बटाट्याचा कीस
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
७-८ मध्यम आकाराचे बटाटे
वाटीभर खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचा जरा जाडसर कूट
हवं असेल तर लाल तिखट
तिखटपणा जसा हवा असेल त्यानुसार हिरव्या मिरच्या
मीठ, साखर, जिरं आणि शेंगदाण्याचं तेल किंवा साजुक तूप
बटाटे सालासकट स्वच्छ धूवून मोठ्या भोकाच्या किसणीनं किसून घ्यावेत. हा कीस दोनदा पाण्यानी स्वच्छ धूवून रोवळीत किंवा मोठ्या गाळण्यात निथळत ठेवावा. फोडणीत पडण्याआधी किसातलं पाणी पूर्णपणे निघून जायला हवंय.
मोठ्या (म्हणजे कीस परतायला पातेल्याची उंची, रूंदी बरी पडते) जाड बुडाच्या पातेल्यात (पितळी वगैरे असेल तर उत्तमच. लोखंडी कढई, भांड इथे वापरायचं नाहीय) जरा दमदमीत तेल किंवा तूप तापवून जिरं, मिरची घालून फोडणी करावी वर कीस घालावा. मोठ्याच आचेवर चांगले २/४ मिनिटं लांब दांड्याच्या सरात्यानं किंवा झार्यानं कीस परतावा.
तेल सगळं नीट माखलं की वर झाकण घालून १० मिनिटं वाफवावा. मध्ये एकदोनदा हलवायला लागेल. ८०% झाला की यात चवीनुसार मीठ, साखर आणि कोरडसर होईल इतपत दाण्याचं कूट घालून नीट हलवून घ्यावं. झाकण घालून अजून एक पाच मिनिटं वाफ द्यावी. बटाट्याचा खमंग कीस गरमागरमच खायला घ्यावा,
PGB/ML/PGB
25 Aug 2024