Month: January 2025

देश विदेश

सिंगापूरमध्ये उद्यापासून ९ व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

सिंगापूर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे नववे ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ १४ ते १८ जानेवारी २०२५ दरम्यान पार पडणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखिका आणि ज्येष्ठ समाजसेविका रजिया सुलताना (अमरावती) यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार मनोज भोयर हे या संमेलनाचे उदघाटक असणार आहेत. ‘शब्द परिवार’ तर्फे दरवर्षी परदेशात मराठी […]Read More

महानगर

प्लास्टिकमुक्त मुंबईसाठी मनपा करणार कठोर कारवाई

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. प्लास्टिकमुक्त मुंबईसाठी पुढील आठवड्यापासून धडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याआधी मुंबईकरांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मात्र त्यानंतरही मुंबईकरांच्या हातात प्लास्टिक पिशवी आढळल्यास थेट पाच हजारांचा दंड आकारण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. २६ […]Read More

देश विदेश

सुनीता विलियम्स पुन्हा एकदा Spacewalk साठी सज्ज

न्यूयॉर्क, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनेक महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकून पडलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स दोन आठवड्यांत दोन स्पेसवॉक करण्यास सज्ज झाल्या आहेत. NASA नं दिलेल्या स्टेटमेंटनुसार सुनीता विलियम्स 16 जानेवारीला निक हेग सोबत इंटरनॅशल स्पेस स्टेशन (ISS) च्या बाहेर पडून स्पेसवॉक करतील, ज्याच्या माध्यमातून स्टेशन अपग्रेड पूर्ण होतील. त्याचबरोबर 23 जानेवारीला […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्यातील या गावात महिलांनी मतदान करून केली पूर्ण दारूबंदी

फलटण, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आळजापुर गावामध्ये दारूची बाटली आडवी करण्यासाठी म्हणजेच गावामध्ये दारूबंदीसाठी महिलांचे मतदान घेण्यात आले. यामध्ये एकूण ७२३ मतदारांपैकी ४८० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये गावांमध्ये दारूबंदी व्हावी यासाठी ४५४ जणांनी मतदान केले व गावामध्ये दारू विक्री सुरू ठेवावी यासाठी १९ जणांनी मत नोंदवले. त्यामुळे […]Read More

अर्थ

शेअर बाजारात मोठी पडझड ! ब्लॅक मंडे ! सेन्सेक्स 1100

जितेश सावंत सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स तसेच निफ्टीत 1.50% पेक्षा जास्त घसरण झाली. (Black Monday on D-Street) निफ्टीची पातळी 23,100 च्या खाली जाताना दिसली. सर्व क्षेत्रांमध्ये घसरण होताना दिसली. मिड आणि स्मॉलकॅप 3.5% ने घसरले. निफ्टी मिडकॅप मध्ये जून 2024 पासून एक दिवसाची सर्वात मोठी घसरण आज झाली. स्मॉलकॅप इंडेक्स 4% […]Read More

राजकीय

शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारने दिला हिरवा सिग्नल

मुंबई,दि.१३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी त्याचसोबत पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणा-या शासनाच्या महत्वकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्दैश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना आज येथे दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे आगामी शंभर दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. त्यावेळी […]Read More

देश विदेश

आजपासून महाकुंभमेळ्याला सुरूवात, स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नीही ‘या’ नावाने होणार

आजपासून महाकुंभमेळ्याला सुरूवात झाली आहे. या कुंभमेळ्यात ॲपल कंपनीचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल सहभागी झाल्या आहेत. या कुंभमेळ्यासाठी लॉरेन पॉवेल यांनी कमला हे हिंदू नाव धारण केलं आहे. तसेच त्यांच्या गुरूंनी त्यांना आपलं गोत्र प्रदान केलं आहे. लॉरेन पॉवेल यांना त्यांच्या गुरूचं गोत्र मिळाल्यानंतर त्यांना कमला हे नवं नाव देण्यात आलं […]Read More

पर्यटन

जम्मू काश्मीर येथील झेड- मोर्ह(Zed Morh) बोगदा वाहतुकीसाठी खुला, पंतप्रधानांच्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीर मधील सोनमर्गयेथील झेड- मोर्ह बोगद्याचे उद्घाटन केले. सीएम ओमर अब्दुल्ला आणि एलजी मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे यावेळी उपस्थित होते. या बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा बोगदा सर्व प्रकारच्या हवामान परिस्थितीत खुला राहणार आहे. सोनमर्गच्या सर्व प्रसिद्ध पर्यटन रिसॉर्टशी कनेक्टिव्हिटीसह झेड- मोर्ह बोगदा वर्षभर काश्मीर आणि लडाखला […]Read More

खान्देश

भीषण अपघातात लोखंडी सळ्या अंगात घुसून आठ तरुणांचा मृत्यू…

नाशिक, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  लोखंडी सळया वाहून नेणाऱ्या ट्रकला मागून पिकअप (छोटाहत्ती) ने जोरदार धडक दिल्यानंतर ट्रकमधील सळया तरुणांच्या शरीरातून आरपार गेल्याने या भीषण अपघातातील मृतांचा आकडा ८ वर गेला आहे.नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपूलावर आयशर ट्रक आणि मालवाहतूक करणाऱ्या पिकअप (छोटा हत्ती) मध्ये भाविकांच्या वाहनाला काल रात्री ८ […]Read More

ऍग्रो

देवगडच्या प्रत्येक आंब्यावर असणार आता युनिक कोड स्टिकर

सिंधुदुर्ग, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अस्सल देवगड हापूस आंबा विकत घेताना ग्राहकांची अनेकदा फसवणूकच होते. परप्रांतातील हापूस देवगडचा हापूस सांगून सर्रासपणे विकले जातात. आता मात्र यावर आळा बसणार आहे. देवगड मध्ये पिकवलेल्या प्रत्येक आंब्यावर आता एक युनिक कोड स्टिकर लावण्यात येणार आहे. या स्टिकरच्या माध्यमातून आंब्याची अस्सलता स्पष्ट होणारा आहे. युनिक कोड वरील […]Read More