Month: April 2024

खान्देश

बाईक-बोलेरोचा भीषण अपघात ५ जण ठार, ३ गंभीर

नाशिक, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिंडोरी रोडवर भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाले असून जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ मोटर सायकल आणि बोलेरो यांच्यामध्ये हा अपघात झाला. यामध्ये दुचाकी वरील […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

चैत्री यात्रेसाठी भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दिवसभर मुखदर्शन

सोलापूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चैत्री एकादशीच्या सोहळ्यानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचे मुखदर्शन हे 15 एप्रिल पासून 21 एप्रिल पर्यंत दिवसभर भाविकांना मिळणार आहे. सध्या मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामामुळे विठ्ठलाचे मुखदर्शन हे केवळ पहाटे पाच ते 11 या पाच तासात मिळते. मात्र मराठी नववर्षातील पहिलीच चैत्री एकादशी आणि वारी असल्याने आता भाविकांना पूर्णवेळ दर्शन मिळणार […]Read More

विदर्भ

मोदींची जाहीर सभा मुनगंटीवारांसाठी चंद्रपुरात

चंद्रपूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आठ एप्रिल रोजी मोरवा विमानतळाच्या बाजूला असलेल्या विस्तीर्ण मैदानात होणार आहे. संध्याकाळी चार वाजता च्या सभेनंतर मोदी लगेच दुसऱ्या सभेसाठी होणार रवाना होणार आहेत. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र […]Read More

राजकीय

सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा संकल्प असलेले काँग्रेसचे ‘न्यायपत्र’

मुंबई, दि. ५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याची मध्यवर्ती संकल्पना न्याय ही आहे. मागील १० वर्षांत प्रत्येक घटकाचा न्याय धोक्यात आला आहे, कमकुवत झाला आहे तर काही बाबतीत न्याय नाकारलाही आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाने पाच न्याय आणि २५ गॅरंटी देत देशातील सर्व […]Read More

गॅलरी

मुख्यमंत्र्यांनी घेतली आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

अलिबाग, दि. ५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे त्यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आशिर्वाद घेतले. तसेच शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले. यावेळी डॉ. सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी तसेच धर्माधिकारी कुटूंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्र्याच्या सोबत यावेळी आमदार भरतशेठ गोगावले, […]Read More

राजकीय

राष्ट्रवादी निवडणूक चिन्ह, सर्वोच्च न्यायालयात याचिका निकाली

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना आज सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना समज देत चिन्हाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांकडून घड्याळ या चिन्हाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केले होते. हे दोन्ही अर्ज आज कोटने निकाली काढले आहेत.या […]Read More

क्रीडा

IPL सामन्यातील पाण्याच्या अपव्ययाची राष्ट्रीय हरीत लवादाने घेतली गंभीर दखल

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभर उन्हाचा पारा चढून पाणी टंचाईची समस्या गंभीर बनत चालली आहे. त्यातच IPL स्पर्धांचा माहोलली सुरु झाला आहे. या निमित्ताने देशाच्या विविध स्टेडीअमवर होणाऱ्या सामन्यांच्या निमित्ताने मैदानांचा मेटेनन्स करण्यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेले बंगळुरु शहर गेल्या काही दिवसांपासुन पाण्याच्या टंचाईमुळे […]Read More

ऍग्रो

पालघरच्या जांभळांना मिळाले भौगोलिक मानांकन

पालघर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण विभागात येणारा बहुतांश आदिवासींची वस्ती असलेला पालघर जिल्हा हा वैशिष्ट्यपूर्ण फळपिकांसाठी ओळखला जातो. उन्हाळ्याची रणरण सुरु झाली की, मुंबई आणि आसपासच्या परिसरात टप्पोरी जांभळे दिसू लागतात. यामध्ये पालघर जिल्ह्यातील आता बहाडोली जांभळांना विशेष मागणी असते. या प्रसिद्ध जांभळांना आता भौगोलिक मानांकन (Geographical Indication) मिळाले असून बहाडोली आणि […]Read More

पर्यावरण

महाराष्ट्रात अवघ्या 28 दिवसांत उष्णतेच्या लाटेमुळे 23 आजारी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तापमानात वाढ होत असताना, राज्यात आतापर्यंत उष्माघाताची २३ प्रकरणे आढळून आली आहेत, तरीही मृत्यूची पुष्टी झालेली नाही. हे लक्षात घेता, आरोग्य तज्ञांनी सरकारच्या उष्णतेची लाट कृती योजना लागू करण्याच्या तातडीच्या गरजेवर जोर दिला, विशेषत: ग्रामीण भागात जेथे प्रकरणे आणि मृत्यू वारंवार होतात. मार्चपासून विविध जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा सामना […]Read More

ट्रेण्डिंग

भाजपाच्या नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध कारणांमुळे विदर्भातील भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या लोकसभा उमेदवारीत मोठा अडथळा ठरू शकणारा प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयाच निकाली निघाला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असलेल्या नवनीन राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्या. जे. के महेश्वरी […]Read More