मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आसारामला उच्च न्यायालयाकडून 7 दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला पुण्यातील माधोबाग आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी पॅरोल देण्यात आला आहे. न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी यांच्या न्यायालयात आसारामचा पॅरोल मंजूर करण्यात आला. आसाराम गेल्या चार दिवसांपासून जोधपूर एम्समध्ये दाखल आहे. आसारामने उपचारासाठी पॅरोलसाठी अर्ज […]Read More
मुंबई. दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिझर्व्ह बँकेने CSB बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि मुथूट हाऊसिंग फायनान्ससह पाच संस्थांनानिडो होम फायनान्स लिमिटेड आणि अशोका विनियोग लिमिटेड यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. संबंधित बँका आणि फायनान्स कंपनांना लावण्यात आलेला दंड नियमांचे उल्लंघन आधारित आहेत.यामुळे बँकिंग व्यवस्था मजबूत होईल आणि भविष्यात ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षी च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले. अनेक क्रीडाप्रकारामध्ये पदक अगदी थोडक्यात हुकले. काही खेळाडूंना नियमबाह्यही ठरवण्यात आले. त्यानंतर आता २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्ध्यांच्या तोंडावर भारतासाठी एक धक्कादायक बातमी आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता शटलर […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई आणि नवी मुंबई यांतील अंतर कमी करणाऱ्या भर समुद्रात उभारलेल्या अटल सेतूमुळे खाडीतील 60 टक्के मासे कमी झाले आहेत. यामुळे मासेमारीवर मोठा परिणाम होत असून आमच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी मरी आई मच्छिमार सहकारी संस्थेने केली आहे. मरी […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूकीच्या तोंडावर महिला मतदारांना खूश करण्यासाठी घाईघाईने जाहीर केलेली ‘लाडकी बहीण योजना ‘ आता महाराष्ट्र राज्य सरकार पुढे अडचणी निर्माण करत आहे. या योजनेद्वारे नोंदणी करणाऱ्या लाखो महिलांना प्रती महिना १५०० रुपये देण्यासाठी सरकारी तिजोरीत पुरेशी रक्कम आहे का? याविषयी विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यानंतर […]Read More
रांची, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशातील राजकीय स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. बांगलादेशमधील नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांनी देशातील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून शपथ घेतली आहे. मात्र त्यानंतरही तेथील लष्कर आणि प्रशासन आंदोलकांच्या उत्पात थांबवू शकलेले नाही. तेथील अल्पसंख्यांक हिंदू समाजाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या साऱ्या गंभीर […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार१४९ कोटीस मान्यता (पशूसंवर्धन व दुग्धविकास) मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णयलाखो नागरिकांना लाभ ( महसूल विभाग) डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना (उच्च […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी नेमलेल्या समितीने सरकारला अहवाल देऊन ही त्याबाबत अंतिम अधिसूचना काढण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील सरकारी कर्मचारी आणि अधिकारी येत्या २९ तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल सरकारने स्वीकारून ही त्यावर अंतिम निर्णय सरकार घेत […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुधारित हायब्रिड ॲन्युईटी योजनेत राज्यातील सहा हजार किमी रस्ते डांबरीकरण करण्यात येणार होते मात्र त्याऐवजी या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित ३६ हजार ९६४ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. डांबरीकरणासाठी यापूर्वी दिलेल्या मान्यतेनुसार २८ हजार ५०० कोटी खर्च […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयाचा लाभ लाखो नागरिकांना होणार असून ६० वर्षांपासूनची मागणी निकाली निघणार आहे. या अनुषंगाने हैद्राबाद इनाम निर्मूलन , रोख अनुदान अधिनियम १९५४ […]Read More