What’s App वर जुने मेसेज शोधणारं भन्नाट फिचर

 What’s App वर जुने मेसेज शोधणारं भन्नाट फिचर

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकप्रिय मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअप ( WhatsApp ) युजरच्या सुविधेसाठी एक नवीन फिचर आणले आहे. या नव्या फिचरमुळे सर्चिंग अनुभव चांगला होणार आहे. सर्चिंगची क्षमता आता आणखी वाढणार आहे. लेटेस्ट फिचर युजर्सना त्यांच्या चॅट हीस्ट्रीतील टेक्स्ट आदी शोधायला मदत करणार आहे. आता विशिष्ट तारखेचा मॅसेज शोधू शकणार आहेत.मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या व्हॉटस्अप ( WhatsApp ) चॅनलवर या नव्या फिचरची घोषणा केली आहे. असे म्हटले जात आहे की सर्च बाय डेट हे फिचर्स ग्लोबल लेव्हलला Android, iOS, Mac, Windows आणि Web वर सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे. या नव्या फिचरला नोव्हेंबर 2023 बीटा टेस्टींगमध्ये पाहीले गेले होते.

व्हॉट्सअपवर सर्च बाय डेट फिचरचा वापर करण्यासाठी युजर्सला व्यक्तीगत किंवा ग्रुप चॅटला उघडून त्यात मॅसेज शोधता येणार आहे. त्यानंतर Android फोनवर वरती वरच्या डाव्या बाजूला तीन पॉईंटवर ( तीन बिंदूंवर ) टॅप करावे लागेल. जर एपचे लेटेस्ट व्हर्जन असेल तर रेग्यूलर सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आयकॉनसोबत एक छोटे कॅलेंडर दिसेल, त्यानंतर पॉप अप कॅलेंडर युजर्सना त्यांच्या इच्छेप्रमाणे तारीख निवडता येईल. त्यात त्या तारखेला केलेला मॅसेज दिसेल.’

जो मेसेज हवा असेल ती तारीख, महिना आणि वर्षानुसार त्याची निवड करु शकता. एकदा तारीख निवडल्यानंतर चॅट किंवा ग्रुप थेट त्या दिवसाचा मॅसेज तुम्हाला दाखवेल. जेथुन युजर हा मॅसेज वर किंवा खाली स्क्रोल करु शकतील. या आधी युजर जुने मॅसेज सर्च करण्यासाठी चॅटींग मागे मागे नेत शोधावे लागायचे. व्हॉट्सॲपने अलीकडे जागतिक स्तरावर चार नवीन टेक्स्ट फॉर्मेटिंग ऑप्शन देखील आणले आहेत. त्यात बुलेटेड पॉइंट्स, नंबर लिस्ट्स, ब्लॉक कोट्स आणि इनलाइन कोट्स यांचा समावेश आहे. नवा फॉर्मेट्स आता सध्याच्या बोल्ड, इटॅलिक, स्ट्राइकथ्रू आणि मोनोस्पेस फॉर्मेटिंग ऑप्शनमध्ये सामील होतील.

SL/KA/Sl

29 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *