Month: October 2024

पर्यटन

रायगड किल्ल्याची युनेस्को पथकाकडून पाहणी.

महाड, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रायगड किल्ल्याची युनेस्को च्या पथकाकडून काल पाहणी करण्यात आली. प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मुल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळाने काल दिनांक ३ ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ल्याला भेट दिली आणि त्याची सखोल पाहणी केली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), महाराष्ट्र […]Read More

महानगर

राज्य मंत्रिमंडळ बैठक

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संक्षिप्त निर्णय o राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ ( महसूल विभाग) o महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार (महसूल विभाग) o दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन (महसूल विभाग) o त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास मान्यता (जलसंपदा विभाग) o टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व. अनिल […]Read More

राजकीय

राज्यातील अकृषिक अर्थात एन ए कर पूर्णपणे माफ

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील बिगरशेती जमिनींवर आकारण्यात येणाऱ्या अकृषिक कर आकारणीचा जनतेवर पडत असलेला बोजा पूर्णपणे काढण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या गावातील गावठाणांमध्ये असणाऱ्या जमिनीवरील अकृषिक कर कायमस्वरुपी माफ आहे. मात्र गावठाणाबाहेर रहिवासी घरांची संख्या वाढत असल्याने आणि शहरी भागात बहुमजली […]Read More

क्रीडा

राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ऑलिंम्पिंक, पॅराआलिंम्पिंक सूवर्ण पदक विजेत्यांना पाच कोटी रुपये, रौप्य पदकासाठी तीन कोटी, कांस्य पदकासाठी दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर […]Read More

महानगर

मुंबईत CSMT परिसरात तरूणीवर सामूहिक बलात्कार

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांत बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. आता मुंबईत आणखी एक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडवली आहे. २९ वर्षीय एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित […]Read More

राजकीय

हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश, विधानसभा

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांच्या चर्चेनंतर मी त्यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतोय असं सांगत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. याबाबत आपण देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून त्यानंतर निर्णय घेतल्याचं हर्षवर्धन पाटील […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यातल्या तरूणींवर तिघांकडून लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे. कोंढवा परिसरातील बोपदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली. तरुणी आपल्या मित्रासोबत बाबदेव घाटामध्ये फिरायला गेले असताना तीन अज्ञात तरुणांनी तिच्यावर अत्याचार केल्यास समोर येत आहे या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. TR/ML/PGB 4 Oct 2024Read More

देश विदेश

ऐकावं ते नवलच! अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात जपानवर टाकलेला बॉम्ब ८०

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील अमेरिकन बॉम्बचा बुधवारी २ ऑक्टोबरला जपानच्या विमानतळावर अचानक स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण विमानतळावर गोंधळ उडाला. स्फोटामुळे टॅक्सीवेमध्ये मोठा खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे 80 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. जपानच्या भूमी आणि वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा स्फोट अचानक झाला. व्हिएशन स्कूलमधून रेकॉर्ड केलेल्या […]Read More

ट्रेण्डिंग

माय मराठीला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजचा नवरात्रीचा पहिला दिवस मराठी भाषेसाठी सर्वांर्थाने सुदिन ठरला आहे. आज केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतातल्या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मराठीसह एकूण पाच […]Read More

बिझनेस

एका शेअरवर ३ शेअर मोफत, ‘या’ कंपनीची घोषणा

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बजाज स्टील इंडस्ट्रीजनं गुंतवणूकदारांंना मोठी खूषखबर दिली. कंपनीनं पहिल्यांदाच बोनस शेअर्सची घोषणा केली. त्यानुसार, कंपनी गुंतवणूकदारांना एका शेअरवर ३ शेअर मोफत देणार आहे. ही कंपनी स्क्रू कन्व्हेयर, लिफ्ट, कन्व्हेयिंग सिस्टम, मशीन पार्ट्स, इमारती यासह कॉटन जिनिंग उद्योगासाठी अनेक उत्पादनं आणि सेवा पुरवते. नागपूरमध्ये झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत […]Read More