Month: April 2024

महिला

अपहार प्रकरणी महिला अधिकाऱ्यास तब्बल २४ वर्षांनी सक्तमजुरी

बीड, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात शासकीय तिजोरीतील ५ लाख ३१ हजार रुपयांचा अपहार करून नंतर रोखपाल विरोधात अपहाराची तक्रार देणाऱ्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यास अंबाजोगाई येथील अतिरिक्त मुख्य न्या. एम.वाय. वाघ यांनी दोषी ठरवून चार वर्षांचा सश्रम कारावास आणि सहा लक्ष रुपये […]Read More

विदर्भ

फडणवीसांनी जाहीर केली श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी

नागपूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे  विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी महायुतीतील सर्व घटक पक्ष भाजपा सहित उभे राहून , श्रीकांत शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणतील असे आज भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजपा पक्ष स्थापना दिनानिमित्त नागपुरातील टिळक पुतळा […]Read More

पर्यावरण

पक्ष्यांसाठी ठेवले ज्वारीचे एक एकर क्षेत्र

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निसर्ग व सामाजिक, पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यांनी पक्ष्यांसाठी ज्वारीचे एक एकर क्षेत्र राखीव ठेवले असल्याची माहिती प्रमोददादा मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ही संस्था दरवर्षी उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी, मुठभर अन्न, घोटभर पाणी, योजना राबवत आहे. यासाठी मातीची भांडी (परळ) वाटप करतच असते. विविध उपक्रम […]Read More

कोकण

१ हजार ६५६ सरकारी नोकरदारांनी घेतला मोफत धान्याचा लाभ

अलिबाग, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोरगरिबांची सोय व्हावी म्हणून स्वस्त धान्य दुकानावर त्यांना सरकारकडून मोफत धान्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र हे अन्नधान्य सरकारी नोकरदारांनीच लाटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कुंपणानेच शेत खाल्ल्यांच्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. रायगड जिल्ह्यात शिधा वाटप केंद्रांवर, मोफत धान्याची उचल करणारे १ हजार ६५६ […]Read More

देश विदेश

Tesla ने सुरू केली ‘राइट-हँड ड्राईव्ह’ Cars ची निर्मिती

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टेस्ला ही जगातील अग्रगण्य इलेक्ट्रिक कार्स बनवणारी कंपनी आहे. इलॉन मस्कच्या मालकीची Tesla कंपनी भारतीय मार्केटमध्ये येण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. ही कंपनी आता भारतात लाँच होण्यासाठी सज्ज झाली आहे. अमेरिका आणि इतर बऱ्याच देशांमध्ये डाव्या बाजूला स्टिअरिंग व्हील असणाऱ्या गाड्या वापरल्या जातात. मात्र, भारतात उजव्या […]Read More

ट्रेण्डिंग

UPI वरुन करता येणार Cash Deposit

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : UPI च्या वाढत्या वापरामुळे देशातील सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहार सुलभ झाले आहेत. आता UPI च्या माध्यमातून बँकेत रोख रक्कम जमा करणे शक्य होणार आहे. UPIच्या माध्यमातून कॅश डिपॉझिट मशीनमध्ये रोख जमा करण्याची सुविधा RBI लवकरच उपलब्ध करुन देईल. पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयीची घोषणा केली […]Read More

ट्रेण्डिंग

८ वर्षांनी वाढले भारतीयांचे सरासरी आयुर्मान

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर देशात गेल्या काही दशकांपासून उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तसेच शेतीविषयक विविध योजनांमुळे पौष्टीक अन्नधान्याबाबतही स्वयंपूर्णता आली आहे. यामुळेच गेल्या काही वर्षांत भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात लक्षणिय वाढ झाली आहे. एका नव्या सर्वेक्षणानुसार १९९० ते २०२१ या कालावधीत जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मान ६.२ […]Read More

देश विदेश

तब्बल १८ कॅरेट सोन्याच्या टॉयलेटची चोरी

लंडन, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधुनिक जगात आपल्या रोजच्या वापरात अत्याधुनिक आणि महागड्या वस्तू वापरण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. हौसेला मोल नाही असं म्हणतात. इंग्लंडच्या वूडस्टॉक, ऑक्सफर्डशायर या ३०० वर्षांहून अधिक जुन्या घरात असलेल्या ब्लेनहाइम पॅलेसमध्ये तब्ब्ल ४८ लाख पौंड म्हणजे अंदाजे ५०,५४,३४,५६१.१२ रुपये किमतीचे सोन्याचे टॉयलेट हे प्रदर्शनाचा एक भाग म्हणून लावले […]Read More

पर्यटन

समुद्री व्यापार आणि प्राचीन भारत

मुंबई, दि. 5 (जाई वैशंपायन) : सागरसफरी आणि सागरी व्यापार या संकल्पना प्राचीन भारताला सुपरिचित होत्या. लोथल येथे सापडलेल्या सिंधू संस्कृतीच्या खाणाखुणा आणि प्राचीन काळी अनेक देशांत पोहोचलेल्या भारतीय वस्तू त्याची साक्ष देतात. प्राचीन भारताचा सागरी व्यापार दक्षिण अमेरिकेतील देशांशी चाले. इजिप्तच्या ज्या बंदरात थांबून या नौका पुढे जात, तेथे संशोधनात काळे मिरे सापडले. हे […]Read More

खान्देश

बाईक-बोलेरोचा भीषण अपघात ५ जण ठार, ३ गंभीर

नाशिक, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिंडोरी रोडवर भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाले असून जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ मोटर सायकल आणि बोलेरो यांच्यामध्ये हा अपघात झाला. यामध्ये दुचाकी वरील […]Read More