Month: May 2024

मराठवाडा

साईप्रसाद खेडकर ने सगळ्या विषयात घेतले 35 गुण…!!

जालना, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील एका दहावीच्या विद्यार्थ्यानं सर्व विषयात 35 टक्के गुण मिळवलेत. साईप्रसाद रविंद्र खेडकर असं या गुणवंत विद्यार्थ्यांच नाव असून त्याला 35 टक्के गुण प्राप्त होऊन तो दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालाय. साईप्रसाद ने संपादित केलेल्या यशाबद्दल त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतोय. साईप्रसाद पास झाल्याने त्याच्या […]Read More

राजकीय

स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसर्‍याचे पहावे वाकून ही आव्हाड यांची

ठाणे, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे अपघात प्रकरणी अजितदादांचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना फोन करुन सक्त कायदेशीर कारवाई करण्याचे तसेच राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही डाॅ जितेंद्र आव्हाड हे अजितदादांबद्दल खोटे आरोप करीत आहेत. जितेंद्र आव्हाड यांना स्वप्नात अजितदादाच दिसतात, कायम एका द्वेषाने ते अजितदादांबद्दल बोलतात असा आरोप […]Read More

महानगर

पुराची सूचना देणाऱ्या सेन्सरमुळे आपत्ती व्यवस्थापन होणार प्रभावी

ठाणे, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या संभाव्य पूर आणि पाणी साठण्याच्या घटना यांची आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच संबंधित यंत्रणा यांना आगावू सूचना देणाऱ्या सहा सेन्सर्सच्या देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे संभाव्य आपत्तीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे. ठाणा कॉलेज, वृंदावन पंपिंग स्टेशन, साकेत पाइपलाइन, मुंब्रा स्मशानभूमी, हिरानंदानी […]Read More

महानगर

निवडणुकीच्या विजयाचा उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपले गेले पाहिजे असे सांगतानाच आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी पक्षाच्या बैठकीत आज केले. राष्ट्रवादी काँग्रेसची […]Read More

पर्यावरण

त्र्यंबकेश्वर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये नाही

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी येथे मोठ्या प्रमाणात बांधकामे होऊ लागली आहे. या संदर्भात पुण्यातील राष्ट्रीय हरित लवादात दाखल याचिकेत जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला असून त्रंबकेश्वर गाव हे इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच येथील बांधकामही त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या परवानगीनेच होत असल्याचे सांगितल्याने पर्यावरण […]Read More

ट्रेण्डिंग

‘रेमल’ चक्रीवादळाच्या तडाख्याने प. बंगालमध्ये उलथापालथ

कोलकाता, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टी भागात रविवारी रात्री दाखल झालेल्या रेमल चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. या वादळामुळे सर्वत्र झाडे कोसळली असून रस्त्यांवर पाणी साचलं आहे. पश्चिम बंगालमधील वाहतूक सेवाही यामुळे विस्कळीत झाली आहे. या वादळामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या […]Read More

मनोरंजन

‘गेला माधव कुणीकडे’, १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा नाट्यरसिकांच्या भेटीला

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्रशांत दामले यांची प्रमुख भूमीका असलेले ‘गेला माधव कुणीकडे’ हे धमाल विनोदी नाटक आता तब्बल १९ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाले आहे. ७ डिसेंबर १९९२ ला रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाचे आजवर १८०२ प्रयोग झाले. मध्यंतरी काही वर्षे या नाटकाने ‘ब्रेक’ घेतला खरा पण रसिकांच्या प्रेमळ आग्रहाखातर पुन्हा […]Read More

ट्रेण्डिंग

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात पार पडली. राज्यात १९ मे २०२४ रोजी पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान झाले. आता ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाची प्रतिक्षा असताना निवडणूक आयोगाने आज राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांवर कुठे आणि किती मतदान झाले याची माहिती प्रसिद्ध केली आहे. निवडणुकीचा डेटा कोणीही बदलू […]Read More

कोकण

कोकण रेल्वे मार्गावर ३१ मे ला अडीच तासांचा मेगाब्लॉक

रत्नागिरी, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणातील दुर्गम डोंगरकपारीतून वाट काढत जाणारी कोकण रेल्वेची उभारणी ही आजही एक आश्चय मानले जाते. दक्षिण भारताला कोकणशी जोडणाऱ्या या महत्त्वपूर्ण मार्गावर पावसाळ्यापूर्वी आपत्तीनियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण कामे हाती घेतली जातातय यावर्षी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी ३१ मे रोजी सकाळी ९.१० ते ११.४० या वेळेत कोकण रेल्वेने हा मेगाब्लॉक जाहीर […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबई महापालिकाचे पहिले पशुवैद्यकीय रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अद्ययावत पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करणारी मुंबई महापालिका देशातील पहिली महापालिका ठरली आहे. महापालिकेने शहरातील पाळीव आणि भटक्या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी महालक्ष्मी येथे पशुवैद्यकीय रुग्णालय उभारले आहे. हे रुग्णालय जूनच्या दुसर्‍या आठवड्यापासून सुरू होणार आहे. या रुग्णालयात भटके आणि पाळीव कुत्रा, मांजर, गुरेढोरे यांच्यावर २४ तास उपचार करण्यात येणार […]Read More