Month: September 2024

राजकीय

नितेश राणेंवर कठोर कारवाई करा

मुंबई, दि.3(एम एमसी न्यूज नेटवर्क): भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे व प्रसाद लाड यांच्यासह भाजपाचे इतर काही नेते सातत्याने राज्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन धर्मात वाद निर्माण व्हावा अशी प्रक्षोभक विधाने जाहीरपणे केली जात आहेत. विशेषतः मुस्लीम समाजाला उघड उघड धमकावले जात आहे, त्यांच्याविरोधात अत्यंत खालच्या पातळीवरील भाषा वापरली जात आहे. रामगिरी […]Read More

राजकीय

केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थित ६ सप्टेंबर रोजी संविधान जागर यात्रेचा समारोप

मुंबई दि.3(एम एमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागर समितीच्या वतीने ९ ऑगस्ट पासून महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह तेथून सुरू झालेली ‘संविधान जागर यात्रे’चा समारोप आता केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थित ६ सप्टेंबर रोजी दादर येथे होणार आहे.अशी माहिती संविधान जागर समितीचे संयोजक नितीन मोरे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रिपब्लिकन […]Read More

सांस्कृतिक

नागपूरात साजरा झाला बडग्या मारबत उत्सव

नागपूर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजातील कुप्रथांचे उच्चाटन करण्याचे आवाहन करणारी बडग्या मारबत हे संत्रानगरीचे सांस्कृतिक वैभव आहे. उपराजधानीचे सांस्कृतिक वैभव असलेल्या आणि सव्वाशे वर्षाहून अधिकची परंपरा असलेला बडग्या मारबत उत्सव हा नागपूरचा लोक उत्सव आहे. नागपूर मध्ये तान्हा पोळ्याच्या दिवशी निघणाऱ्या मारबत मिरवणुकीचा थरार इतवारीतल्या नेहरू पुतळ्याजवळ बघायला मिळत असतो. नागपुरातील इतवारी […]Read More

मनोरंजन

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट

मुंबई दि.3(एम एमसी न्यूज नेटवर्क): अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोक काव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर, अनुराधा पौडवाल यांच्या कन्या […]Read More

Featured

अरबी समुद्रात कोसळलं भारतीय तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर, पाच जण बेपत्ता

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय तटरक्षक दलाच्या एका हेलिकॉप्टरचा मोठा अपघात झाला आहे. गुजरातमधील पोरबंदरजवळ अरबी समुद्रात मदतीसाठी गेलेलं हे हलिकॉप्टर समुद्रात कोसळलं आहे. या दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टरचे दोन्ही पायलट व एक डायव्हर बेपत्ता आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चार जण होते. त्यापैकी एका व्यक्तीला (डायव्हर) बचाव पथकाने वाचवलं आहे. दरम्यान, अरबी समुद्रात हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत. […]Read More

क्रीडा

पॅरालिम्पिकमध्ये एकाच दिवसात जिंकली तब्बल ८ पदकं, सुवर्णपदकही मिळालं

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरीसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पाचव्या दिवशी भारताने एकाच दिवसात तब्बल ८ पदकं जिंकली. तसेच उत्कृष्ट कामगिरी करत इतिहास घडवला. सोमवार, २ सप्टेंबर रोजी पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकूण ८ पदकं जिंकली आहेत. याआधी पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताने एकाच दिवसात इतकी पदकं जिंकली नव्हती. यासह भारताच्या खात्यात आता एकूण १५ पदकं […]Read More

Lifestyle

दही कबाब कसा बनवायचा

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कबाब बनवण्यासाठी चीज, दही, ब्रेड क्रंब आणि इतर साहित्य वापरले जाते. जर तुम्ही कधीही दही कबाब बनवले नसेल तर आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने तुम्ही ते अगदी सहज बनवू शकता. चला जाणून घेऊया दही कबाब बनवण्याची रेसिपी. दही कबाब बनवण्यासाठी साहित्यकिसलेले चीज – १/२ कपत्रिशंकू दही – अर्धा कपकाजू […]Read More

पर्यटन

गणपती उत्सव तोंडावर असताना एसटी कर्मचाऱ्यांचा संप

सिंधुदुर्ग दि ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- आज राज्यभरात पुकारण्यात आलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले, या संपकरी कर्मचाऱ्यांशी सरकारच्या वतीने करण्यात आलेली चर्चा निष्फळ ठरली आहे. उद्या मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. ऐन गणेशोत्सवात राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात […]Read More

पर्यटन

मुंबईहून रोड ट्रिप : गोवा

गोवा, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुढच्या वेळी तुम्ही गोव्याला भेट देण्याचा विचार कराल तेव्हा मुंबईहून रोड ट्रिपला जा. हे खरोखर एक रोमांचक अनुभव देईल. तुम्ही NH-66 मार्ग घेतल्यास, तुम्ही चिपळूण येथील समुद्रकिनारे आणि धबधबे, कर्नाळा किल्ला आणि पनवेल येथील कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि कोलाड येथील शांत भिरा धरण यासारख्या अनेक साहसी आणि मनोरंजक ठिकाणे पाहत […]Read More

राजकीय

ई-गव्हर्नन्सविषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेला उद्यापासून मुंबईत सुरुवात

यासंदर्भातील माहिती देण्यासाठी मंत्रालय,मुंबई येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेत मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा तथा लोकतक्रार विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास, अतिरिक्त सचिव पुनीत यादव, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, पत्र सूचना कार्यालयाचे सहसंचालक सईद हाशमी उपस्थित होते. ई-गव्हर्नन्सवरील 27 व्या राष्ट्रीय परिषदेबद्दल माहिती : […]Read More