Month: July 2025

बिझनेस

होंडा लाँच करणार स्वस्त इलेक्ट्रिक बाईक

मुंबई, दि. २२ : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया भारतात परवडणाऱ्या इलेक्ट्रिक बाईक लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने अलीकडेच भारतीय पेटंट ऑफिस (IPO) मध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. यावरून असे दिसून येते की, कंपनी इलेक्ट्रिक मोटरसायकलवर काम करत आहे, जी शाईन १०० च्या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. नवीन बाईक बनवताना वेळ आणि पैसा […]Read More

महानगर

जगातील २० सर्वाधिक रंगीबेरंगी शहरांच्या यादीत मुंबई

मुंबई, दि. २२ : भारतातील प्रमुख शहर मुंबईने जून महिन्यात बेर्ले नॉटिंघम डिझाइन स्टुडीओतर्फे जगभरातील १२५ शहरांमधून निवडलेल्या २० सर्वाधिक रंगीबेरंगी शहरांच्या यादीत १७वा क्रमांक पटकावला आहे. निळे शहर म्हणून प्रसिद्ध जोधपूरने या यादीत ५वा क्रमांक मिळवला. इटलीमधील इंद्रधनुषी गाव बुरानो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत हवाना (क्युबा), इस्तंबूल (तुर्की), कोपेनहेगन (डेन्मार्क), रिओ […]Read More

आरोग्य

सरकारकडून ‘मोतीबिंदू मुक्त राज्य’ मोहिम सुरू

जालना,दि. २२ : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त टाळता येण्याजोगे अंधत्व दूर करण्यासाठी राज्य सरकारने ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ मोहीम सुरू केली आहे, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज सांगितले. “सरकार संपूर्ण महाराष्ट्रात मोतीबिंदू मुक्त राज्य निर्माण करण्यासाठी आणि आरोग्य सेवा वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे,” असे जालना जिल्हाधिकारी कार्यालयात मोहिमेचे उद्घाटन केल्यानंतर […]Read More

ट्रेण्डिंग

धमकी देऊन ५० हजार रु. उकळल्याबद्दल RTI कार्यकर्त्यांला अटक

ठाणे, दि. २२ : खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन हॉटेल व्यावसायिकाकडून ५० हजार रुपये उकळल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील एका आरटीआय कार्यकर्त्याला अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षाने (एईसी) सोमवारी रात्री आरोपी नितीन गोळे (४९) याला अटक केली आणि स्थानिक न्यायालयाने त्याला २५ […]Read More

महिला

महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटूंची मोठी कामगिरी

जॉर्जिया,दि. २२ : महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत सोमवारचा दिवस भारतासाठी दुहेरी पराक्रमाचा ठरला. नागपूरची दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांनी बुद्धिबळात भारतीय महिलाही कमी नसल्याचे दाखवून दिले. १९ वर्षीय दिव्या आणि ३८ वर्षीय हम्पी यांनी जॉर्जिया येथे सुरू असलेल्या महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेची प्रथमच उपांत्य फेरी गाठली. भारतातर्फे प्रथमच दोन महिला खेळाडूंनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत […]Read More

ट्रेण्डिंग

मिग-२१ लढाऊ विमान होणार सेवानिवृत्त

मुंबई, दि. २२ : नवी दिल्ली, दि. २२ : भारतीय हवाई दलातील सर्वात जुने आणि अत्यंत महत्त्वाचे लढाऊ विमान मिग-21 अखेर निवृत्त होणार आहे. १९ सप्टेंबर रोजी चंदीगडमधील हवाई तळावर एक औपचारिक समारंभ आयोजित केला जाणार असून त्यातून एका युगाचा अंत होणार आहे. मिग-21 हे विमान 1963 मध्ये भारतीय हवाई दलात दाखल झाले होते आणि […]Read More

राजकीय

मुंबई ट्रेन बॉम्ब ब्लास्ट प्रकरण, राज्य सरकारने घेतली सर्वोच्च न्यायालयात

मुंबई, दि. २२ : काल मुंबई उच्च न्यायालयाने २००६ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त केले. त्यानंतर या निकाला विरोधात आज महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात तात्काळ सुनावणीसाठी अपील […]Read More

महानगर

राज्यात विक्रमी १०२ रोजगार मेळावे,२७ हजार युवकांना एकाच दिवशी रोजगार

मुंबई दि २२– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कौशल्य, रोजगार व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विक्रमी ५७ हजार तरुणांनी नोंदणी केली तर २७ हजार तरुणांना एकच दिवशी रोजगार मिळाला आहे. राज्यातल्या तरुणांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस अविस्मरणीय ठरावा, त्यांच्या करिअर मध्ये नवा अध्याय सुरु व्हावा, या […]Read More

बिझनेस

कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग’ मध्ये DOMO Inc. च्या सहकार्याने ‘डेटा

पुणे प्रतिनिधी – कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, उद्योगाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन, DOMO Incorporation च्या सहकार्याने डेटा सायन्स सेंटर ऑफ एक्सलन्स ची स्थापना केली आहे. या केंद्राचे उद्घाटन आज उत्साहात संपन्न झाले. DOMO ही संस्था जगातील टॉप ५ डेटा सायन्स कंपन्यांपैकी एक असून, या केंद्रासाठी DOMO हा अधिकृत उद्योग भागीदार आहे. या उपक्रमांतर्गत कीस्टोनच्या विद्यार्थ्यांना […]Read More

महानगर

*ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा ९४९ कोटींचा प्रस्ताव प्रलंबित  

ठाणे दि २२– अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा ९४९ कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठविला असून तो अद्याप प्रलंबित आहे. तसेच ठाणे स्थानकावर मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल तातडीने बांधण्याबाबत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत नियम ३७७ च्या आधारे प्रश्न उपस्थित करत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले.     […]Read More