Month: May 2025

राजकीय

पेहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कश्मिरी डोगरा समाजाच्या वतीने नवि मुंबई येथे

मुंबई ..3 मे जम्मू आणि काश्मिर येथील पेहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कश्मिरी डोगरा समाजाच्या वतीने नवि मुंबई येथे आयोजित निषेध आंदोलनात माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांनी सहभागी होऊन भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी पाकिस्तान ला जशाच तसं उत्तर भारताने द्यावे अशी मागणी कश्मिरी डोगरा समाजाच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी […]Read More

राजकीय

राष्ट्रपती मा. दौपदी मुर्मू यांच्या हस्ते अनोख्या उपक्रमाच्या पोर्टलाचा शुभारंभ

मुंबई..3 मे केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या वतीने सन्मान जनक वृध्दावस्था या अनोख्या उपक्रमाच्या पोर्टलाचा शुभारंभ राष्ट्रपती माननीय दौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात करण्यात आला.यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता कॅबीनेटमंत्री डॉ.विरेंद्रकुमार, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,राज्यमंत्री बी.एल.वर्मा,सचिव अमित यादव आणि ब्रह्मकुमारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.Read More

पर्यावरण

पर्यावरणासाठी आगळा छंद!८०० वृक्षांच्या बियांचे संकलन

वाशीम दि ३:– सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. अशा परिस्थितीत वाशीमच्या केवळ ११ वर्षीय शरद नागुलकरने पर्यावरण संरक्षणाचा अनोखा छंद जोपासला आहे. एसएमसी इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता ५ वीत शिकणाऱ्या शरदने तब्बल ८०० दुर्मिळ वृक्षांच्या बियांचे संकलन करून समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.शाळेत राबविण्यात येणाऱ्या ‘हरित सेना’ उपक्रमातून प्रेरणा घेत त्याने विदर्भातील […]Read More

कोकण

आठ वर्षात २२६ गडकिल्ले सर करणारा अवलिया

अलिबाग दि ३– रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पनवेल शहर येथील सीकेटी विद्यालय येथे मुख्याध्यापक असलेले सुभाष मानकर यांनी गेल्या आठ वर्षात २२६ गडकिल्ले सर केले आहेत. सन २००१ ते २०१५ या कालावधीत प्राथमिक शिक्षक म्हणून काम केल्यानंतर आज ते पनवेल येथील सीकेटी विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत. मुळात मुळशी तालुक्यातील कोरी गडाच्या पायथ्याशी […]Read More

सांस्कृतिक

तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टम

मुंबई दि ३ — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बीकेसी, मुंबई येथे काल ‘वेव्ह्ज 2025’ मध्ये ‘स्टुडिओ आणि तंत्रज्ञान’ विषयावर राऊंड टेबल चर्चा संपन्न झाली. यावेळी बोलताना त्यांनी मुंबई हे सर्जनशीलतेचे केंद्र असल्याचे नमूद करून, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्राचे जागतिक स्थान अधिक मजबूत करण्यासाठी तिसऱ्या मुंबईत (नवी मुंबई परिसरात) आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्जनशील इकोसिस्टम निर्माण […]Read More

देश विदेश

6 व्यक्तींना पाकिस्तानात पाठवण्यास न्यायालयाकडून स्थगिती

नवी दिल्ली, दि. २ : सर्वोच्च न्यायालयाने सहा व्यक्तींना पाकिस्तानात परत पाठवण्यावर तात्पुरती स्थगिती दिली आहे. या व्यक्तींना व्हिसा कालावधी संपल्याच्या आरोपांमुळे त्यांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला गेला होता, परंतु त्यांनी वैध भारतीय पासपोर्ट आणि आधार कार्ड असल्याचा दावा केला आहे. न्यायाधीश सूर्यकांत आणि एन. कोटिस्वर सिंग यांच्या खंडपीठाने भारत सरकारला त्यांच्या दस्तऐवजांची तपासणी करण्याचे […]Read More

देश विदेश

देशातील पहिले Quantum valley टेक पार्क या राज्यात

राज्याच्या आधुनिकतम क्वांटम व्हॅली टेक पार्क चे उद्घाटन १ जानेवारी २०२६ रोजी होईल. हे भारतातील पहिले आणि अत्याधुनिक क्वांटम टेक पार्क असेल, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज जाहीर केले. या निर्णयामुळे भारताचा क्वांटम संगणक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक प्रभाव वाढण्यास मदत होईल. हे केंद्र देशातील संशोधकांना, उद्योजकांना आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोदितांना […]Read More

देश विदेश

Press Freedom Index मध्ये भारत 151व्या स्थानी

पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RWB) द्वारे २०२५ च्या जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत १८० देशांपैकी १५१ व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी या यादीत भारता १५९ व्या क्रमांकावर होता.डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर अमेरिकेतील प्रेसची स्थिती बिकट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. या निर्देशांकात अमेरिका ५७ व्या क्रमांकावर आहे, तर गेल्या वर्षी त्याचे रँकिंग […]Read More

ट्रेण्डिंग

UPI व्यवहार होणार अधिक वेगवान

१६ जून २०२५ पासून UPI व्यवहार अधिक वेगाने पूर्ण होणार आहेत. सध्या व्यवहार प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ३० सेकंद लागतात, परंतु नवीन सुधारणा झाल्यानंतर ही वेळ फक्त १५ सेकंदांवर येईल. हा बदल राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने घोषित केला आहे, ज्यामुळे डिजिटल व्यवहार अधिक जलद आणि सोयीस्कर होतील. याव्यतिरिक्त, अपयशी व्यवहारांची माहिती मिळण्याचा वेळसुद्धा […]Read More

महाराष्ट्र

स्वयंपुनर्विकास योजना महाराष्ट्रातील*गृहनिर्माण सेक्टरमध्ये ‘गेमचेंजर’ होईल*

आमदार प्रविण दरेकर मुंबई प्रतिनिधी- मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात स्वयपुनर्विकास प्रकल्पांना ताकद मिळेल, असा अहवाल सरकारला सादर करू, त्यातून स्वयंपुनर्विकास योजना महाराष्ट्रातील गृहनिर्माण क्षेत्रात ‘गेमचेंजर’ ठरेल, अशी आश्वासक प्रतिक्रिया स्वयंपूनर्विकासातील अडचणी सोडविण्यासाठी गठित करण्यात आलेल्या अभ्यासगटाच्या बैठकीनंतर अभ्यासगटाचे अध्यक्ष, विधान परिषदेचे गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली. आज सहकारी गृहनिर्माण स्वयंपूनर्विकास अभ्यासगटाची पहिली […]Read More