Month: February 2024

महानगर

खराब ध्वनिक्षेपक यंत्रणेने पाडले विधानसभेचे कामकाज बंद

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात प्रामुख्याने विरोधी पक्षाने केलेल्या गोंधळाने तर आजकाल सत्तारूढ पक्षाच्या वतीनेही गदारोळ झाल्याने सभागृह बंद करण्याची परंपरा आहे मात्र आज विधानसभेतील अत्याधुनिक ध्वनिक्षेपक यंत्रणाच खराब झाल्याने अर्धा तास कामकाज बंद करावे लागण्याची नामुष्की अध्यक्षांवर ओढवली. गेल्या पाच वर्षांपासून राज्याच्या मुंबईतील विधानमंडळात दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम सुरूच […]Read More

महानगर

मुंबई सारखा कायदा राज्यात शक्य नाही, सरकारने केले स्पष्ट

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातल्या महापालिकांमध्ये मुंबई महानगरपालिकेसारख्या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही असं आज मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केलं. अन्य महानगपालिकांच्या तुलनेत मुंबईची लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा कायदा अन्य महानगरपालिकांमध्ये लागू करणं शक्य होणार नाही असं ते म्हणाले. मुंबई महानगर पालिका क्षेत्रात मालमत्ता कराचा भुर्दंड पडू नये […]Read More

पर्यावरण

राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण’ पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ धुळ्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 20 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र , असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. ओसाड पाड्याचे नंदनवन करणाऱ्या चैत्राम पवार यांच्या कामाचा वन विभागाकडून गौरव […]Read More

बिझनेस

अदानी समूह करणार दारुगोळा आणि गन पावडर निर्मिती

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या उद्योग क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणारा गौतम अदानी समूह आता संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांची निर्मिती करणार आहे. संरक्षण उत्पादनात आपली उपस्थिती बळकट करण्यासाठी अदानी समूहाने उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दोन मोठे प्लांट उघडण्याची घोषणा केली जे दक्षिण आशियातील सर्वात मोठे संरक्षण उत्पादन कॅम्पस आहे. ग्रुप कंपनी- अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने […]Read More

मनोरंजन

अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील कलाकारांना दरवर्षी संगीत नाटक अकादमी प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. २०२२-२३ वर्षासाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाले असून नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.. […]Read More

महानगर

हातात गाजर, गळ्यात कापसाच्या माळा घालत सरकारविरोधात घोषणाबाजी

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळ परिसरात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. ‘शासन आपल्या दारी आले, मिळाले गाजर, ‘कांद्याचा करून वांदा, महायुतीने दिले गाजर’,’शेतकऱ्यांनी मागितली मदत, सरकारने दिले गाजर,’ ‘कापसाला पाहिजे होता हमीभाव, मिळाले गाजर, म्हणत सरकारच्या विरोधात विधिमंडळ परिसरात जोरदार निदर्शने केली. राज्यातील जनतेला […]Read More

ट्रेण्डिंग

‘पंचायत’ फेम अभिनेत्रीचा रस्ते अपघातात मृत्यू

पटना, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकप्रिय वेब सीरिज ‘पंचायत २’मध्ये काम करणारी अभिनेत्री आंचल तिवारी हिचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. आंचल भोजुपरी इंडस्ट्रीतही खूप सक्रिय होती. या अपघातात आणखी एक भोजपुरी अभिनेत्री सिमरन श्रीवास्तव आणि गायक छोटू पांडे यांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातात भोजपुरी चित्रपटसृष्टीतील आणखी चार कलाकारांचाही रस्ते अपघातात मृत्यू […]Read More

मनोरंजन

या दिग्दर्शकाचा ‘राज कपूर विशेष योगदान’ पुरस्काराने सन्मान

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ’12वी फेल’ या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र सरकारतर्फे ‘राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर विधू विनोद चोप्रा म्हणाले- माझी जन्मभूमी काश्मीर आणि माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. आज […]Read More

देश विदेश

पतंजली आयुर्वेदला सर्वोच्च न्यायालाकडून अवमानना नोटीस

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि तिचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांना अवमानना नोटीस बजावली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच IMA ने 2022 मध्ये पतंजली विरोधात गुन्हा दाखल केला होता. आयएमएने याचिकेत म्हटले होते की, बाबा रामदेव सोशल मीडियावर ॲलोपॅथीविरोधात चुकीची माहिती पसरवत आहेत.न्यायमूर्ती अमानुल्ला […]Read More

ट्रेण्डिंग

शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या जमा होणार PM Kisan आणि नमो सन्मान

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्याचा दिवस राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.कारण उद्या पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याबरोबरच राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन हप्तेही उद्याच पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी ६ हजार रुपये येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते […]Read More