पतंजली आयुर्वेदला सर्वोच्च न्यायालाकडून अवमानना नोटीस

 पतंजली आयुर्वेदला सर्वोच्च न्यायालाकडून अवमानना नोटीस

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि तिचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांना अवमानना नोटीस बजावली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच IMA ने 2022 मध्ये पतंजली विरोधात गुन्हा दाखल केला होता. आयएमएने याचिकेत म्हटले होते की, बाबा रामदेव सोशल मीडियावर ॲलोपॅथीविरोधात चुकीची माहिती पसरवत आहेत.न्यायमूर्ती अमानुल्ला यांच्या खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. 21 नोव्हेंबर 2023 रोजी शेवटची सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने म्हटले होते की, पतंजलीला दिशाभूल करणाऱ्या सर्व जाहिराती तातडीने बंद कराव्या लागतील. न्यायालय अशा कोणत्याही उल्लंघनास गांभीर्याने घेईल आणि उत्पादनावरील प्रत्येक खोट्या दाव्यासाठी 1 कोटी रुपयांपर्यंत दंड आकारू शकते. यायाधी रामदेव बाबांनी दावा केला होता की, कोरोनावर त्यांचे उत्पादन कोरोनिल आणि श्वासारीने उपचार केले जाऊ शकतात. या दाव्यानंतर आयुष मंत्रालयाने कंपनीला फटकारले आणि त्याची जाहिरात त्वरित थांबवण्यास सांगितले.

IMA च्या वतीने कोर्टात उपस्थित असलेले वकील पीएस पटवालिया म्हणाले की पतंजलीने योगाने मधुमेह आणि दमा पूर्णपणे बरा करण्याचा दावा केला आहे. त्यावर कोर्ट म्हणाले- कोर्टाच्या आदेशानंतरही ही जाहिरात आणण्याची तुमची (पतंजली) हिंमत होते.कोर्ट म्हणाले- आता आम्ही कठोर आदेश देणार आहोत. तुम्ही कोर्टाला चिथावणी देत ​​आहात म्हणून आम्हाला हे करावे लागले आहे. न्यायालयाने केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली. न्यायमूर्ती अमानुल्ला म्हणाले- संपूर्ण देशाची फसवणूक होत आहे आणि सरकार डोळे मिटून बसले आहे.

पतंजली आयुर्वेद भविष्यात अशी कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करणार नाही आणि प्रेसमध्ये अशी अनौपचारिक विधाने होणार नाहीत याची काळजी घेईल, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. ‘ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद’ या वादात या मुद्द्याचे रुपांतर करू इच्छित नाही, तर भ्रामक वैद्यकीय जाहिरातींच्या समस्येवर खरा तोडगा काढू इच्छितो, असेही खंडपीठाने म्हटले आहे.

याआधीच्या सुनावणीत तत्कालीन सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा म्हणाले होते, ‘बाबा रामदेव आपली वैद्यकीय पद्धती लोकप्रिय करू शकतात, पण त्यांनी इतर पद्धतींवर टीका का करावी? आपण सर्वजण त्यांचा आदर करतो, त्यांनी योग लोकप्रिय केला, पण त्यांनी इतर पद्धतींवर टीका करू नये. कोरोनाशिवाय योग आणि पतंजलीच्या उत्पादनांनी कॅन्सर, एड्स आणि समलैंगिकता बरा करण्याच्या दाव्यांमुळे रामदेव बाबा अनेकदा वादात सापडले आहेत.

SL/KA/SL

27 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *