‘एक्स्ट्रीम ट्रायलथॉन’ पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला

 ‘एक्स्ट्रीम ट्रायलथॉन’ पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला

नाशिक, दि. 5 : नाशिकच्या डॉ. देविका पाटील याा हिमालयन एक्स्ट्री सोलो पॉइंट फाइव्ह ही जगातील अत्यंत कठीण मानली जाणारी एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला तसेच केवळ दुसऱ्या भारतीय म्हणून मानाचा बहुमान मिळवला आहे. ही स्पर्धा नेपाळमधील अन्नपूर्णा पर्वतरांगांच्या परिसरात पार पडली.

डॉ. देविका पाटील या नाशिक येथील ‘स्वास्थ्य मेंटल हेल्थ क्लिनिक’ मध्ये मनोचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. रुग्णसेवा, क्लिनिकची जबाबदारी आणि दैनंदिन व्यस्त वेळापत्रक सांभाळत त्यांनी या जागतिक दर्जाच्या कठीण स्पर्धेसाठी तयारी केली. डॉ. पाटील यांनी या स्पर्धेसाठी चार महिने कठोर सराव केला. क्लिनिकच्या वेळांपूर्वी पहाटे सराव, सुट्टीच्या दिवशी घाटरस्त्यांवर सायकलिंग आणि रात्री पोहण्याचे सत्र असा त्यांचा दिनक्रम होता. हिमालयातील चढ-उतारांसाठी तयारी करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील अंबोली घाट आणि कसारा घाट येथे सातत्याने सायकलिंगचा सराव केला. त्यासोबत नियमित पोहणे आणि ट्रेल रनिंगचाही सराव त्यांनी केला.

या स्पर्धेत सलग तीन टप्पे पूर्ण करावे लागतात. यात १.९ किलोमीटर खुल्या पाण्यात पोहणे, त्यानंतर ९० किलोमीटर सायकलिंग आणि शेवटी २१ किलोमीटर ट्रेल रनचा समावेश असतो. सायकलिंगदरम्यान सुमारे २,४०० मीटर उंचीचा चढ, तर धावण्यामध्ये आणखी १,७४० मीटर उंचीचा चढ पार करावा लागतो. एकूण ४,१४० मीटर उंचीचा हा प्रवास अत्यंत आव्हानात्मक मानला जातो. ही स्पर्धा सामान्य ट्रायथलॉनपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. सपाट रस्ते किंवा नियंत्रित वातावरणाऐवजी स्पर्धकांना नेपाळच्या खडकाळ व डोंगराळ भागातून मार्गक्रमण करावे लागते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *