गोकुळ दूध संघावर अखेर प्रशासक नियुक्ती
मुंबई, दि. ५ : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख सत्ता केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघावर अखेर प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली आहे. सातारचे उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासक समितीने कार्यभार देखील स्वीकारला आहे.याचे दूरगामी परिणाम जिल्ह्याच्या राजकारणात होणार असल्याचे म्हटले जात आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत काल ४ मे रोजी संपली आहे. मुदत संपताच या दूध संघावर प्रशासक समितीची नेमणूक करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक या प्रशासक समितीचे अध्यक्ष असून अन्य चार सदस्य देखील या समितीमध्ये आहेत. गोकुळ दूध संघावर प्रशासक येऊ नये यासाठी मंत्री हसन मुश्रीफ प्रकाश आबिटकर हे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील होते.
SL/ML/SL