Month: February 2024

अर्थ

म्युच्युअल फंड गुंतवणूकीत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील नागरिकांमध्ये पारंपरिक गुंतवणूकीचे पर्याय सोडून आता गुंतवणूकीचे विविध पर्याय आजमावू लागले आहेत. गुंतवणूकासाठी म्युच्युअल फंडाला प्राधान्य दिले जात असून यामध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेत (AUM) मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्र, नवी दिल्ली, कर्नाटक, गुजरात आणि बंगाल या राज्यांचा म्युच्युअल फंड उद्योगाच्या […]Read More

मनोरंजन

नामदेव ढसाळांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दलित पँथरचे संस्थापक आणि वंचितांवरील अन्यायाविरोधात व्यवस्थेविरोधात एल्गार पुकारणारे कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांचा जीवन प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. द बायोस्कोप फिल्म्सने बंडखोर कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ (Dhasal Movie) या बायोपिकची घोषणा केली. या चित्रपटाच्या निर्मितीचे अधिकार नामदेव ढसाळ यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे […]Read More

महानगर

राज्यसभेसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील विधानसभा सदस्यांमधून निवडून देण्याच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज शेवटच्या दिवशी सात उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून त्यातून कोणी माघार न घेतल्यास मतदान घेणे आवश्यक ठरणार आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती , त्यामुळे आजच सर्व पक्षाच्या उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. भाजपाच्या डॉ […]Read More

राजकीय

कांदा प्रश्नी विखे पाटील थेट शाह यांच्या भेटीला

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांदा प्रश्नी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला पोहचले आहेत. ही भेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत घेतली असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. भेटीदरम्यान कांद्यावरील निर्यात बंदी उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विनंती केल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. […]Read More

राजकीय

मराठा महासंघाच्या”आजचा निश्चय, पुढचं पाऊल” या ७४ पानी पुस्तिकेच्या मुखपृष्ठाचे

मुंबई दि.15( एम एमसी न्यूज नेटवर्क) : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास या अनुषंगाने “आजचा निश्चय, पुढचं पाऊल” या 74 पानी पुस्तिकेच्या मुखपृष्ठाचे अनावरण आज मुंबई मराठी पत्रकार संघात करण्यात आले.ही पुस्तिका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी प्रसिध्द करणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आली. मराठा […]Read More

राजकीय

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अंदाजपत्रकास मान्यता

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी १८८६.९१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी महानगर प्रदेशातील २५ गावांकरीता अमृत टप्पा दोन मधून मलनिस्स:रणासाठी सुमारे ७१६ कोटी खर्चाच्या वाहिनीच्या कामाचा समावेश आहे. ही विकासकामे जलदगतीने पूर्ण करावी, असे निर्देश […]Read More

राजकीय

काँग्रेसचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर उद्यापासून

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर उद्यापासून (१६ / १७ फेब्रुवारी ) लोणावळा येथे आयोजित करण्यात आले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार असून प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंथ […]Read More

महानगर

मराठी मुस्लिम सेवा संघाचा आंदोलनाचा इशारा

मुंबई दि.15( एम एमसी न्यूज नेटवर्क) : देशातील मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या सच्चर समितीचा अहवाल २००६ पासून दाबून ठेवण्यात आला आहे.या अहवालाची सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी.अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठी मुस्लिम सेवा संघाचे सचिव सरफराज अहमद यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. भुमीपुत्र […]Read More

महिला

महिला तहसीलदारांच्या वाहनाचा दुचाकीस्वारांकडून पाठलाग

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहर व जिल्ह्यात वाळू माफियांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून महसूल पथकांना सातत्याने टार्गेट करण्यात येत असून, सध्या या वाळू माफियांवर नजर ठेवण्यात येत आहे. अवैध वाळू वाहतूक रोखण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून मोटारसायकलवरून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने महिला तहसीलदारांचा पाठलाग केल्याचा व्हिडिओ प्रसारित […]Read More

महानगर

कुणबी समाजाच्या ३२ संघटनांचा सरकार विरोधात एल्गार

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शासनाच्या अध्यादेशातील सगेसोयरे, सजातीय आणि गणगोत या दोन शब्दांमुळे कोकणातील कुणबी समाज संतप्त झाला असून कोकणातील तब्बल ३२ कुणबी समाज संघटना एकत्र येऊन कुणबी एकीकरण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी बळीराजा सेनेचे अध्यक्ष अशोकदादा वालम यांची निवड करण्यात आली असून कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील […]Read More