Month: May 2025

महाराष्ट्र

भिकारीमुक्त महाराष्ट्रसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र सरकारने भिकारीमुक्त महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. सरकारी भिक्षागृहातील (Alms Houses) काम करणाऱ्या भिकाऱ्यांसाठी दररोजचे मानधन 5 रुपये प्रति महिना वरून थेट 40रुपये प्रति दिवस करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये भिक्षेगिरी रोखण्यासाठी 1964 मध्ये ‘भिक्षा प्रतिबंधक कायदा’ (Prohibition of Begging Act) लागू […]Read More

अर्थ

एप्रिल महिन्यात झाले विक्रमी GST संकलन

एप्रिल २०२५ मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) मधून सरकारने २.३७ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. हे आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी संकलन आहे. वार्षिक आधारावर १२.६% वाढ झाली आहे. आज ( १ मे ) जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, एक वर्षापूर्वी म्हणजेच मे २०२४ मध्ये सरकारने १.७३ लाख कोटी रुपयांचा जीएसटी गोळा केला होता.Read More

ट्रेण्डिंग

राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणार CET

मुंबई, दि. १ : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटीच्या एका सत्रात गणित विषयातील प्रश्नांमध्ये गोंधळ झाल्याची कबुली सीईटी कक्षाने दिली आहे. आता या सत्रातील २४ हजार ७४४ विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा इंग्रजी, मराठी आणि उर्दू या तीन भाषांमध्ये होते. त्यातील मराठी भाषेतील पेपर इंग्रजीत भाषांतरित […]Read More

पर्यावरण

निकोबार बेटावर वेळेआधीच मोसमी पाऊस येणार!

मुंबई :—* देशभरात उन्हाळ्याचा कडाका वाढत असतानाच दक्षिण भारताच्या दिशेने मोसमी पावसाच्या आगमनाची चाहुल लागायला सुरुवात झाली आहे. हवामान अभ्यासकांच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा मोसमी पाऊस वेळेच्या आधीच निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदमान आणि निकोबार बेटांजवळील समुद्रसपाटीवर सध्या ढगांच्या हालचाली आणि वाऱ्याचा वेग यामध्ये लक्षणीय बदल दिसून येत आहेत. हे […]Read More

पर्यावरण

अभिनेत्री छाया कदम यांची वन विभागाकडून होणार चौकशी

मुंबई, दि. १ : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री छाया कदम सध्या वादात अडकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी रानडुक्कर, ससा आणि घोरपडीचं मांस खाल्ल्याचा दावा केला होता. वन कायद्यानुसार संरक्षित प्रजातीच्या वन्य प्राण्यांना मारणं आणि त्यांचं मांस खाणं कायद्यानं गुन्हा मानलं जातं. छाया कदम यांच्या दाव्यानंतर मुंबईतील एक स्वयंसेवी संस्थेनं महाराष्ट्र […]Read More

महानगर

मेल,एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक आता क्यूआर कोडवर

मध्य रेल्वेने मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा तपशील जलद व सोयीस्करपणे उपलब्ध व्हावा यासाठी क्यूआर कोड आधारित माहिती प्रणाली सुरू केली आहे. यामुळे प्रवाशांना साध्या स्कॅनद्वारे मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रकाची माहिती मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल स्थानकांवर क्यूआर कोड उपलब्ध करून दिले आहेत. या माध्यमातून प्रवाशांना मेल/एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक, प्रवासी आरक्षण प्रणाली […]Read More

बिझनेस

पंजाब बँक बुडवणाऱ्या मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई, दि. १ : पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा करणारा मेहुल चोक्सी याच्या विरोधात मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने मोठी कारवाई केली आहे. २०२२ मध्ये उघडकीस आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हिरे व्यापारी मेहुल चोक्सी व त्याचा भाचा नीरव मोदी या दोघांनी १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. […]Read More

राजकीय

फडणवीस सरकारने जाहीर केला 100 दिवसांच्या कामगिरीचा निकाल

मुंबई,दि. १ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत मूल्यमापनाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे असलेल्या महिला व बालविकास विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया वरती या संदर्भात पोस्ट करून ही माहिती शेअर केली आहे. भारतीय […]Read More

ट्रेण्डिंग

​​​​​​​ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते WAVES 2025 चे उद्घाटन

मुंबई, दि. १ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे WAVES 2025 (World Audio Visual & Entertainment Summit) या भारताच्या पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे उद्घाटन केले. ही चार दिवसीय परिषद 1 ते 4 मे दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे घोषवाक्य आहे “Connecting Creators, Connecting Countries”, ज्यामध्ये […]Read More

ट्रेण्डिंग

चालकाने कॅब बुकिंग रद्द केल्यास प्रवाशांना मिळणार भरपाई

मुंबई, दि. १ : ओला , उबर , रॅपिडो यांसारख्या ॲपवर आधारित टॅक्सी सेवा आणखी सुरक्षित, पारदर्शक आणि सोयीच्या करण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ‘ॲग्रीगेटर कॅब्स धोरण 2025’ (Aggregator Cabs Policy 2025) मंजूर केले आहे. हे धोरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर तयार करण्यात आले असून त्यात टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी कडक तांत्रिक व कायदेशीर अटी घालण्यात आल्या आहेत. […]Read More