मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून एकवीस लाख रुपये बक्षीस जिंकण्याचे आव्हान दिले आहे. त्यासाठीची आव्हान प्रक्रिया व प्रश्नावली देखील महाराष्ट्र अंनिसने जाहीर केली आहे. हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या राजकीय अभ्यासकांना नाही तर ज्योतिष्यशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना आहे. […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूका डोळ्यासमोर ठेवून गत दोन वर्षांपासू बाजारभाव नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने विविध कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे देशातील शेतमालाची निर्यात एप्रिल ते फेब्रुवारी २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८.८ टक्क्यांनी घसरून ४३.७ अब्ज डॉलरवर आली आहे. केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या धोरणांसोबतच तांबड्या समुद्रातील संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्धाचा शेतमाल निर्यातील […]Read More
माले, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वारंवार मदतीला धावून येणाऱ्या भारताला बाजूला सारून चीनला जवळ करणाऱ्या मालदिवमध्ये आता पूर्णपणे चीन धार्जिणे सरकार अस्तित्त्वात आले आहे. मालदीवमध्ये 21 एप्रिल रोजी संसदीय निवडणुका झाल्या, ज्यामध्ये मुइझ्झूच्या पक्षाचा विजय झाला. सोमवारी जाहीर झालेल्या प्राथमिक निकालांमध्ये मुइझूच्या नॅशनल पीपल्स काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या समर्थकांना 93 पैकी 71 जागा […]Read More
नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली सरकारच्या मद्यविक्रीसंबंधातील अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली न्यायालयाने आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ केली.राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी हा आदेश दिला आहे. न्यायाधीश बावेजा यांनी केजरीवाल यांना ७ मे रोजी दुपारी २ वाजता व्हिडिओ […]Read More
मुंबई दि.23(एमएमसी न्यूज नेटवर्क) : नरीमन पाॅईंट, मरीन लाइन्स समुद्रालगत एकूण 8 एकर जागेवर वसलेले एनसीपीए हे सामाजिक बांधिलकी जपणारे केंद्र आहे. ” संस्था भेट चर्चा थेट ” या उपक्रमाव्दारे एनसीपीए कलादालने तसेच लायब्ररी भेट व त्याची माहिती जाणून घेण्यासाठी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी नयन कळे , मुख्य ग्रंथपाल सुजाता जाधव यांनी […]Read More
कोल्हापूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्रीजोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी श्री जोतिबाचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्यांच्या हस्ते पाडळी निनाम (ता.सातारा) येथील मानाच्या सासन काठीचे पूजन करण्यात आले. राज्यातील प्रसिद्ध यात्रांमध्ये जोतिबा यात्रेची गणना होते. या यात्रेत […]Read More
अकोला, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या वाडेगाव आणि हिंगणा गावाला अवकाळी पावसाने चांगलंच झोड़पलं. वाऱ्याच्या अवकाळी पावसासह गारपिट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आधीच अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा एकदा आजच्या पावसाने हतबल झालाय. दरम्यान हवामान विभागांने अकोल्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अंदाज दिला होता, त्यानूसार आज अकोला जिल्ह्यातील […]Read More
जालना, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. जालना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या कडे दानवे यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज सादर केला. जालना लोकसभा मतदार संघाचे पाच वेळा खासदार राहिलेले रावसाहेब दानवे सहाव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. […]Read More
अहमदनगर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांनी कोणताही गाजावाजा न करता, कोणतेही शक्तfप्रदर्शन न करता अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आज अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात साधेपणाने अर्ज भरला. नीलेश लंके यांनी अर्ज भरत असताना कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. हनुमान जयंतीचे निमित्त साधत कार्यकर्त्यांनी […]Read More
मुंबई दि.23(एम एमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीचे जळगावचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यापाठोपाठ सोलापूरचे उमेदवार राहुल गायकवाड यांनीही आता उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सत्ताधारी पक्षांनी धमकावल्याने अर्ज मागे घेतल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे. वंचित बहुजन […]Read More