Month: July 2025

मराठवाडा

लिंबे वडगाव येथील साठवण तलाव ओव्हरफ्लो, छातीभर पाण्यातून प्रवास…

जालना दि २३:– मुसळधार पावसामुळे जालन्याच्या लिंबे वडगाव येथील साठवण तलाव ओव्हरफ्लो झालाय. या तलावाचे पाणी गावातील रस्त्यांवरून वाहू लागल्याने नागरिकांना छातीपर्यंतच्या पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी कसरत होत असल्याचं चित्र दिसून येतंय. जालन्याच्या मंठा आणि परतूर तालुक्यांत मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नदी-नाल्यांना पूर आला असून साठवण तलावही पूर्ण क्षमतेने […]Read More

महाराष्ट्र

*”मुंबई लोकल” १ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमागृहात

मुंबई, सी २३मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या प्रवासात झालेल्या नजरानजरेपासून आयुष्य बदलणाऱ्या घटनेपर्यंतचा रंजक प्रवास “मुंबई लोकल” या चित्रपटातून उलगडणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता स्वप्निल जोशी यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला.”मुंबई लोकल” या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अभिजीत यांनी केलं आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, आनंदी एंटरटेनमेंट आणि स्प्लेंडिड प्रॉडक्शन्सने या चित्रपटाची निर्मिती […]Read More

अर्थ

मराठा एन्त्रेप्रेनेऊर असोसिएशनच्या वतीने ‘लोन आणि सबसिडी एक्स्पो-2025’ चे आयोजन

पुणे, दि २३ : पुण्यातील उद्योजक आणि स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना विविध शासकीय योजना, बँकांच्या योजना, वित्तीय संस्था देत असलेल्या योजना आणि शासकीय अनुदानाच्या योजना याबाबत माहिती देण्यासाठी आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मराठा एन्त्रेप्रेनेऊर असोसिएशनच्या वतीने पुण्यात पहिल्यांदाच ‘लोन आणि सबसिडी एक्सपो-2025’ चे शुक्रवार दिनांक 25 रोजी, सकाळी 10 ते सायं 7 पर्यंत,सिद्धी […]Read More

महानगर

आदिवासी विद्यार्थिनीला मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लोकदरबारातून न्याय !

पालघर दि २३– पालघर येथील बोईसर येथे राहणारी आदिवासी समाजाची आणि पी एल श्रॉफ कॉलेजमध्ये बीएससी आयटी या विषयात शेवटच्या वर्षाला शिकणारी प्रियंका सुनील गिंबल हिला कॉलेजने शेवटच्या परीक्षेत बसण्यापासून रोखले होते.प्रियंका हिने अकरावी व बारावी इयत्तेमध्ये गणित विषय निवडला नव्हता असे असून सुद्धा कॉलेजने तिला बीएससी आयटी या विषयात प्रथम वर्षाला प्रवेश दिला होता. […]Read More

सांस्कृतिक

संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा

सोलापूर दि २३:- संत नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संत नामदेव पायरीची विधिवत पूजा आणि महाआरती झाली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल दर्शन देखील घेतलं. यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे , संत नामदेव महाराज यांचे वंशज असणारा नामदास परिवार उपस्थित होता.प्रसंगी […]Read More

राजकीय

गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मुर्तींचे विसर्जन समुद्रात, शासनाची भूमिका

मुंबई, दि. २३– पर्यावरणाचा समतोल राखत विशिष्ट उंचीच्या घरगुती गणेशाच्या मुर्ती कृत्रिम तलावात तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मुर्ती या परंपरागत समुद्रात विसर्जन करण्यात येतील व पर्यावरणाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असे प्रतिज्ञापत्र आज शासनाने मुंबई उच्च न्यायालयात सादर केले. त्यामुळे मोठ्या गणेशमूर्ती समुद्रात विसर्जन करण्याचा मार्ग खुला होणार आहे. पीओपीवरील बंदीमुळे लाखो मुर्तीकारांच्या […]Read More

विदर्भ

वाशीम जिल्ह्यात अतिवृष्टी, शेतीचे नुकसान; शेतकरी मेटाकुटीस

वाशीम दि २३– जिल्ह्यात रिसोड, मालेगांव, मंगरूळपिर तालुक्यात काल दिवसभर व रात्री झालेल्या मुसळधार ते अती मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्याना पूर आला. या भागातील हजारो हेक्टर शेती पुराच्या विळख्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे रिसोड तालुक्यातील काच आणि पैनगंगा आणि मालेगाव तालुक्यातील अडाण नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मागील […]Read More

विदर्भ

अकोल्यात पारस बॅरेजचे गेट उघडले , सतर्कतेचा इशारा

अकोला दि २३:– अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील मन नदीवरील बॅरेजचे दोन गेट 6100 क्यूसेक्सने उघडले आहेत. पातूर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने मन नदीत पूर परिस्थिती निर्माण झाल्याने, ह्या बॅरेजचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. काल पारस येथे ढगफुटी सदृशय पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले होते. तर आता काल रात्री झालेल्या पावसामुळे बॅरेजचे गेट उघडण्यात […]Read More

विदर्भ

अकोल्यात अतिवृष्टी,१५० घरांचे अंशतः नुकसान

अकोला दि २३:– अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील बाळापूर, पारस, पातूर तालुक्यातील चान्नी आणि सस्ती या मंडळांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला, या भागात मध्यरात्रीपासून मुसळधार कोसळल्याने गावांमधील अनेक घरांत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गत पंधरा दिवसांपासून दडी दिलेल्या पावसाने बाळापूर व पातूर तालुक्यात जोरदार हजेरी दिली. बाळापूर मंडळात रात्रीच्या दरम्यान १७७.३ मिमी, पारस मंडळात ८२ […]Read More

बिझनेस

Zomato ची दोन दिवसात 52 हजार कोटींची कमाई

मुंबई, दि. २२ : देशात सर्वात मोठी फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटोची परेंट कंपनी इटरनल ( Eternal ) शेअर बाजारात गेल्या दोन दिवसापासून मोठी कमाई करत आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या दोन दिवसात कंपनी शेअरमध्ये २१ टक्के वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅपमध्ये ५२ हजार कोटी रुपयांहून अधिक वाढ पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते […]Read More