Month: June 2024

ट्रेण्डिंग

डोंबिवली MIDC मध्ये पुन्हा अग्नी प्रकोप

डोंबिवली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या महिन्यात एमआयडीसीतील अमुदान कंपनीत भीषण स्फोट होऊन डोंबिवली परिसर हादरला होता. या स्फोटात 16 कामगार मृत्यूमुखी पडले. या स्फोटाने डोंबिवलीतील रहिवासी, उद्योजक अद्याप या घटनेतून सावरलेले नाहीत. तशात आज सकाळी पुन्हा डोंबिवली MIDC मध्ये अग्नी प्रकोप झाला. सकाळी दहा वाजताच्या दरम्यान कार्यालये सुरू होत असतानाच इंडो अमाईन्स […]Read More

देश विदेश

खलिस्तान समर्थकांकडून इटलीत गांधीजींच्या पुतळ्याची तोडफोड

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इटलीमध्ये खलिस्तानी समर्थकांकडून बुधवारी(१२ जून) महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे.खलिस्तानी समर्थकांनी गांधींच्या पुतळ्यावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचा उल्लेखही केला आहे.विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी उद्या (१३ जून ) जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इटलीच्या अपुलिया प्रदेशातील बोर्गो एग्नाझिया या लक्झरी रिसॉर्टमध्ये ही […]Read More

देश विदेश

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा आता निम लष्करी दलाकडे

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सलग तिसर्‍यांदा देशाची सत्ता हाती आल्यावर मोदी सरकारने आता महत्त्वाचे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. सरकारने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या सुरक्षारचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ज्यांच्या जीवाला धोका आहे, अशा व्यक्तींची सुरक्षा आता एनएसजी म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि आयटीबीपी म्हणजेच इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस यांच्याकडून काढून […]Read More

पर्यावरण

सांगलीतील 400 वर्षांचा वटवृक्ष आता जिल्ह्याची ‘सावली’ होणार

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील भोसे, मिरज तालुक्यातील एक 400 वर्षे जुना ऐतिहासिक वटवृक्ष नुकताच उन्मळून पडला, त्यामुळे पुढील वृक्षतोड रोखण्यासाठी कायदा तयार करण्यात आला. झाडाच्या फांद्या छाटल्यानंतर त्याच जागी पुन्हा उभे करून वृक्ष वाचवण्याचे काम पर्यावरणवादी करत आहेत. याशिवाय, जिल्ह्यातील प्रत्येक गावात वटवृक्षाच्या फांद्या लावण्याची मोहीम राबविण्यात येणार असून, या महत्त्वपूर्ण […]Read More

देश विदेश

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला भरावा लागणार 5849 कोटींचा दंड

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरोग्य सेवा उत्पादनांची निर्मिती करणारी जगातील अग्रणी कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनला टाल्कम पावडरच्या तपासणी बाबत तडजोड करण्यासाठी 5849 कोटींचा दंड भराला लागणार आहे. अमेरिकेतील 42 राज्ये आणि वॉशिंग्टन डीसी यांच्या चौकशीनंतर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी कंपनीने 700 दशलक्ष डाॅलर (5849.45 कोटी रुपये) सेटलमेंटला सहमती दिली आहे. बेबी पावडर […]Read More

Lifestyle

लाल भोपळ्याची उसळ

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:३० मिनिटेलागणारे जिन्नस:१ वाटी लाल चवळी२०० ग्रॅ लाल भोपळा लहान तुकडे केलेलाअर्धा नारळ खवलेला (दोन भाग करा)१/२ चमचा जिरं१ लसणाची कळीमीठफोडणीसाठी :नारळाचं तेलमोहरीसुक्या लाल मिरच्याकढीपत्त्याची पानं क्रमवार पाककृती:चवळी ८-१० तास भिजवून ठेवा.कुकरमध्ये पाणी घालून व्यवस्थित शिजवून घ्या.कुकर थंड झाला की त्यातच लाल भोपळा घालून कुकरची आणखी […]Read More

पर्यटन

देवी घाटावरील टेहळणी बुरूज, मल्हारगड किल्ला

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देवी घाटावरील टेहळणी बुरूज म्हणून मराठा साम्राज्याने बांधलेला, मल्हारगड किल्ला मराठ्यांनी बांधलेल्या शेवटच्या किल्ल्यांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. खासकरून जर तुम्हाला शहरापासून लहान ट्रेकसाठी दूर जायचे असेल. घाट आणि दऱ्यांची सुंदर दृष्ये तुम्हाला वीकेंडला चैतन्य देण्यासाठी पुरेशी आहेत. तुम्ही नशीबवान असाल तर तुम्हाला हरीण, पोर्क्युपाइन्स आणि रानडुक्कर यांसारखे […]Read More

ट्रेण्डिंग

जपानमध्ये जन्मदरांचा नीचांकी विक्रमी

टोकीओ, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील एक प्रगत राष्ट्रामध्ये गणना होणारे जपान सध्या भविष्यातील मनुष्यबळाच्या चिंतेने त्रस्त आहे. मुलांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून जपणारे जपानी सरकार जन्मदर वाढावा यासाठी नागरिकांची मनधरणी करत आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. जपानमधील जन्मदर घट हे देशापुढील मोठे आव्हान ठरले आहे. लोकांचा मुले होऊ न देण्याकडे […]Read More

राजकीय

मागण्या मान्य होईपर्यंत धारावी सर्वेक्षणाला विरोध कायम

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवृत्त वरिष्ठ पोलीस आणि सैन्यातील अधिकारी यांच्या समवेत स्थानिक पोलीस, खाजगी सुरक्षा रक्षक आणि कमांडोज यांना सोबत घेऊन DRPPL ने धारावीत विविध ठिकाणी सर्वेक्षणचे काम सुरू केले आहे. स्थानिक रहिवाशांना सोबत घेऊन या सर्वेक्षणाला विरोध करण्याची तसेच हे सर्वेक्षण बंद पाडण्याची मोहीम,धारावी बचाव आंदोलनाने सुरू केली आहे. आज […]Read More

राजकीय

दुष्काळी भागात आता सोलार पंप आणि पाण्याच्या टाक्या

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या राज्यभर पावसाने हजेरी लावली असली तरी अनेक भागात अद्यापही पाणी टंचाईचा सामना लोकांना करावा लागत असल्याने शासनाकडून अशा गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पण टँकरने पुरवठा करताना विजेच्या लपंडावामुळे टँकर भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे गावात टँकर पोहचण्यासाठी उशीर होतो. अनेकवेळा दिवसभर पाण्यासाठी […]Read More