Month: July 2024

पश्चिम महाराष्ट्र

पाऊस थांबला तरी पूरस्थिती कायम…

सांगली, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात पाऊस थांबला असला तरी पूरस्थिती बदललेली नाही. कृष्णा आणि वारणा नद्यातील पाणी कमी होण्याची लोक वाट पाहत आहेत. सतत पडणारा पाऊस लक्षात घेऊन सैन्य दल आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी तूर्त काही दिवस सांगली येथे थांबावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोयना तसेच वारणा धरणातील विसर्ग अद्याप […]Read More

महिला

पूजा खेडकर यांची निवड रद्द

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अखेर दोषी ठरवण्यात आलं आहे. UPSC ने पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा/निवडींमधून कायमचे काढून टाकण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचे उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने ही […]Read More

देश विदेश

आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड मध्ये विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

इराण दि ३० – इराणमधील इस्फहान येथे २१ जुलै ते २९ जुलै या कालावधीत झालेल्या ५४ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) २०२४ मध्ये भारतीय संघाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सर्व पाच भारतीय सहभागींनी २ सुवर्ण आणि ३ रौप्य पदके जिंकली आहेत. पदक विजेते: रिदम केडिया (सुवर्ण), रायपूर, छत्तीसगडलाहोटी (सुवर्ण), इंदूर, मध्य प्रदेशआकर्ष राज सहाय […]Read More

Uncategorized

राज्यात ८१ हजार कोटींच्या सात गुंतवणुक प्रकल्पांना मंजुरी

मुंबई, दि. ३०:- राज्यात गुंतवणुकदारांचा ओघ वाढत असून ८१ हजार १३७ कोटी रूपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेक्ट्रील व्हेईकल, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश असून कोकणसह मराठवाडा, विदर्भ या भागात […]Read More

क्रीडा

Paris Olympic टेबल टेनिसपटू मनिका बत्राची विक्रमी कामगिरी

पॅरिस, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय पॅडलर मनिका बत्राने टेबल टेनिसमध्ये इतिहास रचला आहे. 32 व्या फेरीत मनिका बत्राचा सामना फ्रेंच पॅडलर प्रितिका पावडेशी झाला त्यानंतर मनिकाने 16 च्या फेरीत आपले स्थान निश्चित केले. ऑलिम्पिकमध्ये 16 राउंडमध्ये स्थान मिळवणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला टेबल टेनिस खेळाडू आहे. […]Read More

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील नोकऱ्यांच्या प्रमाणात 19 टक्के घट झाल्याचे EPFO अहवालात स्पष्ट

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल वेगाने सुरू असून सर्वकाही आलबेल आहे असे सरकारच्या विविध वित्त संस्थांकडून वारंवार मांडले जात आहे. तरी देखील देशातील रोजगाराची स्थिती फारशी चांगली नसल्याचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रासारख्य़ा उद्योगप्रधान राज्यातून गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात कंपन्यांनी परराज्यात स्थलांतर केल्यानंतर आता राज्यातील रोजगाराच्या संधीमध्ये मोठी […]Read More

ट्रेण्डिंग

कॉपीराइटचे उल्लंघन केल्या प्रकरणी पतंजली आयुर्वेदला ४ कोटी दंड

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही वर्षांपूर्वी एक विश्वसनीय स्वदेशी ब्रॅण्ड म्हणून नावारूपाला आलेली पतंजली आयुर्वेद कंपनी सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या औषधांविषयी चुकीचा दावा केल्या प्रकरणी पतंजलीचे सर्वेसर्वा रामदेव बाबा यांनी सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली होती. त्यानंतर आता पतंजली आयुर्वेद लिमिटेडला 4 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई […]Read More

खान्देश

नाशिकमध्ये डेंग्यूचा कहर,रुग्णांची संख्या ३०० पार

नाशिक, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमध्ये यावर्षी मे महिन्यापासूनच डेंग्यूचे रुग्ण आढळून येत होते. मात्र वेळीच योग्य उपाययोजना न केल्यामुळे आणि पावसाळ्यामुळे सर्वत्र साठलेल्या पाण्यामुळे शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आता ३०० च्या पार पोहोचली आहे. स्वाइन फ्लूपाठोपाठ चिकुनगुनिया, मलेरिया यासारख्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहे. त्यातच आता डेंग्यूने मात्र कहर केला आहे. डेंग्यूचे […]Read More

महानगर

IIT मुंबई ठेवणार शहरातील रस्त्यांच्या गुणवत्तेवर लक्ष

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रचंड पावसाचा सामना करणाऱ्या महानगरी मुंबईतील रस्त्यांची दरवर्षीच दूरावस्था होत असते. अनेकदा गुणवत्तापूर्ण काम न झाल्यामुळे देखील पावसाळ्यात रस्ते वाहून जाता. यामुळे रस्त्यांची कामे पुन्हा पुन्हा करावी लागतात आणि पालिकेला मोठा आर्थिक भार पडत आहे. यावर उपाय म्हणून मुंबईचे रस्ते कंत्राटदारांकडून दर्जेदार बनवले जावेत, यासाठी संपूर्ण कामावर पालिकेच्या […]Read More

पर्यटन

पुण्यात सिंहगड किल्ल्यावर जाणारा रस्ता बंद

पुण्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर डोंगराचा मोठा भाग, मोठ्या झाडांसह कोसळून रस्त्यावर आला आहे. त्यामुळे सिंहगड किल्ल्यावर जाणारा रस्ता बंद झाला असून वन विभागाकडून दरड हटवण्याचं काम सुरू आहे. मात्र, दगड आणि मातीचं प्रमाण मोठं असल्यानं ही दरड हटवण्यास काही दिवस लागण्याची शक्यता […]Read More