Month: February 2024

आरोग्य

वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाले पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली. आज विधानभवनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत तसेच मंत्रिमंडळातील […]Read More

ट्रेण्डिंग

What’s App वर जुने मेसेज शोधणारं भन्नाट फिचर

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकप्रिय मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअप ( WhatsApp ) युजरच्या सुविधेसाठी एक नवीन फिचर आणले आहे. या नव्या फिचरमुळे सर्चिंग अनुभव चांगला होणार आहे. सर्चिंगची क्षमता आता आणखी वाढणार आहे. लेटेस्ट फिचर युजर्सना त्यांच्या चॅट हीस्ट्रीतील टेक्स्ट आदी शोधायला मदत करणार आहे. आता विशिष्ट तारखेचा मॅसेज शोधू शकणार आहेत.मेटाचे सीईओ […]Read More

सांस्कृतिक

पंतप्रधानांच्या हस्ते होणार जगातल्या पहिल्या वैदिक घड्याळाचे उद्घाटन

उज्जैन, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या प्राचिन वैदिक ज्ञानाचे आणि परंपरेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सध्या देशात विविध स्तरांवर प्रयत्न होत आहेत. आधुनिक विज्ञानाच्या तोडीस तोड असलेले वेदकालिन ज्ञान जगासमोर आणण्याच्या उपक्रमांना केंद्र सरकारकडूनही प्रोत्साहन दिले जाते. उज्जैन येथे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील पहिल्या वैदिक घड्याळाचे अनावरण होणार आहे. भारतीय पंचांगावर आधारित […]Read More

क्रीडा

या ठिकाणी होणार जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनमधील बीजिंग याठिकाणी 2027 मध्ये जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक ॲथलेटिक्स इनडोअर चॅम्पियनशिप (1-3 मार्च)पूर्वी ग्लासगो येथे झालेल्या 234व्या जागतिक ॲथलेटिक्स परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.बैठकीपूर्वी इटालियन ॲथलेटिक्स फेडरेशनने रोमची बोली मागे घेतली. त्यानंतर बीजिंगचा मार्ग मोकळा झाला. इटालियन सरकारने पैसे देण्यास नकार दिला, […]Read More

ट्रेण्डिंग

एक कोटी घरांना मिळणार ३०० युनिट मोफत वीज

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या लोकसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांवर विविध कल्याणकारी योजोनांचा वर्षाव सुरू केला आहे. ‘पीएम सूर्य घर’ योजनेसाठी सरकारने ७५००० कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहेत. तर आरडब्ल्यूए किंवा ग्रुप हाऊसिंग सोसायटीला विद्युत वाहनांसाठी सामान्य प्रकाश किंवा चार्जरसाठी प्लांट उभारण्यासाठी देखील तरतूद करण्यात आली […]Read More

महानगर

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीची निर्दोष सुटका

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १९९३ साली देशात ठिकठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष सुटका झाली आहे. राजस्थानमधील अजमेरच्या टाडा कोर्टानं (Ajmer Tada Court) हा निर्णय दिला आहे. बॉम्बस्फोटानंतर तब्बल ३१ वर्षांनंतर हा निर्णय आला आहे. टुंडाची सुटका करतानाच न्यायालयानं इरफान आणि हमीदुद्दीन यांना दोषी ठरवलं आहे. त्या […]Read More

विज्ञान

कपिल पाटील यांच्या हस्ते ‘इकॅमेक्स २४’ प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई दि.29(एम एमसी न्यूज नेटवर्क) : इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (इकॅम) संघटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त ग्राहकांच्या विद्युत सुरक्षा विषयक जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या “इकॅमेक्स २४” या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री कपिल मोरेश्वर पाटोल यांच्या हस्ते बॉम्बे एक्झिबिशन सेंटर (नेस्को), गोरेगाव, मुंबई येथे संपन्न झाले. याप्रसंगी मा.खासदार गोपाल शेट्टी, आर आर केबलचे राजेश काबरा, पॉलीकॅबचे सीईओ […]Read More

क्रीडा

विजय भोयर ठरला ‘ विदर्भ श्री ‘

वाशिम, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम येथे भव्य विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्न झाली, अमरावतीच्या विजय भोयरने यात ‘विदर्भ श्री’ चा सन्मान पटकावला. बॉडी बिल्डर्स अ‍ॅन्ड फिटनेस असोसिएशन विदर्भ, वाशीम जिल्हा बॉडी बिल्डींग असोसिएशनच्या वतीने आणि दिवंगत मन्नासिंह ठाकूर बहूउद्देशिय संस्थेच्या आयोजनातून वाशीमच्या स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलामध्ये पार पडलेल्या विदर्भस्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेत […]Read More

राजकीय

रोहित पवार गुन्हेगाराला पाठीशी घालतात, विधानसभेत झाले आरोप

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवून टाकण्याची भाषा करणारा योगेश सावंत हा आ. रोहित पवार यांचा कार्यकर्ता आहे, सावंत याला अटक करू नये यासाठी आ. पवार यांनी पोलिसांना फोन केला होता त्यामुळे आ .रोहित पवार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपाच्या राम पवार यांनी […]Read More

महानगर

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प राज्याला दिवाळखोरीकडे नेणारा

मुंबई दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा हा अर्थसंकल्प असून राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचा सरकारचा हा संकल्प असल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. अंतरिम अर्थसंकल्पावरील सर्वासाधारण चर्चेवेळी वडेट्टीवार […]Read More