मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणी लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय समाज पक्षाला जागा देताना महायुतीचे उमेदवार म्हणून महादेव जानकर हे निवडणूक लढवणार असून त्यांनी महाराष्ट्रात धनगर समाजाची एक […]Read More
नागपूर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी अर्ज मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी रामटेक लोकसभा मतदारसंघातून सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची संख्या एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्यामुळे 26 अशी कायम आहे. तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील […]Read More
ठाणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे जिह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या ज्येष्ठ- श्रेष्ठ पत्रकारांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा भव्य पत्रकार मेळावा आज मोठ्या दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. या मेळाव्यात ६० वर्षांपासून आजतागायत पत्रकारिता करणारे पीटीआय, यूएनआय या राष्ट्रीय वृत्तसंस्थांचे जेष्ठ पत्रकार एस. रामकृष्णन यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील ११ […]Read More
सिंधुदुर्ग, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील नेरूर गावाच्या हर्षद मेस्त्रीने कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या सहाय्याने तब्बल १५ बाय १५ फुट ऊंचीची शिवशंकर आणि माता पार्वतीची हुबेहुब प्रतिमा साकारली असून ही प्रतिमा बनविण्यासाठी त्याने ६३ हजार मीटर धागा वापरला , यासाठी त्याला २१ दिवस लागले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील नेरुर हा गाव, कलेचा अधिपती श्रीदेव […]Read More
वाशिम, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे काढणी केलेल्या हळद पिकाचे मोठे नुकसान झाले असून पावसामुळे हळदीचा दर्जा घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात काल सायंकाळी अचानक आलेल्या पावसाममुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काढणी करून वाळत घातलेली हळद भिजली असून, या हळदीचा दर्जा घसरण्याची शक्यता आहे. सध्या हळदीला चांगले दर […]Read More
मुंबई दि.30(एम एमसी न्यूज नेटवर्क) : माजी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी ” मुंबईतील झोपडपट्टी मिठागरांच्या जागेवर शिफ्ट करावी ” हे वक्तव्य त्वरित मागे घ्यावे , नाहीतर मुंबई काँगेस तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मुंबई काँगेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी शनिवारी मुंबई काँगेस कार्यालयात पत्रकार परिषदेत दिला. मुंबई ही गोरगरीब, कष्टकरी माणसामुळे निर्माण झाली आहे. […]Read More
नाशिक, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक लोकसभेच्या जागेवर दावा सांगणारे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी आज पासून प्रचाराला सुरुवात केली आहे. उमेदवारी निश्चित नसतानाही त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. रंगपंचमीचे औचित्य साधून हनुमानाच्या मंदिरात पूजा विधी करत प्रचाराचे नारळ फोडले. रंगांची उधळण करत हेमंत गोडसे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे […]Read More
अहमदनगर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी आज अखेर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांना आपण आजच राजीनामा पाठवत असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. लंके यांनी सुपा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला संबोधताना त्यांनी विखे पाटील यांच्यावर […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सामूहिक जैव वैद्यकीय व्यवस्थापन केंद्रांमध्ये येणारा काही जैव वैद्यकीय कचरा हा २०१६च्या नियमानुसार वर्गीकरण होऊन येत नाही, असे सामूहिक जैव वैद्यकीय केंद्रांच्या भेटीमध्ये समोर आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) आयआयटी, मुंबईवर या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवली आहे. या कचऱ्याचे सुरक्षित आणि पर्यावरणदृष्ट्या योग्य पद्धतीने व्यवस्थापन व्हावे […]Read More
बीड, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील केज तालुक्यात पावनधाम येथे पंकजा मुंडे आल्या असता त्यांना मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत मुंडेची गाडी आडवण्याचा प्रयत्न केला होता .गाडी अडवण्याचा प्रयत्न होताच मराठा आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला होता. या आंदोलक कार्यकर्त्यांच्या विरुद्ध युसूफवडगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात […]Read More