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी ३१ दिवसांचा भाविकांनी ओथंबलेला, भक्तिमय प्रवास पूर्ण करून आज पुन्हा आळंदी नगरीत पोहोचली आहे. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास, कोट्यवधी भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग, टाळ-मृदुंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ च्या जयघोषात हे वारीचं वैभव संपन्न झालं. आळंदीत पुन्हा पालखी पोहोचल्यावर महापूजा, हरिपाठ, कीर्तन, भजन अशा विविध भक्तिपर कार्यक्रमांनी सोहळ्याचा […]Read More

सांस्कृतिक

गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करु !

पेण, दि. २०– गणेशोत्सव, दहिहंडी, नागपंचमी अशा हिंदू सणांच्या विरोधात षडयंत्र रचले जाते. हा शहरी नक्षलवाद्यांचा डाव आहे. आपण तो हाणून पाडू आणि यावेळी राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करु असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज येथे केले. गणपतीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण येथील हमरापूर, जोहे, कळवे या गावातील […]Read More

कोकण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोन कंटेनर बांबूचे फर्निचर इस्त्रायलला निर्यात

सिंधुदुर्ग दि २० — जिल्ह्यातून दोन कंटेनर भरून बांबूचे फर्निचर इस्त्रायल या देशात निर्यात झाले आहे. सिंधुदुर्गातील कोनबॅक आणि चिवार संस्थेने हे फर्निचर बनविण्याची कामगिरी केली आहे.भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा हा बांबूचं मोठं जागतिक प्रकिया केंद्र बनेल,असा विश्वास कोनबॅक संस्थेचे संचालक संजीव करपे यांनी व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांबूचे दर्जेदार उत्पादन होत आहे.या जिल्ह्यात कोनबॅक […]Read More

विदर्भ

दिव्यांग दृष्टीहीन बांधवांची पंढरपूर वारी परतली

यवतमाळ दि. २०–यवतमाळ येथील सेवा समर्पण प्रतिष्ठान तर्फे दिव्यांग दृष्टीहीन कलावंत मुलामुलींची पंढरपूर वारी आयोजित करण्यात आली होती . ही वारी तब्बल साडेपाचशे किलोमीटर पायी चालून नुकतीच सुखरूप परत आली आहे. याबाबत संपूर्ण वारकऱ्यांचा यवतमाळ शहरवासियांतर्फे कौतुक सोहळा आयोजत करण्यात आला होता. सर्व वारकऱ्यांचा निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सत्काराला […]Read More