Month: May 2025

महाराष्ट्र

बार्टीमधून प्रशिक्षण घेणाऱ्यानामुंबै बँक देणार ५ लाखापर्यंतचे शैक्षणिक कर्ज

मुंबई, दि. 13बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) मधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई जिल्हा बँक ५ लाखापर्यंत बिनव्याजी शैक्षणिक कर्ज देणार असल्याची घोषणा मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी केली आहे. आज मुंबई बँकेच्या फोर्ट येथील मुख्य कार्यालयात बार्टीद्वारे प्रशिक्षण घेऊन (आयआयटी) (एनआयटी) मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई बँकेमार्फत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून […]Read More

राजकीय

एकसारख्या मतदार ओळखपत्र क्रमांकांचा प्रश्न निवडणूक आयोगाने सोडवला

मुंबई, दि. १३ :– निवडणूक यादी निर्दोष व अद्ययावत ठेवण्याच्या प्रयत्नांतर्गत, भारत निवडणूक आयोगाने (ECI) जवळपास 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला एकसारख्या मतदार ओळखपत्र (EPIC) क्रमांकांचा प्रश्न यशस्वीपणे सोडवला आहे. 2005 पासून वेगवेगळ्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी (EROs) वापरलेल्या एकसारख्या मालिकेमुळे काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता आणि खरे मतदार एकसारख्या मतदार ओळखपत्र क्रमांकांसह नोंदवले गेले होते. […]Read More

राजकीय

वाहतूक गड उद्घाटन सोहळा जल्लोषात

मुंबई, दि.13भाजपा ट्रान्सपोर्ट सेल प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटना यांच्या वतीने वाहतूक गड या नव्या मध्यवर्ती कार्यालयाचे भव्य उद्घाटन कुर्ला येथे मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या सोहळात वाहन चालकांच्या न्यायासाठी आणि सरकारसोबत थेट संवादासाठी कार्यालय मोलाची भूमिका बजावेल असा विश्वास भारतीय जनता पार्टी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त […]Read More

शिक्षण

रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य विकास विभागाचे नवे पीपीपी धोरण

मुंबई दि १३ :– महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये रूपांतरित करून उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार आणि नाविन्यता विभागाने तयार केलेल्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी अर्थात पीपीपी धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या धोरणामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण, संस्थेतील पायाभूत सुविधा, जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये थेट उमेदवारी प्रशिक्षण आणि […]Read More

शिक्षण

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना

मुंबई दि १३– रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे राज्यातील रस्त्यावर राहणाऱ्या हजारो बालकांना शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि नवजीवनाची संधी मिळणार असून ही योजना बालहक्कांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. राज्यातील २९ महानगरपालिकेत […]Read More

राजकीय

बांधकाम क्षेत्रात आता ‘एम-सॅंड’ अर्थात कृत्रिम वाळूचा वापर अनिवार्य

मुंबई दि १३– नैसर्गिक वाळूच्या अति उत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा, तसेच बांधकाम क्षेत्राला पर्यायी तसेच टिकाऊ साधन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यात कृत्रिम वाळू (एम-सॅंड) चा उत्पादन व वापर धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणानुसार सार्वजनिक बांधकामांमध्ये या कृत्रिम वाळूचा वापर वाढावा यासाठी […]Read More

ट्रेण्डिंग

पाणी दोनदा तुंबल्याने रहिवाशांचे हाल

मुंबई, दि.13ठाणे येथील केव्हीला परिसरात अवकाळी पावसामुळे नाल्यात पाणी तुंबून ते आसपासच्या सोसायटीत शिरून रहिवाशांचे हाल झाल्याचे चित्र बुधवारी दिवसभरात दिसून आले. के व्हीला या रस्त्याखालून जाणारा नाला रुंद करण्यात आला असला तरी याच नाल्यावर स्लॅब टाकून के-व्हीला ते पंचगंगादरम्यान रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी नाल्यात बांबू लावण्यात आल्यामुळे नाल्यातील कचरा अडकून […]Read More

महाराष्ट्र

राज्यात दहावीचा निकाल ९४.१० टक्के

मुंबई, दि. 13दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल […]Read More

देश विदेश

महाराष्ट्राच्‍या पदकांचे शतक, विक्रमांची सप्‍तमी

पाटना (बिहार) दि १३ :– तब्बल ७ स्‍पर्धा विक्रमाची नोंद करीत ७ व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राने पदकांचे शतक झळकावले. ४१ सुवर्णांसह एकूण १०१ पदकांची लयलूट करीत महाराष्ट्र पदकतालिकेत अव्‍वल स्‍थानावर कायम आहे. वेटलिफ्टिंग पाठोपाठ ॲथलेटिक्‍समध्येही स्‍पर्धा विक्रमाला गवसणी घालत महाराष्ट्राच्‍या क्रीडापटूंनी खेलो इंडिया स्‍पर्धेत आपले वर्चस्‍व कायम राखले आहे. स्‍पर्धेच्‍या ९ व्‍या दिवशी […]Read More