महाराष्ट्रातील नोकऱ्यांच्या प्रमाणात 19 टक्के घट झाल्याचे EPFO अहवालात स्पष्ट
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल वेगाने सुरू असून सर्वकाही आलबेल आहे असे सरकारच्या विविध वित्त संस्थांकडून वारंवार मांडले जात आहे. तरी देखील देशातील रोजगाराची स्थिती फारशी चांगली नसल्याचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रासारख्य़ा उद्योगप्रधान राज्यातून गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात कंपन्यांनी परराज्यात स्थलांतर केल्यानंतर आता राज्यातील रोजगाराच्या संधीमध्ये मोठी घट झाली आहे. EPFO च्या अहवालात मांडलेल्या आकडेवारीवरून ही घटलेली रोजगार संख्या स्पष्ट झाली आहे. राज्यात २०२२-२३ मध्ये ३०.२९ लाख नोकऱ्या होत्या पण २०२३-२४ मध्ये हा दर २४.४५ लाख एवढा खाली आला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील नोकऱ्यांचा टक्का साधारणपणे १९ टक्के कमी झाला आहे.
ईपीएफओच्या माहितीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात देशभरात नोकरीवरुन काढलेले किंवा स्वच्छेने नोकरी सोडलेल्यांचे प्रमाण जास्त होते. हे प्रमाण यावर्षी 12.63 टक्क्यांनी वाढल्याचे अहवालात दिसले.
कोरोना काळानंतर नोकऱ्यांमध्ये फ्रेशर्सना मोठ्या प्रमाणात संधी मिळत होती. पपण आता नोकऱ्यांमध्ये घट होत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 2022-23 या कालावधीत फ्रेशर्सना 1.14 कोटी नोकऱ्या मिळाल्या होत्या. पण 2023-24 मध्ये हा आकडा 1.9 कोटीवर आली. दुसरीकडे अनुभवी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या नोकऱ्यांमध्ये 13.5 टक्के वाढ झाल्याची दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
कनिष्ठ पातळीवरच नव्हे तर मध्यम आणि उच्च पातळीवरही नोकऱ्यांचे प्रमाण घटले आहे. 2023-24 या वर्षात नोकऱ्यांमध्ये साधारण 25 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले.
उत्पादन, निर्मती, सेवा आणि आयटी क्षेत्रात ही घट झाली आहे. जनरेटिव्ह एआय, ऑटोमेशन, रोबोटीक यामुळे कंपन्यांना लागणारी मनुष्यबळाची गरज कमी होत चालली आहे.
SL/ML/SL
30 July 2024