Month: July 2025

राजकीय

आदिवासीबहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण आणि बिंदूनामावलीही निश्चित

मुंबई, दि. ३१ : राज्य सरकारने आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी सुधारित आरक्षण आणि बिंदूनामावली निश्चित केली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आरक्षण उपसमितीने याबाबत केलेल्या शिफारशीनंतर ही बिंदूनामावली निश्चित करण्यात आली आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणासह […]Read More

महाराष्ट्र

महाराष्ट्रात झालेले मतदान योग्यच, ईव्हीएम यंत्रे छेडछाड न करण्याजोगी…

मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) तपासणी आणि पडताळणी (C&V) प्रक्रिया पूर्ण केली असून, यामधून पुन्हा एकदा सिद्ध झाले की EVMs छेडछाडविरहित आहेत. आयोगाच्या 17 जून 2025 रोजीच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया राज्यातील 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये पार पडली. या तपासणीसाठी 10 उमेदवारांनी अर्ज केले होते, ज्यापैकी 8 उमेदवार […]Read More

महाराष्ट्र

कबुतरांना खाद्य देणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश

मुंबई, दि. ३१ : कबुतरांना खायला घालणे हा सार्वजनिक उपद्रव आहे. हा मुद्दा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे आणि सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर आणि संभाव्य धोका असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुंबईत कबुतरांना खाद्य न घालण्याबाबत कोणताही दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या आदेशानंतरही कबुतरांना खाद्य घालण्यात येत असेल आणि याबाबत पालिकेच्या […]Read More

राजकीय

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयकडून कायम

नवी दिल्ली, दि. ३१ : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी दोषी असलेले पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश […]Read More

महानगर

ठाण्यातून कोडीन असलेल्या कफ सिरपच्या १,९२० बाटल्या जप्त

ठाणे, दि. ३१ : ठाणे नजिकच्या भिवंडी शहरात पोलिसांनी ३.७४ लाख रुपये किमतीच्या कोडीन असलेल्या कफ सिरपच्या १,९२० बाटल्या जप्त केल्या आणि दोघांना अटक केली आहे. “गोपनीय माहितीच्या आधारे, आम्ही एका जागेवर छापा टाकला आणि अशपाक मोहम्मद हसन मोमीन आणि अब्दुलराजा अलीराजा सिद्दीकी यांना मादक पदार्थांच्या वितरणाच्या उद्देशाने प्रतिबंधित औषधी उत्पादनाचा साठा केल्याबद्दल अटक केली,” […]Read More

बिझनेस

‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल!

मुंबई दि ३१– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB)’च्या इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्सचे उपाध्यक्ष अजय भूषण पांडे यांच्यासमवेत बैठक पार पडली. या बैठकीत 2047 पर्यंत विकसित महाराष्ट्र साकारण्यासाठी विविध प्रकल्प आणि सहकार्याच्या रणनीतीसंदर्भात चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, भारताच्या ‘$5 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र ‘$1 ट्रिलियन’ […]Read More

ट्रेण्डिंग

या देशात अल्पवयिन मुलांच्या यूट्यूब अकाऊंटवर बंदी

मेलबर्न, दि. ३१ : ऑस्ट्रेलिया ने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांवर यूट्यूब अकाऊंट बनवण्यास बंदी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाने याआधीच टिकटॉक, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) या सोशल मीडियांवर बंदी घातलेली आहे. याबाबत ई-सेफ्टी कमिश्नर यांनी शिफारस केली होती. यूट्यूब हा एक व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे. तरीदेखील यूट्यूबच्या माध्यमातून लहान मुलांपुढे पारंपरिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणेच हानिकारक […]Read More

महानगर

न्यायालयाने फेटाळली ‘अँटिलिया’च्या जमीन विक्रीसंबंधी याचिका

मुंबई, दि. ३१ : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाच्या जमिनीच्या विक्रीला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. मालमत्तेच्या स्वरूपाचा मुद्दा आधीच निकाली काढण्यात आला आहे. त्यामुळे याच मुद्द्याशी संबंधित जनहित याचिकेत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करीत मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला झटला दिला. जालना […]Read More

राजकीय

अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे विनंती

मुंबई, दि. ३१ : – कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या जलाशय पातळीची उंची वाढविल्यास महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह, कृष्णा नदी काठच्या परिसराला फटका बसू शकतो. त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना केली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विस्तृत असे […]Read More

मराठवाडा

जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत १२ हजार क्युसेक विसर्ग

छ. संभाजीनगर दि ३१– जायकवाडी धरणात आज संध्याकाळी ४ वाजता जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन पार पडले. यावेळी पैठणचे आमदार विलास भुमरेही उपस्थित होते. यानंतर धरणाचे अठरा दरवाजे अर्धा फूट उघडून गोदावरी नदी पात्रात तब्बल १२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या धरणात उर्ध्व भागातून १५ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू […]Read More