Month: January 2024

पर्यावरण

छोट्याश्या मुंग्या जेव्हा सिंहांना त्यांची शिकारीची पद्धत बदलायला भाग पडतात..

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जगात वारंवार होणाऱ्या महत्त्वपूर्ण बदलांसाठी लहान जीव किंवा प्राणी जबाबदार असतात. याचे सर्वात ताजे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. कोरोना नावाच्या छोट्या विषाणूने संपूर्ण जग हादरले होते. असाच प्रकार आता आफ्रिकन जंगलात दिसून आला आहे, ज्यामुळे जंगलाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बलाढ्य सिंहाने आपल्या शिकारीच्या […]Read More

करिअर

मध्य प्रदेश कोर्टात लॉ क्लर्क/रिसर्च असोसिएट पदासाठी भरती

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सर्वोच्च न्यायालयाने कायदा लिपिक/संशोधन सहयोगी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट https://main.sci.gov.in/recruitment वर जाऊन अर्ज करू शकतात. लॉ क्लर्क कम रिसर्च असोसिएट भरती परीक्षा 10 मार्च रोजी होणार आहे. त्याची उत्तर की 11 मार्च रोजी प्रसिद्ध होईल. उमेदवारांना परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय मिळेल. ही परीक्षा बेंगळुरू, भोपाळ, […]Read More

राजकीय

महाराष्ट्रात गुंतवणुकीचा निप्पॉन स्टील सोबत सामंजस्य करार

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र जगभरातील उद्योजकांचे पसंतीचे राज्य ठरत असून दावोस मधील सामंजस्य करारानंतर आज महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्यात सहा एमटीपीए क्षमतेचा एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्याकरीता अर्सेलर मित्तल निप्पोन स्टील इंडिया कंपनी सोबत ४० हजार कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला असून यामुळे २० हजार प्रत्यक्ष […]Read More

राजकीय

हरित हायड्रोजन निर्मितीसाठी सरकारने केले सामंजस्य करार

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरित हायड्रोजन काळाची गरज असून त्यासाठी महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटी एवढी आर्थिक गुंतवणूक करणारे सात प्रकल्पांसाठी आज विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यामाध्यमातून ६४ हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे आज मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More

राजकीय

नार्वेकरांची नेमणूक , हे लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात नुकताच परिशिष्ट दहाच्या चिंधड्या उडवून जो उफराटा निर्णय नार्वेकरांनी दिला त्याचे वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तर केलेच, परंतू त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही गेलो आहोत. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना ही नेमणूक करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचाच प्रयत्न समजावा लागेल असे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे. […]Read More

ऍग्रो

लासलगाव समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन

नाशिक, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लावल्यानंतर कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत कांद्याचे दर ४ हजार रुपयांवरून १ हजार रुपयांच्या आता आल्याने संतप्त शेतकऱ्यांसह महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली असून नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पडत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. […]Read More

महिला

फिटनेस आणि सौंदर्य टिकवायचं आहे? झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी करायला

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्त्री असो की पुरुष प्रत्येक जण चांगले आरोग्य आणि सुंदर त्वचेचे स्वप्न पाहत असतात. ज्यासाठी प्रत्येक जण अनेक प्रयत्न करतात. असे असूनही अनेक वेळा त्यांची समस्या जैसे थेच राहते. अशा परिस्थितीत घरातील कामे आणि ऑफिसच्या तणावामुळे जर तुम्ही स्वत:ची काळजी घेण्यासाठी वेळ काढू शकत नसाल तर झोपण्यापूर्वी या […]Read More

पर्यटन

2024 मध्ये भेट देण्यासाठी सर्वात इष्ट, अयोध्या

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2024 मध्ये, अयोध्या हे भारतातील फेब्रुवारीमध्ये भेट देण्यासाठी सर्वात इष्ट आणि सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक असेल, कारण राम मंदिर भक्तांसाठी खुले केले जाईल. ऐतिहासिक महत्त्व असलेले हे शहर धार्मिक उत्सवांचे केंद्र बनले आहे. अयोध्येतील भेटीची ठिकाणे: श्री रामजन्म भूमी, हनुमान गढी मंदिर, कनक भवन मंदिर, नागेश्वरनाथ मंदिर, राजा मंदिर, […]Read More

देश विदेश

NCC च्या महाराष्ट्र तुकडीने जिंकले Prime Minister’s Banner

नवी दिल्ली, दि.२८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित NCC Camp मध्ये महाराष्ट्राच्या तुकडीने सलग तिसऱ्या वर्षी Prime Minister’s Banner जिंकले आहे. 122 कॅडेट्सचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संचालनालयाच्या तुकडीने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि प्रजासत्ताक दिन शिबिरात (RDC-2024) प्रतिष्ठित पंतप्रधान बॅनर जिंकून ट्रॉफी आणि गौरव/पदके जिंकण्यासोबतच एकूण प्रथम स्थान मिळवले. या यशाबाबत […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

एकोणिसाव्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचं दिमाखदार उद्घाटन

कोल्हापूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भवतालातील स्पंदनं साहित्यिकानं टिपलीच पाहिजेत.कस्पटदेखील साहित्यिकाला वर्ज्य असता कामा नये. लेखकाच्या दृष्टीनं मुंगीसुद्धा महत्वाची असली पाहिजे. त्यातूनच साहित्य अधिक वास्तववादी होईल, असा आशावाद यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक कृष्णात खोत यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीरतालुक्यातील वाशी इथं आज एकोणिसाव्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचं यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार […]Read More