Month: August 2024

महानगर

स्वरगंधर्व, दिवंगत गायक मुकेश यांच्या चौकाचे आज लोकार्पण

मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क): स्वरांचे सम्राट अशी ख्याती असलेले दिवंगत गायक मुकेशचंद्र माथुर उर्फ मुकेश यांच्या स्मरणार्थ नेपियन सी परिसरात लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्गावर स्थित मुकेश चौकाचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागामार्फत सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच मुकेश यांच्या स्मरणार्थ तेथे प्रकाशित फलक देखील लावण्यात आला आहे. मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी मुकेश यांची ४८ वी पुण्यतिथी […]Read More

राजकीय

मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांचे आझाद मैदानात साखळी उपोषण

मुंबई दि.26(एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबई सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई अंतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदारांची प्रलंबित ५०० कोटींची बिले मिळावी म्हणून ” मुंबई कॉन्टॅक्टर्स असोसिएशन ” च्या वतीने सोमवार पासून आझाद मैदानात साखळी उपोषण सुरू केले आहे. सरकारने आमची बिले लवकरात लवकर मिळावी असे असोसिएशनचे कार्याध्यक्ष दादा इंगळे यांनी यावेळी सांगितले. मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात येणाऱ्या […]Read More

विदर्भ

अमरावतीत तिज महोत्सवाची धूम, बंजारा महिलांचा जल्लोष…

अमरावती, दि.२६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कधीकाळी डोंगरदरीत राहणारा बंजारा समाज आज तांडा,वाडी, वस्ती, शहरात जरी राहत असेल तरी बंजारा संस्कृती जपतोय त्याचा एक उदाहरण म्हणजे बंजारा तिज महोत्सव. या तीज महोत्सवाची धूम सध्या अमरावतीत पाहायला मिळत आहे.अमरावतीच्या मनोहर मांगल्यम सभागृहात तिज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बंजारा महिलांनी पारंपारिक वेशभूषा करून नृत्य केलं,यावेळी […]Read More

ट्रेण्डिंग

लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती, केंद्र सरकारचा निर्णय

पर्यटनासाठी आवडीचं डेस्टीनेशन असलेल्या लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी या संदर्भात घोषणा केली. सुलभ प्रशासनासाठी हा निर्णय गृह मंत्रालयाने घेतल्याची माहिती आहे.या घोषणेनुसार झांस्कार, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे. झांस्कार आणि द्रास हे नवे जिल्हे कारगिल विभागात असतील. […]Read More

कोकण

मालवण समुद्रावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला…

सिंधुदुर्ग, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे सहा महिन्यापूर्वी उभारलेला शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा आज कोसळला. सहा महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजकोट येथील या पुतळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. गेल्या सहा महिन्यात या ठिकाणी लाख्खो शिवप्रेमींनी भेटी […]Read More

देश विदेश

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये २३ जणांची गोळ्या झाडून हत्या

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पंजाबहून आलेल्या बसमधील प्रवाशांना खाली उतरवून त्यांना गोळ्या झाडण्यात आल्याचा प्रकार आज घडला. पाकिस्तानच्या मुसाखेलमधील राराशम जिल्ह्यात ही घटना घडला. पाकिस्तानमधील पंजाब प्रांताकडे जाणाऱ्या व पंजाब प्रांतातून येणाऱ्या बसेसला हल्लेखोर प्रामुख्याने लक्ष्य करत आहेत. या बसेसची तपासणी हल्लेखोरांकडून केली जात आहे. त्यानंतर फक्त पंजाब प्रांतातून आलेल्या नागरिकांना गोळ्या घातल्या जात आहेत.आज हत्या […]Read More

खान्देश

नाशिकमध्ये पावसाची संततधार, नदी नाल्यांना पूर

नाशिक, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. गेल्या ५ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने सर्व नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, धरणेही काठोकाठ भरली आहेत. जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा पेठसह तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीची झाली. तर निफाड, सिन्नर, दिंडोरी, कळवण, […]Read More

मराठवाडा

कपाशीसह अनेक पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव.

जालना, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र या ढगाळ वातावरणाचा परिणाम आता कपाशीसह सोयाबीन, मका आणि इतर पिकांना बसलाय. या पिकांवर मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य रोग, थ्रीप्स, यासारख्या विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांकडून आता पंप द्वारे महागड्या कीटकनाशक औषधाच्या फवारणीला वेग […]Read More

Lifestyle

बटाट्याचा कीस

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ७-८ मध्यम आकाराचे बटाटेवाटीभर खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचा जरा जाडसर कूट हवं असेल तर लाल तिखटतिखटपणा जसा हवा असेल त्यानुसार हिरव्या मिरच्यामीठ, साखर, जिरं आणि शेंगदाण्याचं तेल किंवा साजुक तूप बटाटे सालासकट स्वच्छ धूवून मोठ्या भोकाच्या किसणीनं किसून घ्यावेत. हा कीस दोनदा पाण्यानी स्वच्छ धूवून रोवळीत किंवा मोठ्या गाळण्यात […]Read More

राजकीय

विधानसभा निवडणुकीत रिपाइंला हव्या बारा जागा

पुणे, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पक्षाला योग्य तो न्याय दिला नाही. तरीही आम्ही महायुतीसोबत निष्ठेने काम केले. परंतु येत्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. विधानसभा निवडणुकीत राज्यात आम्हाला १२ जागा दिल्या जाव्यात यासाठी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास […]Read More