जुनी पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी नेमलेल्या समितीने सरकारला अहवाल देऊन ही त्याबाबत अंतिम अधिसूचना काढण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील सरकारी कर्मचारी आणि अधिकारी येत्या २९ तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल सरकारने स्वीकारून ही त्यावर अंतिम निर्णय सरकार घेत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे, समितीने आमच्याशी चर्चा केली, त्यावर तोडगा निघाला आम्ही तो स्वीकारला मात्र सरकार त्याची अधिसूचना जारी करत नाही असा आरोप कर्मचारी आणि अधिकारी संघटनेने केला आहे.
राज्यात ५ लाख ६७ हजार राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी आहेत , जिल्हा परिषद , महामंडळे , निमशासकीय कार्यालये, शिक्षक असे मिळून एकूण आठ लाख चाळीस हजार इतर कर्मचारी आहेत ही दोन्ही संख्या मिळून चौदा लाख सात हजार अधिकारी , कर्मचारी आहेत हे सर्व जण मिळून येत्या २९ तारखेपासून बेमुदत संपावर जात आहेत, तसा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन दिला आहे.
याशिवाय देशभरात २५ राज्यांमध्ये लागू असलेले सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० इतके करावे ,रखडलेली पदोन्नती प्रक्रिया त्वरेने पूर्ण करावी , सरकार मधील रिक्त तीन लाख पदे त्वरित भरावीत अशा इतर मागण्याही त्यांनी निवेदनात नमूद केल्या आहेत.
ML/ML/PGB
13 Aug 2024