नाशिक, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा पाचवा टप्पा सुरु आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा आहे. प्रचारासाठी दोन दिवस राहिले आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा आणि रोड शो केले जात आहे. नाशिकमध्ये शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे आणि भाजप उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये रोड शोसाठी […]Read More
अलिबाग, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोठ्या प्रमाणात डोंगर, टेकड्यांनी वेढलेल्या रायगड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे सतर्क होत शासनाने आता दरडीचा धोका संभवणाऱ्या १०३ गावांची यादी जाहीर केली आहे. भुवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यातील १०३ गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या संभाव्य […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुम्हाला माहीत आहे का की सोलनला मशरूमच्या लक्षणीय उत्पादनामुळे भारताची मशरूमची राजधानी म्हणूनही ओळखले जाते? टोमॅटोच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनाने त्याला आणखी एक मान मिळवून दिला आहे – रेड गोल्ड सिटी. चंदीगडपासून चालता येण्याजोग्या अंतरावरील हे नयनरम्य हिल स्टेशन इतकं काही देऊ शकेल असं कोणाला वाटलं असेल?! सोलन हे […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन (MTDC) कोकण किनारपट्टीतील अनोख्या जागा शोधून त्याठिकाणी वैविध्यपूर्ण पर्यटन सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. किनारपट्टी भागात सागरी भरती ओहोटीच्या नैसर्गिक चक्रात आणि सागरी समतल भागात दिसणारी जैवविविधता आता पर्यटकांना अनुभवता येणार आहे. कोकण किनारपट्टीच्या भागात वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींचे जग उलगडून दाखविण्यासाठी MTDCमार्फत कोकणाच्या […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अक्षय कुमार,अनुपम खेर, जिमी शेरगिल आणि किशोर कदम यांच्या प्रमुख भूमिका असलेला Special 26 हा चित्रपट तुम्ही पाहीला असेल. इन्कमटॅक्स अधिकारी असल्याची बतावणी करत ही टोळी धनाढ्य लोकांकडे डाके टाकत शिताफीने पोबारा करत असल्याचे यात दाखवले आहे. या पद्धतीने लुटमार करणाऱ्या एका टोळीला आज मुंबई पोलीसांनी ताब्यात घेतले […]Read More
मुंबई दि.16(एम एमसी न्यूज नेटवर्क) : ब्रँडेड मासाल्यामध्ये किटकनाशक अंश सापडल्याने सिंगापूर व हाँगकाँग या देशाने भारतातील एव्हरेस्ट व एम डी एच या मासाल्याबाबत नाराजी व्यक्त करत भारताला पत्रव्यवहार करत हे पदार्थ योग्य कसे ? असा सवाल केला आहे. यामुळे भारताची बदनामी झाली असल्याचा आरोप राष्ट्रीय स्तरावरील चार मसाला निर्यातदार संघटनांनी केला असून या प्रकरणी […]Read More
मुंबई दि.16(एम एमसी न्यूज नेटवर्क) : छेडा नगर मधील जाहिरात फलक दुर्घटना प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, ज्यांनी संरचना स्थिरतेबाबतचे प्रमाणपत्र दिले होते, त्यांच्याकडून महानगरपालिकेने स्पष्टीकरण मागवले आहे. त्याच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, छेडा नगर मधील जाहिरात फलकाविषयीचा तांत्रिक तपासणी अहवाल हा वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) यांचेकडून सादर […]Read More
नांदेड, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे अन्नातून विषबाधा झाल्यामुळे 50 हून अधिक व्यक्तींवर नायगाव येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे आंबील महाप्रसादातून झालेल्या विषबाधेतून पन्नास हून अधिक लोकांना मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला. त्यानंतर नायगावचे शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी या रुग्णांना दाखल करण्यात […]Read More
पुणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोसमी पाऊस ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. सध्या उत्तर भारतात तापमान […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अजित पवार नॉटरिचेबल असले की ते नाराज आहेत अशाच बातम्या माध्यमांमध्ये दाखवल्या जातात. पण ते नॉटरिचेबलही नाही आणि नाराजही नाहीत. अजित पवार यांना निवडणुकीच्या कार्यकाळात घशाचे इन्फेक्शन झाले असल्याने डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले आहे. मात्र ते उद्यापासून प्रचारात सहभागी होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील […]Read More